How to store green chili: हिरवी मिरची अनेकदा लवकर खराब होते. तसेच हिवाळ्यात फ्रिजमध्ये मिरची ठेवल्यानेही ती खराब होऊ लागते. अशा परिस्थितीत हिरवी मिरची रेफ्रिजरेटरशिवाय कशी साठवायची हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या पद्धतीने तुम्ही मिरची दीर्घकाळ साठवून ठेवू शकता. विशेष म्हणजे ही पूर्वीपासून चालत आलेली एक पद्धत आहे, जी दीर्घकाळ काम करू शकते.

हिरवी मिरची दीर्घकाळासाठी कशी साठवायची?

पूर्वीपासून हिरवी मिरची दीर्घकाळ साठविण्यासाठी तेलाचा वापर केला जातो. हिरवी मिरची तेलात ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. ती लवकर खराब होत नाही आणि ती तडका देण्यासाठीही वापरली जाऊ शकते. एवढेच नाही, तर तुम्ही ती थेट खाऊ शकता किंवा सॅलडमध्येही मिक्स करू शकता.

bank mitra warn of agitation over low remuneration lack of protection of service
‘बँक मित्रां’चा आंदोलनाचा इशारा; तुटपुंजे मानधन, सेवाशर्तींचे संरक्षण नसल्याने त्रस्त
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
सोनु सुदने चपाती खाणे केले बंद! चपाती खाणे पूर्णपणे बंद केल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल?
When's The Best Time To Eat Rice? to burn fats and calories also keeps blood sugar in control health tips
मंडळी आता भात न सोडता वजन व ब्लड शुगरवर मिळवा नियंत्रण! तज्ज्ञांनी सांगितली भात खाण्याची योग्य वेळ
kitchen tips hacks how to clean kitchen utensils shiny
Kitchen Hacks : चपातीमुळे काळा पडलेला, खराब झालेला तवा काही मिनिटांत होईल चकाचक; वापरा फक्त ‘या’ सोप्या ट्रिक्स
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही
Amla kadha benefits
घनदाट केसांसाठी आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आवळ्याचा काढा आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या बनवण्याची योग्य पद्धत
Is it necessary to take protein powder for fitness What are the side effects
तंदुरुस्तीसाठी ‘प्रोटिन पावडर’ घेण्याची खरोखर गरज आहे? कोणासाठी ती उपयुक्त? कोणते दुष्परिणाम?
  • सुरुवातीला मोहरीचे तेल गरम करा आणि नंतर ते थोडे थंड करून, काचेच्या बाटलीत भरून ठेवा.
  • मग हिरवी मिरची धुऊन, कपड्याने पुसून पूर्णपणे कोरडी करा.
  • आता मिरची मधोमध कापून मोहरीच्या तेलात ठेवा.
  • त्यानंतर भरणीचे झाकण बंद करा.
  • जेव्हा गरज असेल तेव्हा यातून हिरव्या मिरच्या काढून, त्या वापरू शकता.

हिरवी मिरची व्हिनेगरमध्ये कशी साठवायची?

तुम्ही हिरवी मिरची व्हिनेगरमध्येही ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला हिरव्या मिरच्या कापून थेट व्हिनेगरच्या बाटलीत ठेवाव्या लागतील. काही काळ भरणी बंद ठेवा आणि गरज असेल तेव्हा वापरा. हिरवी मिरची व्हिनेगरमध्ये ठेवण्याचा एक फायदा म्हणजे तिची चव आणि त्यातील व्हिटॅमिन-सी आणखी वाढते; ज्यामुळे तुम्ही भाज्यांमध्ये तडका घालून, त्यांना सॅलडमध्ये आणि लोणचे म्हणून खाऊ शकता. तसेच त्यात असलेली हिरवी मिरची लवकर खराब होत नाही, त्यामुळे तुम्ही ती दीर्घकाळ वापरू शकता.

हेही वाचा: भेसळयुक्त कुंकवामुळे केस पांढरे होत आहेत? मग घरीच बनवा नैसर्गिक कुंकू; जाणून घ्या पद्धत…

फ्रिजशिवाय हिरवी मिरची कशी साठवायची?

हिरव्या मिरचीचा अतिरिक्त ओलावा टिकवून ठेवण्यासाठी कागदाचा वापर करा आणि तो सुकू द्या. नंतर या हिरव्या मिरच्या छिद्रे असलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा. त्यामुळे हवा खेळती राहून, मिरच्यांना खराब होण्यापासून प्रतिबंधित करील. याव्यतिरिक्त तुम्ही हिरवी मिरची कापून, नंतर हवेत ती वाळवून ठेवू शकता. अशा प्रकारे तुम्ही हिरवी मिरची खराब होण्यापासून वाचवू शकता.

Story img Loader