फ्रिजमध्ये खाद्यपदार्थ ठेवताना कोणती काळजी घ्यावी? 'या' उपयुक्त टिप्स नेहमी लक्षात ठेवा | How to store food in fridge know helpful easy tips to avoid Food spoilage | Loksatta

फ्रिजमध्ये खाद्यपदार्थ ठेवताना कोणती काळजी घ्यावी? ‘या’ उपयुक्त टिप्स नेहमी लक्षात ठेवा

फ्रिजमध्ये खाद्यपदार्थ साठवताना कोणती काळजी घ्यावी जाणून घ्या

फ्रिजमध्ये खाद्यपदार्थ ठेवताना कोणती काळजी घ्यावी? ‘या’ उपयुक्त टिप्स नेहमी लक्षात ठेवा
फ्रिजबाबत काही उपयुक्त टिप्स जाणून घ्या (फोटो: फ्रीपिक)

भाज्या, फळं, खाद्यपदार्थ जास्त काळासाठी टिकवून ठेवण्यासाठी फ्रिजचा वापर केला जातो. रोजचे उरलेले अन्न हा गृहिणींना रोज पडणारा प्रश्न, याचे टेन्शनही फ्रिजमुळे कमी होते. उरलेले अन्नपदार्थ साठवून ठेवण्यासाठी फ्रिजची मदत होते. पण जर हे पदार्थ योग्यरित्या साठवले नाहीत तर लगेच खराब होण्याची शक्यता असते, यामुळे आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे फ्रिजमध्ये खाद्यपदार्थ साठवताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. फ्रिजमधील खाद्यपदार्थ अधिक काळ टिकण्यासाठी तसेच फ्रिजचा योग्यरित्या वापर करण्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या टिप्स जाणून घ्या.

फ्रिजमध्ये खाद्यपदार्थ साठवताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

आणखी वाचा: मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये चुकूनही करू नका ‘हे’ पदार्थ गरम; आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक

फळं किंवा भाज्या कापून फ्रिजमध्ये ठेऊ नका
अनेकजण दुसऱ्या दिवशीच्या जेवणाची तयारी म्हणून भाज्या कापून फ्रिजमध्ये ठेवतात किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी फळं कापून फ्रिजमध्ये ठेवतात. पण ही पद्धत चुकीची आहे. यामुळे फळं आणि भाज्यांमधील ओलावा निघुन जातो आणि त्यातील पौष्टिकता देखील कमी होते. त्यामुळे फळं किंवा भाज्या कापून फ्रिजमध्ये साठवणे टाळा.

गरम खाद्यपदार्थ फ्रिजमध्ये ठेऊ नये
गरम खाद्यपदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यातून निघणाऱ्या वाफेमुळे फ्रिजमधील मॉइश्चर वाढू शकते. ज्यामुळे खाद्यपदार्थ खराब होऊन, फूड पॉयजनिंग होण्याची शक्यता असते. त्यामुळे गरम खाद्यपदार्थ फ्रिजमध्ये ठेऊ नये.

आणखी वाचा: सतत होणाऱ्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? त्यामागे असू शकतात ‘ही’ कारणं लगेच जाणून घ्या

प्लास्टिकच्या डब्ब्यांचा वापर टाळा
अनेकजण फ्रिजमध्ये कोणतेही पदार्थ साठवण्यासाठी प्लास्टिकच्या डब्ब्यांचा वापर करतात. पण तज्ञांच्या मते प्लास्टिकचा वापर शक्य तितका टाळावा. कारण प्लास्टिकमुळे खाद्यपदार्थांमधील पोषकतत्त्व कमी होण्याची शक्यता असते. प्लास्टिक ऐवजी स्टीलची किंवा काचेची भांडी वापरण्याचा सल्ला दिला जातो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 11:36 IST
Next Story
मधुमेह होण्याची सतत भीती सतावतेय ? तर आजपासूनच ‘हे’ ५ बदल करा