simple trick to keep potatoes from sprouting : ‘कोणती भाजी बनवायची,’ असा प्रश्न समोर उभा राहिला की, पटकन आठवणारा भाजीचा प्रकार म्हणजे बटाटा, कांद्याची भाजी. या दोघांपासून फक्त भाजीच नाही, तर कांद्यापासून पकोडे, तर बटाट्यापासून चिप्स, फ्राईज, भजी अms अनेक पदार्थ बनवता येतात. मात्र, अडचण तेव्हा निर्माण होते, जेव्हा साठवणुकीसाठी आणलेले कांदे मऊ, तर बटाटे अनेकदा मोड / अंकुर येऊन खराब होतात. हे टाळण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत.
बटाट्यांना कोंब का येतात?
बटाटा हा जिवंत कंद (Tuber आहे. त्यामुळे तो बराच काळ ठेवला किंवा उष्ण आणि प्रकाश असलेल्या ठिकाणी ठेवला, तर त्याला कोंब (अंकुर) फुटू शकतात. विशेषतः बटाटा जास्त दिवस साठवून ठेवल्यास, त्यावर अंकुर येण्याची शक्यता वाढते.
बटाटा साठवताना लक्षात ठेवा खालील गोष्टी…
प्रकाश
बटाटे स्वयंपाकघरातील स्वयंपाकघरातील ओट्यावर किंवा सतत प्रकाश असलेल्या ठिकाणी साठवणे टाळा. प्रकाशामुळे बटाटे हिरवे होऊ शकतात आणि त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. याउलट बटाटे अंधार असेल तिथे किंवा हवेशीर ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करा.
अति उष्णता
अति उष्ण वातावरणात बटाट्यांना लवकर कोंब येऊ शकतात किंवा त्यांचा पोत बदलू शकतो. त्यामुळे गॅस स्टोव्ह, सूर्यप्रकाश, खिडकी किंवा उष्णता निर्माण करणाऱ्या उपकरणांजवळ बटाटे साठवणे टाळा.
प्लास्टिकची पिशवी
बाजारातून बटाटे आणल्यानंतर जास्त काळ प्लास्टिकच्या पिशवीत किंवा पाऊचमध्ये ठेवल्यास हवा खेळती राहत नाही आणि ओलावा साचल्यामुळे बटाटे खराब होण्याचा धोका वाढतो. टोपली, जाळीची पिशवी किंवा हवाबंद डब्यात बटाटे ठेवा.
कांदे मऊ का होतात?
कांदे सिंकजवळ, ओल्या टोपलीत, जास्त आर्द्रता असलेल्या ठिकाणी साठवू नका. खरेदी केल्यानंतर कांदे ओले असल्यास, ते पूर्णपणे सुकू द्या.
कांदे ओलाव्याच्या संपर्कात आल्यास किंवा त्यांना योग्य तेवढी खेळती हवा न मिळाल्यास ते हळूहळू मऊ होऊ शकतात. कधी कधी सडलेल्या कांद्यासोबत ठेवलेले इतर कांदेही लवकर खराब होतात.
बंद डबा
कांदे हवाबंद डब्यात किंवा बंद प्लास्टिकच्या पिशवीत ठेवल्यास त्यात ओलावा अडकून राहू शकतो. कांद्यांसाठी कोरडी आणि हवेशीर जागा सर्वोत्तम असते.
खराब कांदे
जर एखादा कांदा खूप मऊ किंवा खराब झालेला दिसत असेल, तर तो ताबडतोब फेकून द्या.
बटाटे आणि कांदे जास्त काळ टिकविण्यासाठी ‘या’ चुका टाळा.
- दोन्ही एकाच बंद प्लास्टिकच्या पिशवीत ठेवू नका.
- ओले किंवा दमट बटाटे आणि कांदे एकत्र साठवू नका.
- सूर्यप्रकाश, जास्त उष्णता आणि आर्द्रतेपासून दूर ठेवा.
- साठवणुकीसाठी कोरडी, थंड आणि हवेशीर जागा निवडा.
- बटाटे हिरवे झाले असतील किंवा त्यांना जास्त कोंब आले असतील. तर ते खाणे टाळा.
