इंडस्ट्रीयल बँक ऑफ इंडिया (IDBI) या बँकेमध्ये लवकरच मेगाभरती होणार आहे. या विषयीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. या भरती अंतर्गत ९२० पदांसाठी नियुक्त्या केल्या जाणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑगस्ट २०२१ ही असणार आहे. कार्यकारी (एग्जीक्यूटीव) या पदासाठी ही भरती असणार आहे. नक्की कसा, कुठे आणि कधी अर्ज करायचा याबद्दल  अधिक तपशील जाणून घ्या.

या पदासाठी होणार भरती

कार्यकारी (Executive) या पदासाठी भरती होणार आहे.  एकूण जागा ९२० जागा आहेत. ही भरती वेगवेगळ्या शाखा आणि कार्यालयांसाठी कॉन्ट्रॅक्टच्या आधारावर होणार आहे.

WAPCOS Engineer Recruitment or Bharti For 275 Various Posts Check selection process and important details
WAPCOS Recruitment 2024: इंजिनियर्ससाठी नोकरीची संधी! ‘या’ विविध पदांसाठी भरती सुरू; ‘असा’ करा अर्ज
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
Pawan Hans released notification for Associate Helicopter Pilot posts Check Details Here
Pawan Hans Bharti 2024: पवन हंस अंतर्गत ‘या’ पदासाठी होणार भरती; चार लाखांपर्यंत मिळणार पगार, असा करा अर्ज
Kinetic Green introduces E Luna an electric scooter for gig workers
गिग’ कामगारांसाठी आता ई-लुना, कायनेटिक ग्रीन कंपनीचे पाऊल; १३० दुचाकींचे वितरण

शैक्षणिक पात्रता काय? व वयोमर्यादा किती?

कार्यकारी पदासाठी २० ते २५ या वयातील उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून  किमान ५५% गुणांसह पदवीधर असणं आवश्यक आहे. तसंच SC/ST/PWD उमेदवारांसाठी ५०% गुणांसह पदवी आवश्यक आहे. उमेदवारांकडे गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

पगार किती?

पहिलं वर्ष – २९,००० रुपये प्रतिमहिना

दुसरं वर्ष –  ३१,००० रुपये प्रतिमहिना

तिसरं वर्ष – ३४,००० रुपये प्रतिमहिना

कधीपासून आणि कुठे करू शकता अर्ज?

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख ४ ऑगस्ट २०२१ पासून सुरु होते तर शेवटची तारीख १८ ऑगस्ट ही आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करता येईल. SC/ST/PWD साठी  रु. २०० तर इतर उमेदवारांसाठी रु. १००० अर्ज शुल्क असणार आहे.

निवड प्रक्रिया कशी?

उमेदवाराची निवड ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. परीक्षेची तारीख ५ डिसेंबर २०२१ असेल.

या पदभरतीसाठी https://ibpsonline.ibps.in/idbirecaug21/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.