एखादी महत्त्वाची मीटिंग सुरु असते, तुमचे वरिष्ठ तुमच्याकडे बघून काहीतरी सांगत असतात आणि इतक्यात तुम्हाला जांभई येते.. बस सगळ्या बोर्डरूम मध्ये तुमच्या आळशीपणाच्या चर्चा सुरु होतात. तुमचं कामात लक्ष नाही असंही अनेकांना वाटू लागतं. सहसा पुरेशी झोप न झाल्याने थकवा येतो, अशावेळी मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊन आपल्याला जांभया यायला लागतात. काहीवेळेस एकापाठोपाठ एक जांभया येत असतील तर काय करावे हे पण पटकन सुचत नाही. अर्थात जांभई हा काही आजार नाही त्यामुळे त्यावर एक ठोस गोळी किंवा औषध नाही पण आपण काही सोप्या उपायांनी जांभईवर नियंत्रण आणू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जांभया थांबवण्याचे सोपे उपाय

  • शरीर थंड असल्यास जास्त जांभई येत नाही. थंड पाणी, आइस टी, कोल्ड कॉफी हे पर्याय उत्तम ठरतील.
  • शरीर हायड्रेटेड ठेवा.
  • दीर्घ श्वास घ्या व तोंडाने हळूहळू सोडा
  • हसल्याने जांभई येण्याचे प्रमाण कमी होते म्हणूनच गप्पा मारून किंवा एखादा मजेशीर व्हिडीओ पाहून जांभई थांबवू शकता.
  • तोंडात काहीतरी चघळत ठेवून जांभई कमी करू शकता, जेवणानंतर बडीशेप किंवा आवळा सुपारी खाल्ल्यास मुखशुद्धी व जांभई कमी होणे हे दोन्ही उपाय होऊ शकतात.
  • दात चावल्याने सुद्धा जांभई कमी होते.

Home Remedies For Low BP: कमी रक्तदाबाच्या समस्येवर दूध ठरेल रामबाण उपाय; सेवन करताना फक्त एवढं करा

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to stop yawning during meeting and lecture with simple tricks svs
First published on: 09-08-2022 at 12:18 IST