Screen during meal time: लहानग्यांपासून थोरामोठ्यांपर्यंत प्रत्येकाला मोबाईल फोनचं व्यसन लागलं आहे. काही मुलांना जर मोबाईल फोन दिला नाही तर, ते जेवत देखील नाही. व्हिडिओ किंवा मोबाईल गेम खेळत त्यांना भरवावे लागते. मुलं इतकी हट्टीपणा करतात की शेवटी पालकांना आपल्या पाल्यांचे ऐकावे लागते.

अनेक पालक मुलांना जेवण भरवताना त्यांच्या हातात मोबाईल फोन देतात. पण ही सवय आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. यामुळे त्यांच्या मानसिक यासह शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकते. तज्ज्ञ सांगतात की, सतत मोबाइल पहाणे मुलांसाठी खूप वाईट सवय असू शकते. पूर्वी घरातले सर्वजण एकत्र जेवायला बसत असत यावेळी दिवसभर काय झालं यावर चर्चा होत असत. याचा मुलांच्या व्यक्तिमत्व विकासावरही परिणाम व्हायचा मात्र आता एकत्र जेवण फारशा घरांमध्ये होत नाही. अशावेळी मुलं मोबाईलसाठी हट्ट धरतात. जास्त स्क्रीन टाइम मुलांच्या शारीरिक आरोग्यावर परिणाम करतात. तसेच मानसिक विकासावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. जेव्हा मुले अन्न खातात तेव्हा त्याची चव वास किंवा सुगंध त्यांना जाणवत नाही. जे त्यांच्यासाठी चांगले नसते. तसेच सतत स्क्रीन पाहिल्यामुळे डोळ्यांवर दबाव येतो, त्यामुळे मेंदूच्या वाढीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यासाठी लहान मुलांना मोबाइलपासून दूर ठेवण्यासाठी या गोष्टी करा.

सोपे उपाय लवकर करा

Award Banner

जेवण करण्यापूर्वी मोबाइल फोन त्यांच्या आजूबाजूला ठेवू नका. मुलं जेवत असताना त्यांना एखादी गोष्ट सांगा किंवा त्याच्यासोबत गाणी गाऊ शकता. यामुळे त्यांचे लक्ष दुसरीकडे वळेल.

मुलाला खाऊ घालताना किंवा फावल्या वेळेत त्यांच्याशी गप्पा मारा, ज्यामुळे त्यांचे संवादकौशल्य सुधारेल.

जेवताना मोबाइल फोन वापरणे टाळा आणि आपल्या मुलांसोबत जेवा. आपली मुले आपल अनुकरण करत असतात हे पालकांनी नेहमी लक्षात ठेवा.

मुलांकडून मोबाइल फोन हिसकावून घेऊ नका, त्यामुळे ते जास्त चिडचिड करतात. त्यांचा स्क्रिन टाइम कमी करण्यासाठी इनडोअर गेम्स किंवा त्यांना इतर कामांमध्ये व्यस्त ठेवा.

बाळाला स्वत:च्या हाताने खाऊ घाला

मुलाचे समुपदेशनही करता येईल.

होऊ शकतात गंभीर परिणाम

तुमचे मुलं जेवताना मोबाईल बघत असतील तर ते त्याला करू देऊ नका. पालक मुलाला फोन दाखवून खाऊ घालतात, पण हळूहळू ती मुलाची सवय बनते. अशा सवयीमुळे फोन न बघता खाणे अवघड होते, पण मुलाची ही सवय त्याच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. मुलाला फोन दाखवून खाऊ घातल्याने अनेक आजारांचा धोका असतो. जेव्हा मूल मोबाईलकडे पाहून अन्न खातात, तेव्हा ते जास्त खात असते किंवा कमी खात असते. म्हणजे एकतर ते भुकेपेक्षा कमी खाते किंवा जास्त खाते.तुम्हाला माहिती आहे का की, जास्त खाल्ल्यास लठ्ठपणा येऊ शकतो आणि कमी खाल्ल्यास कुपोषित होण्याचा धोका असतो. फोनकडे पाहताना मूल अन्न चघळत नाही तर तोंडात गिळते. यामुळे चयापचय कमकुवत होते. याशिवाय अनेक आजारांचा धोका असतो.