शरीरातील साखर वाढणं किंवा कमी होणं या दोन्ही गोष्टी आरोग्याच्या दृष्टीकोनातून धोकादायक आहेत. रक्तातील साखर कमी होण्याला वैद्यकीय भाषेत हायपोग्लायसेमिया म्हणतात. हायपोग्लायसेमिया ही अशी स्थिती आहे जेव्हा रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी ७२ mg/dL पेक्षा कमी होते. साखर कमी होणे ही एक धोकादायक स्थिती आहे, ज्यावर उपचार न केल्यास रुग्णाचा जीवही धोक्यात येऊ शकतो.

हायपोग्लायसेमियाची कारणे
हेल्थलाइनच्या वृत्तानुसार, मधुमेहाच्या रुग्णांमध्ये हायपोग्लायसेमिया ही एक सामान्य समस्या आहे. रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यामागची प्रमुख कारणं जास्त औषधे घेणे, न खाणे किंवा कमी खाणे, अधिक व्यायाम करणे ही आहेत. आपल्या शरीरातील सामान्य रक्तातील साखरेची पातळी ८०-११० mg/dL दरम्यान असते आणि ९० mg/dL ही सरासरी रक्तातील साखरेची पातळी मानली जाते. शरीरातील ग्लुकोज आणि इन्सुलिनच्या असंतुलनामुळे हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. साखर आपल्या शरीराला ऊर्जा देते, जेव्हा शरीरात साखरेची कमतरता असते तेव्हा रुग्णाला थकवा जाणवतो.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…

रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यामुळे रुग्णाला येणाऱ्या समस्या

  • हायपोग्लायसेमियामुळे रुग्णाला चक्कर येऊ शकते.
  • अस्वस्थता आणि घाम येण्याच्या तक्रारी असू शकतात. घाबरल्यामुळे रुग्ण बेशुद्ध होऊ शकतो.
  • हायपोग्लायसेमियामुळे, रुग्णाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. यामुळे रुग्ण कोमात देखील जाऊ शकतो.

गुगल पे, फोन पे, पेटीएमसारखे यूपीआय पेमेंट् विना इंटरनेट करू शकता; जाणून घ्या प्रोसेस

हायपोग्लायसेमियावरील उपचार

  • साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी शरीर सक्रिय ठेवा.
  • कमी साखरेची लक्षणे ओळखा, थकवा किंवा अशक्तपणा जाणवल्यास लगेच साखर तपासा. जर तुमची साखर कमी होत असेल तर लगेच गोड चॉकलेट आणि गोड पदार्थांचे सेवन करा.
  • जर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी ७० mg/dl पेक्षा कमी असेल आणि तुम्ही शुद्धीत असाल तर १५-२० ग्रॅम साखर खा, साखरेची पातळी लगेच ठीक होईल.
  • जर तुम्ही हायपोग्लायसेमियाचे रुग्ण असाल तर नेहमी तुमच्यासोबत कँडी, मिठाई किंवा फळांचा रस सोबत ठेवा. शरीरात अशक्तपणा जाणवताच ताबडतोब उपचार करा.
  • हायपोग्लायसेमियावर नियंत्रण ठेवण्यासाठी नाश्त्यात गोड पदार्थ खा.
  • रक्तातील साखरेची पातळी खूप कमी असल्यास ग्लुकोजचे इंजेक्शन घ्या.
  • तुमच्या साखरेची नियमित तपासणी करा.