Shravan 2022 : Manglagauri Funny Marathi Ukhane | Loksatta

Shravan 2022: यंदाच्या मंगळागौरी गाजवा; ‘हे’ ट्रेंडी उखाणे घेऊन वेधा सर्वांचं लक्ष

यंदा श्रावणात २, ९, १६, २३ ऑगस्ट या चार मंगळवारी मंगळागौरी पूजनाचा मुहूर्त आहे, मंगळागौरी देवीचे विधिवत पूजन करून त्या रात्री फुगड्या झिम्मा यांसारखे पारंपरिक खेळ खेळले जाते.

Shravan 2022: यंदाच्या मंगळागौरी गाजवा; ‘हे’ ट्रेंडी उखाणे घेऊन वेधा सर्वांचं लक्ष
मंगळागौरीसाठी खास ट्रेंडी उखाणे (File Photo)

पूजिते मंगळागौर.. काय मग यंदाच्या श्रावणात मंगळागौर गाजवायला तयार आहात ना? काळ बदलला, आता काय मुली मॉडर्न झाल्या, आजकालच्या मुलींना कुठे पारंपरिक खेळांची हौस.. अशा सगळ्या गैरसमजूतींना छेद देत, हल्ली अनेक “मॉडर्न मुली” मंगळागौरीकडे आकर्षित होत आहेत. अनेक ठिकाणी तर मंगळागौरीच्या खेळांच्या स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या जातात. यंदाच्या श्रावणात तुम्हीही मंगळागौर साजरी करणार असाल तर आतापर्यंत नऊवारी साडी, दागिने, हेअरस्टाईल अशी सगळी तयारी केलेली असेल पण अनेकदा विसरली जाणारी गोष्ट म्हणजे उखाणे. मंगळागौरीचे खेळ म्हणजे उखाण्यांचा आग्रह केलाच जातो. अशात आयत्या वेळी तुमची पंचाईत होऊ नये आणि शंकराच्या पिंडीवर बेल वाहण्यावरच तुमची गाडी अडकू नये म्हणून आम्ही तुमच्यासाठी काही खास ट्रेंडी उखाणे घेऊन आलो आहोत. हे उखाणे जपून ठेवा आणि तुमच्या इतर मैत्रिणींसोबतही आवर्जून शेअर करा.

यंदा श्रावणात २, ९, १६, २३ ऑगस्ट या चार मंगळवारी मंगळागौरी पूजनाचा मुहूर्त आहे, मंगळागौरी देवीचे विधिवत पूजन करून त्या रात्री फुगड्या झिम्मा यांसारखे पारंपरिक खेळ खेळले जाते. या खेळांमध्येच उखाण्याचा आग्रह धरला जातो, चला तर मग पाहू असेच काही हटके उखाणे..

श्रावण महिन्यात सजला मंगळागौरीचा थाट
… रावांचं नाव घ्यायला मी कशाला बघू वाट

मंगळागौरीच्या पूजेला उखाणे घेण्याचा कायदा
.. रावांचं नाव मी घेईन, पण तुमचा काय फायदा
वन.. टू… थ्री… .. रावांचं नाव घेते करा मला फ्री

श्रावण सोमवारी वाहिली जाणारी शिवमूठ म्हणजे नेमकं काय? ‘हा’ मंत्रोच्चार करणे मानले जाते शुभ

मंगळागौरीचे खेळ खेळू, फुगड्या, कोंबडा, पिंगा
.. रावांचं नाव घ्यायला मला कधीही सांगा

नऊवारी नेसले, केसात माळला मोगरा
.. आणि माझ्या जोडीवर साऱ्यांच्या नजरा

हंड्यावर हंडे सात
त्यावर ठेवली परात
परातीत होते सातू
सातूचा केला भात
भातावर वरण, वरणावर तुपाची धार
तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा
जोड्यात हलगडी, हलगाडीत बलगडी
बलगडीत पिंजरा, पिंजर्यात रघु
राघूच्या तोंडी उंबर… रावांचं नाव ऐकलंत ना, मग काढा रुपये शंभर..

तर मैत्रिणींनो, रोजच्या दगदगीतून तुमच्यासाठी थोडा वेळ काढा. सजण्याची, मिरवण्याची, खेळण्याची ही सोन्यासारखी संधी दवडू नका. तुम्हाला सगळ्यांना मंगळागौरी व श्रावण मासाच्या शुभेच्छा!

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
आरोग्यवार्ता : स्तनपानामुळे आईलाही लाभ

संबंधित बातम्या

बदाम खाल्ल्याने ‘हे’ ४ त्रास १०० च्या वेगाने वाढू शकतात! एका दिवसात किती व कसे बदाम खाणे आहे योग्य?
मूगडाळीचे सेवन ‘या’ ८ आजारांमध्ये ठरू शकतं विषासमान! श्वास घेणं होऊ शकतं कठीण, वाचा तज्ज्ञांचा सल्ला
‘या’ ३ आजारात काजू करू शकतो विषासारखं काम; एका दिवसात किती काजू खाणे योग्य? पाहा तज्ज्ञांचा सल्ला
‘या’ तीन आजारांमध्ये मनुके ठरतात तुमचे शत्रू! डॉक्टरांकडून जाणून घ्या काळे मनुके भिजवून खावे की सुके?
तोंडाची दुर्गंधी ठरू शकते ‘या’ जीवघेण्या आजारांचे लक्षण; वेळीच करा ‘हे’ उपाय

व्हिडिओ

ताज्या बातम्या
व्हॉट्सअ‍ॅपमधून महत्वाचा फोटो, व्हिडिओ डिलीट झाला? असे परत मिळवा
विश्लेषण : कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्रारला अमेरिकेत अटक, सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाशी काय आहे संबंध?
IPL 2023 Auction: ५५ खेळाडूंवर लागणार करोडोंची बोली; तर दोन-दीड कोटीच्या गटात एकाही भारतीयाला स्थान नाही
गणेश नाईक यांना दिलासा? बलात्काराच्या आरोपासह आणखी एक प्रकरणात पुरावे सापडले नसल्याचा पोलिसांचा अहवाल
“सिगारेटचे चटके…” सलमान खानवर एक्स गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप