scorecardresearch

Premium

Hyundai Santro पासून i10 Nios पर्यंत कंपनी देतेय भारी सवलत, जाणून घ्या कोणत्या मॉडेलवर किती सवलत देण्यात आलीय

ह्युंदाई सँट्रो ते आय 10 आणि सीएनजी कारच्या कंपनी कडून या उत्सवात मोठ्या प्रमाणात सूट देत आहे.

lifestyle
Hyundai Santro पासून i10 Nios पर्यंत कंपनी देतेय भारी सवलत

भारतात उत्सवाचे पर्व सुरू झाले आहे. उत्सवाच्या दरम्यान अनेक गोष्टींवर सवलती दिल्या जात असतात. अशातच आता वाहन उत्पादकांनी सवलती जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. देशातील दुसरी सर्वात मोठी वाहन कंपनी ह्युंदाई त्याच्या काही लोकप्रिय मॉडेल्सवर प्रचंड सूट देत आहे. तुम्हाला हे देखील माहिती आहे की ह्युंदाई कारची मागणी खूप जास्त होत आहे, म्हणून जर तुम्ही देखील ह्युंदाई मॉडेल घरी आणण्याची योजना करत असाल तर कदाचित ही तुमच्यासाठी योग्य वेळ असेल. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या मॉडेलवर कंपनीकडून किती सवलत देण्यात आलीय.

ह्युंदाई सँट्रो (Hyundai Santro)

ह्युंदाई कंपनी त्यांच्या सर्वात लहान कार असलेली सॅन्ट्रोवर एक्सचेंज बोनससह रोख सवलत देत आहे. सँट्रो कारवर ग्राहकांना १०,००० रुपयांची रोख सवलत देत आहे. तर १०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ५,००० रुपयांचे कॉर्पोरेट लाभ देण्यात येत आहे. ही सर्व सवलत फक्त बेस-स्पेक एरा ट्रिमवर लागू असताना, ग्राहक उच्च स्पेसिफिक मॉडेलवर २५,००० रुपयांपर्यंत रोख सवलत कंपनीकडून देण्यात येत आहे.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Case File in this Matter
मुंबईतल्या मराठी महिलेला ‘मराठी’ म्हणून हिणवत घर नाकारणाऱ्या पिता-पुत्रावर गुन्हा दाखल
Royal Enfield Bullet 350 launched
नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…
rohit pawar
मध्यरात्री २ वाजता रोहित पवारांच्या कंपनीवर मोठी कारवाई, दोन नेत्यांवर आरोप करत म्हणाले…

ह्युंदाई आय १० निओस (Hyundai i10 Nios)

ह्युंदाई ग्रँड आय १० निओस ही कार कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कौटुंबिक हॅचबॅक आहे. या कारवर असलेल्या सवलतीबद्दल बोलायचे झाले तर, ते १.२ लिटर ट्रिमसह उपलब्ध करण्यात आली आहे. या कारवर तुम्हाला १०,००० अपफ्रंट रोख सवलत दिली जात असून १०,००० एक्सचेंज बोनस आणि ५,००० रुपये कॉर्पोरेट बोनसचा लाभ देण्यात येत आहे. तर कंपनीने दुसरीकडे ग्राहकांसाठी टर्बो ट्रिमसाठी रोख सवलत वाढवून ३५,००० रुपये इतकी करण्यात आली आहे. तर एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंटमध्ये कोणताही बदल करण्यात आले नाही.

ह्युंदाई ऑरा (Hyundai aura)

दक्षिण कोरियन कार निर्मात्याकडून सब-४ मीटर सेडान देखील मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे. यात ग्राहकांना १०,००० रुपयांच्या रोख नफ्यासह खरेदी केले जाऊ शकते. ही कार त्याच्या १.२ लीटर व्हेरिएंटसाठी वैध आहे. सोबत ३५,००० रुपयांची रोख सवलत टर्बो ग्रेडवर उपलब्ध केली जात आहे. तथापि दोन्ही व्हेरिएंटवर १०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ५,००० रुपयांचा कॉर्पोरेट बोनस देण्यात येत आहे.

ह्युंदाई कोना (Hyundai kona)

सध्या कंपनी फक्त कोनाच्या उर्वरित MY2020 स्टॉकवर सवलत देत आहे. या कारच्या खरेदीवर तुम्ही १.५ लाख रुपयांपर्यंत लाभ घेऊ शकता.

ह्युंदाई सीएनजी कार (Hyundai cng car)

सँट्रो, ग्रँड आय १० निओस आणि ऑरा या सीएनजी मॉडेल्समध्ये १०,००० रुपयांचा एक्सचेंज बेनिफिट आणि ५००० रुपयांचा कॉर्पोरेट बोनस समाविष्ट करण्यात आले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hyundai santro to i10 and cng cars company is offering massive discount this festival scsm

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×