scorecardresearch

Hyundai Aura vs Honda Amaze: कमी बजेटमध्ये अधिक परवडणारी आणि स्टायलिश सेडान कोणती? जाणून घ्या

हुंडई ऑरा आणि होंडा अमेज सेडान या दोघांची किंमत ते फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सपर्यंत संपूर्ण तपशील जाणून घेऊ शकाल.

Hyundai Aura vs Honda Amaze: कमी बजेटमध्ये अधिक परवडणारी आणि स्टायलिश सेडान कोणती? जाणून घ्या
(फोटो- HONDA and HYUNDAI)

कार सेक्टरच्या हॅचबॅक सेगमेंटमध्ये मायलेज असलेल्या बजेट कार्सनंतर, सर्वात जास्त मागणी मिड-रेंज सेडान कार आहेत. जर तुम्ही कमी बजेटमध्ये प्रीमियम फीचर्स असलेली सेडान कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही कमी बजेटमध्ये येणाऱ्या दोन सेडान कारची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.हुंडई ऑरा आणि होंडा अमेज सेडान यांची तुलना करत आहेत, ज्यामध्ये तुम्ही या दोघांची किंमत ते फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सपर्यंत संपूर्ण तपशील जाणून घेऊ शकाल.

हुंडाई ऑरा (Hyundai Aura)

ही त्याच्या कंपनीच्या सेडान सेगमेंटमधील एक लोकप्रिय कार आहे, जी कमी किंमतीमुळे पसंत केली जाते. कंपनीने त्याचे पाच व्हेरियंट बाजारात आणले आहेत. या कारमध्ये ११९७ सीसी चे इंजिन देण्यात आले आहे, ज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिनचे तीन पर्याय आहेत. त्याच्या पेट्रोल इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, हे १.० लिटर पॉवर इंजिन आहे जे ८३ पीएस पॉवर आणि ११४ एनएम पीक टॉर्क जनरेट करते, जे पाच स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.कारच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात ८.० इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम आहे जी एंड्रॉयड ऑटो आणि एप्पल कारप्लेला सपोर्ट करते.

( हे ही वाचा: आता Whatsapp वरून पेमेंट केल्यावर मिळणार ‘इतक्या’ रुपयांचा कॅशबॅक; जाणून घ्या ऑफर )

याशिवाय वायरलेस चार्जर, ऑटो क्लायमेट कंट्रोल, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, मागील वायपर, उंची अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, पुढच्या सीटवर ड्युअल एअरबॅग्ज, आयएसओ फिक्स्ड चाइल्ड सीट अँकर आणि मागील पार्किंग सेन्सर यांसारखी फीचर्स कारमध्ये देण्यात आली आहेत.

या कारच्या मायलेजबाबत हुंडईचा दावा आहे की ही कार २० किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते. या सेडानची सुरुवातीची किंमत ५.९९ लाख रुपये आहे जी टॉप मॉडेलमध्ये ९.३६ लाख रुपयांपर्यंत जाते.

( हे ही वाचा: ‘या’ ३ राशीचे लोक मनाऐवजी ऐकतात डोक्याचं; व्यावहारिक राहून घेतात निर्णय! )

होंडा अमेज (Honda Amaze )

ही कमी बजेटमध्ये येणारी प्रीमियम सेडान आहे, प्रीमियम फीचर्स आणि स्पेसिफिकेशनसाठी प्राधान्य दिलेली आहे, जी कंपनीने तीन प्रकारांमध्ये लॉंच केली आहे.होंडा अमेज मध्ये कंपनीने १४९८ सीसी चे इंजिन दिले आहे ज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्हीचा पर्याय देण्यात आला आहे. त्याच्या पेट्रोल इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, हे १,२ लिटर इंजिन आहे जे ९० पीएस पॉवर आणि ११० एनएम पीक टॉर्क जनरेट करते, जे पाच स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, होंडा अमेजमध्ये सात इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, क्रूझ कंट्रोल, फ्रंट सीटवर ड्युअल एअरबॅग्ज, आईएसओ फिक्स्ड चाइल्ड सीट अँकर आणि मागील पार्किंग सेन्सर यांसारखे फीचर्स आहेत.

( हे ही वाचा: रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त फोन बाजरात; जाणून घ्या किंमत )

कारच्या मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही सेडान १९ किलोमीटरचं मायलेज देते. त्याची सुरुवातीची किंमत ६.३२ लाख रुपये आहे, जी टॉप मॉडेलमध्ये ११.१५ लाख रुपयांपर्यंत जाते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या