तुम्हाला तुमच्या लहान बाळासोबत प्रवास करताना भीती वाटणे साहजिक आहे. नवजात बाळ किंवा लहान मुलासोबत प्रवास करणे हे आव्हानात्मक ठरु शकते. म्हणूनच लहान बालकांसोबत प्रवास करताना पूर्वतयारी करणे अतिशय आवश्यक आहे. असे केल्याने प्रवास केवळ सुरक्षितच नाही तर आनंददायीही ठरतो. आज आपण लहान मुलांसोबत प्रवास करताना फॉलो करायच्या टिप्स जाणून घेऊया.

  • प्रवास सुरू करण्याआधीच मुलाचं डायपर चेक करा आणि गरज असल्यास प्रवास सुरू होण्यापूर्वीच ते बदला. असे केल्याने प्रवासात असताना लगेचच डायपर बदलण्याची गरज भासणार नाही. 
  • जर तुम्ही कारने प्रवास करत असाल तर बाळाचे डायपर बदलण्यासाठी वारंवार ब्रेक घ्या. असे न केल्यास बाळाच्या त्वचेवर पुरळ येऊ शकते. तसेच त्वचा लाल होऊ शकते. बाळाला जास्त वेळ ओले ठेवल्याने ते आजारी पडू शकते. म्हणून, वेळोवेळी डायपर बदलण्याचा सल्ला दिला जातो. 
  • तुमच्या बाळाच्या झोपेच्या पॅटर्नशी जुळवून प्रवासाची वेळ निश्चित करा. रात्रीच्या झोपण्याच्या वेळेनुसार प्रवास निश्चित करणे योग्य राहील. कारण सकाळी लवकर प्रवासाला सुरुवात केल्यास बाळाची झोप मोड होऊ शकते. 
  • प्रवासात हॉर्नचा मोठा आवाज झाल्यास मूल गोंधळून जाऊ शकते. अशावेळी तुम्ही लहान मुलासाठी आवाजाची तीव्रता कमी करणारे हेडफोन वापरून पाहू शकता जेणेकरून प्रवास करताना त्याला चांगली झोप मिळेल. 

Parenting Tips : लहान मुलांना डायपर घालताना केलेल्या ‘या’ चुका ठरू शकतात हानिकारक; त्वरित करा सवयींमध्ये बदल

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
diy best safe summer travel tips and tricks health tips for summer vacation
उन्हाळ्याच्या सुटीत कुटुंबासह फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? मग जाताना ‘या’ चार गोष्टी आठवणीने बरोबर घ्या
How to Prevent Motion Sickness in Children
तुमच्या मुलांना कार, बसमधून प्रवास करताना उलट्या होतात का? डाॅक्टरांनी सांगितलेले करा ‘हे’ सोपे उपाय; प्रवास होईल आनंदात
  • तुमच्या जोडीदारासोबत किंवा कुटुंबातील सदस्यासोबत प्रवास करा. असे केल्याने तुम्हाला बाळाला उत्तमरित्या हाताळता येईल. तसेच, इतर माणसं लहानग्यांची काळजी घेत असताना तुम्ही थोडा वेळ काढून आराम करू शकता. 
  • आरामदायी आसन निवडा. ते तुम्हाला अधिक आरामशीर प्रवास करण्यात मदत करते. विंडो सीटमुळे बऱ्याचदा सहप्रवाशांची गैरसोय होऊ शकते त्यामुळे विचारपुर्वक सिट निवडा. 
  • विमान प्रवास करताना, तुम्ही बाळाला घेऊन वेळेत पोहोचले पाहिजे आणि इतरांच्या आधी विमानात चढायला हवे. असे केल्याने तुम्हाला बाळासोबत स्थिरस्थावर होण्यास मदत होऊ शकते. 
  • अनेकदा फ्लाइट्सच्या विलंबामुळे तुमच्या प्रवासाची लांबी काही तासांनी वाढू शकते. तुम्ही बाळाला लागणारा खाऊ, खेळणी, दूध, डायपर जवळच ठेवा जेणेकरुन अचानक गरज भासल्यास तुमचा गोंधळ उडणार नाही. 
  • तुमच्या बाळाला आरामदायी कपडे घाला. जर बाळाला थंडी वाजत असेल तर ब्लँकेट सोबत ठेवा.
  • प्रवास करताना, बाळाला आनंदी आणि व्यस्त ठेवणे अत्यावश्यक असते. बाळाची काही आवडती खेळणी आणि पुस्तके सोबत ठेवा. जेणेकरून बाळ रडू लागल्यास त्याचे मनोरंजन करता येईल.
  • लहान बाळांना जंतुसंसर्ग चटकन होतो. त्यामुळे त्यांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. त्यांना वरचेवर नीट पुसून घ्या. त्यांचे कपडेही अधूनमधून बदला. घामामुळे किंवा ओलसरपणामुळे बॅक्टेरिया संसर्ग होण्याची शक्यता असते. म्हणूनच बाळांचे कपडे स्वच्छ आणि कोरडे ठेवा.
  • विमान किंवा इतर कोणताही प्रवास असो, आजकाल बर्‍याच ठिकाणी रेस्टरूममध्ये बाळासोबत असलेल्या आईसाठी खास सोय केलेली असते. या सोयीचा फायदा घ्या. बाळाचे कपडे बदलण्यासाठी, स्तनपान देण्यासाठी तुम्हाला या सोयींचा फायदा होऊ शकतो.

डॉ. प्रशांत मोरलवार, 

सल्लागार बालरोगतज्ञ, मदरहुड हॉस्पिटल, खारघर