Uric Acid Symptoms : युरिक अ‍ॅसिड हे शरीरात तयार होणारे एक नैसर्गिक टाकाऊ घटक आहे जे प्युरिन नावाच्या प्रोटीन पचल्यानंतर तयार होते. जे किडनीच्या मदतीने फिल्टर होऊन शरीराबाहेर टाकले जाते पण समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा शरीर ते फिल्टर करून शरीराबाहेर टाकू शकत नाही. अशा परिस्थतीमध्ये रक्तामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढते ज्यामुळे सांध्यामध्ये वेदना, सूज आणि संधिवाताची समस्या वाढू शकते.

शरीरात युरिक अ‍ॅसिड वाढल्यास आहारात बदल करण्याचा सल्ला दिला जातो. बऱ्याचदा लोकांना वाटतं की फक्त मांसाहार किंवा बाहेरचं खाल्ल्यानेच युरिक अ‍ॅसिड वाढतं. पण NDTV च्या एका वृत्तानुसार, कानपूर येथे राहणारे ३८ वर्षीय गोपाळ सिंह हे नेहमीच युरिक अ‍ॅसिडच्या वाढत्या पातळीचा त्रास होतो. गोपाळ सिंह यांनी सांगितले की, ते मांसाहार (नॉनव्हेज) करत नाहीत आणि बाहेरील अन्नपदार्थ खाणेही टाळतात; तरीही त्यांच्या शरीरातील युरिक अ‍ॅसिड का वाढते, असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यांच्या रोजच्या आहारात डाळ, भात, चपाती आणि भाजी अशा साध्या, घरगुती जेवणाचा समावेश असतो. तरीही त्यांच्या शरीरात युरिक अ‍ॅसिडची पातळी का वाढत आहे हे त्यांना समजत नव्हते.

डाळ हा भारतीय आहारातील महत्वाचा पदार्थ आहे. डाळ-भात खाल्याशिवाय अनेकांचे जेवणही पूर्ण होत नाही. डाळ ही आरोग्यासाठी पौष्टिक आहार मानली जाते. पण हीच डाळ शरीरातील युरीक अ‍ॅसिडची पातळी वाढण्यास कारणीभूत ठरू शकते का? रोजच्या आहारात डाळ खावी की नाही असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. तज्ज्ञांच्या मते, युरिक अ‍ॅसिड फक्त आहारातील एखाद्या पदार्थामुळे वाढत नाही तर त्यामागे शरीर कोणत्या प्रकारे कार्य करते, पाणी पिण्याची सवय, वजन आणि आहार यांची महत्त्वाची भुमिका आहे.

शरीरात युरिक ॲसिड नक्की कशामुळे तयार होते? (What exactly causes uric acid to form in the body?)

यूरिक अ‍ॅसिड एक असा पदार्थ आहे जो शरीरात प्युरिनच्या विघटनानंतर तयार होतो. जो लघवीद्वारे शरीराबाहेर टाकला जातो. पण जेव्हा शरीर गरजेपेक्षा जास्त युरिक अ‍ॅसिड तयार करते तेव्हा ते बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो ज्यामुळे त्याची पातळी सातत्याने वाढत राहते. ज्यामुळे सांध्यामध्ये वेदना होणे, सूज येणे यांसारख्या समस्या निर्माण होतात.

डाळ खाल्याने युरिक अ‍ॅसिड वाढते का? (Does eating lentils increase uric acid?)

डाळीमध्ये पुरिन आढळते पण याचा अर्थ असा नाही की डाळ खाणे सोडून दिले पाहिजे. कित्येक संशोधनातून समोर आले आहे की, वन्सपतींमधून मिळणारे प्युरिनचा परिणाम कित्येक प्रकरणांमध्ये मटन-मासे सारख्या मांसाहारातून मिळणाऱ्या प्युरिनसारखा नसतो. डाळीमध्ये प्युरिनसह प्रोटिन, फायबर सारखे इतर पौष्टिक तत्व असतात.

जर तुमची युरिक अ‍ॅसिडची पातली वाढली असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहारात बदल करता. तुम्हाला तुमच्या कोणते अन्न किती प्रमाणात खाता याकडे लक्ष द्यावे लागेल.

फक्त आहारच नाही, ‘या’ सवयींमुळेही वाढते युरिक ॲसिड ( Not just diet, these habits also increase uric acid)

  • अत्यंत कमी प्रमाणात पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील युरिक अ‍ॅसिड बाहेर टाकण्यात अडथळा येतो.
  • जास्त गोड पेय आणि जास्त साखर युक्त पेय विशेषत: फ्रुक्टोज युक्त पेय युरिक अ‍ॅसिड वाढवू शकतात.
  • जास्त वजन वाढणे किंवा शारिरीक हालचाल कमी होणे.
  • जास्त आहार घेणे किंवा क्रॅश डाएटमुळे देखील युरिक अ‍ॅसिडची पातळई वाढू शकते.
  • काही औषधांच्या सेवन आणि किडनीसंबधीत समस्यामुळे युरिक अ‍ॅसिड वाढू शकते.
  • खूप जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेले पदार्थांचे सेवन केल्यास यूरिक अ‍ॅसिडची पातळी वाढू शकते.

युरिक ॲसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी काय खावे आणि काय टाळावे? (What to eat and what to avoid to keep uric acid under control?)

काय खावे

  • दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे
  • डाळ खावे पण संतुलिक प्रमाणात.
  • आपल्या आहारात फळ किंवा भाज्यांचे सेवन वाढवा.
  • रोज नियमित चाला आणि सौम्य तीव्रतेचे व्यायाम करा.
  • जास्त वजन असल्यास कमी करा.

काय टाळावे

  • गोड पेयांचे सेवन करू नका.
  • जास्त पॅक्जेड किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा
  • गरजेपेक्षा जास्त साखरेचे सेवन टाळा