HPV Or Tobacco Linked Cancer: डोके आणि मानेचा कर्करोग ही एक अतिशय सामान्य समस्या असून, याच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ldयापैकी काही कर्करोग ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) संसर्गाशी संबंधित आहेत; तर तोंडाच्या कर्करोगाची लक्षणीय प्रकरणे तंबाखू आणि मद्यपानामुळेदेखील होतात. हे दोन्ही गंभीर आजार असले तरी ते भिन्न आहेत आणि त्यांचे लवकर निदान होणे आवश्यक आहे. HPV मुळे होणारा घशाचा कर्करोग आणि तंबाखूमुळे होणारा तोंडाचा कर्करोग हे एकच आजार नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर वेगवेगळे उपचार केले गेले पाहिजेत.
तोंडाचा आणि मानेचा कर्करोग यांच्यात काय फरक?
तोंडाचा आणि मानेच्या कर्करोगाचे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. दोन्हीचा संबंध तंबाखू आणि संसर्गाशी आहे. हा कर्करोग आता अशा लोकांमध्येही दिसून येत आहे, ज्यांनी कधीही तंबाखूचे सेवन केलेले नाही.
तंबाखूमुळे कर्करोग कसा होतो?
भारतात एचपीव्हीशी संबंधित घशाच्या कर्करोगाचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे. तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या तोंडाच्या कर्करोगाचा परिणाम सामान्यतः ओठ, जीभ, गालांच्या आतील बाजू, हिरड्या आणि तोंडाच्या तळभागावर होतो.
कसे ओळखावे?
त्याच्या धोकादायक लक्षणांमध्ये दीर्घकाळ न भरणारे तोंडातील व्रण, पांढरे किंवा लाल पुरळ, सतत वेदना, रक्तस्राव किंवा एखादा पदार्थ चघळण्यात येणारी अडचण यांचा समावेश होतो.
घशाच्या कर्करोगाची लक्षणे
एचपीव्हीशी संबंधित घशाचा कर्करोग बहुतेकदा जिभेच्या मागील भागात विकसित होतो. सतत घसा खवखवणे, गिळण्यास त्रास होणे, आवाज बसणे, कानात दुखणे किंवा मानेमध्ये वेदनाविरहित गाठ येणे ही लक्षणे असू शकतात.
आपण स्वतःचे संरक्षण कसे करू शकतो?
या कर्करोगांना प्रतिबंध करण्यासाठी, त्यांच्या मूळ जोखमीच्या घटकांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. तंबाखूचे सेवन टाळणे, मद्यपान टाळणे आणि तोंडाची चांगली स्वच्छता राखणे यांमुळे तोंडाच्या कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.
एचपीव्ही लसीकरण किती महत्त्वाचे?
कर्करोग प्रतिबंधासाठी एचपीव्ही (HPV) लसीकरण आवश्यक आहे. कारण- काहीही असले तरी लवकर निदान आणि उपचार आवश्यक आहेत. तोंड किंवा घशाशी संबंधित कोणतीही लक्षणे दोन आठवड्यांपर्यंत टिकून राहिल्यास, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
