तुम्हीही ‘या’ पद्धतीने मास्क वापरताय? करोनाला आमंत्रण देऊ नका; जाणून घ्या मास्क वापरण्याची योग्य पद्धत

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) ने मास्कच्या वापराबाबत अनेक सूचना दिल्या आहेत.

करोनाचा संसर्ग दररोज लाखो लोकांना होत आहे. करोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी तज्ज्ञांकडून मास्क लावण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र काही लोक मास्कचा योग्य वापर करत नाहीत. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) ने मास्कच्या वापराबाबत अनेक सूचना दिल्या आहेत.
त्यांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही दिवसभर मास्क वापरत असाल तर तो पुन्हा घालू नये. ते घातक ठरू शकतं. यासोबतच संपूर्ण तोंड झाकले जाईल असाच मास्क वापरावा. करोनापासून बचाव करण्यासाठी मास्क हे सर्वात मोठे शस्त्र आहे.

हेही वाचा – अवांतर : आहारतज्ज्ञांची मते आणि आयुर्वेद

मास्क वापरताना या गोष्टी लक्षात ठेवाच

  • जर तुम्ही थोडा वेळ मास्क घातला असेल तर तो स्वच्छ धुवून पुन्हा वापरता येईल.
  • मास्क जर फाटला असेल किंवा सैल झाला असेल तर तो वापरू नये.
  • खूप मोठा किंवा खूप लहान मास्क वापरू नये.
  • मास्क सतत बदलत राहिले पाहिजे.
  • मास्क काढल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
  • मास्क काढताना त्याला तोंडाच्या भागाने स्पर्श करू नका.
  • मास्क लावल्यानंतर खोकला किंवा शिंक येत असेल तर तो मास्क पुन्हा वापरू नये.
  • मास्क पुन्हा वापरायचा असेल तर तो खिशात किंवा टेबलावर ठेवू नये. कागदाच्या पिशवीत दुमडून ठेवा.
  • जर मास्कमध्ये ओलावा असेल तर तो वापरू नये. नेहमी कोरडा मास्क वापरावा
  • सैल, अयोग्य आणि गलिच्छ मास्क वापरू नका.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How to use mask correctly covid 19 cdc vsk

Next Story
Health Tips : मधुमेहावर ‘या’ चार औषधी वनस्पती ठरतात रामबाण उपाय; रक्तातील साखर ठेवतात नियंत्रणात
फोटो गॅलरी