IDFC FIRST बँकने भारतीय नौदलासोबत एका सामंजस्य करारावर (एमओयू) सही करण्याची घोषणा केली आहे, यानुसार भारतीय नौदलामध्ये सेवेत असलेल्या व्यक्तींसाठी आणि सेवानिवृत्त सैनिकांसाठी ‘ऑनर फर्स्ट’ ही प्रीमियम बँकिंग सेवा पुरवली जाईल. ‘ऑनर फर्स्ट’ डिफेन्स अकाउंट हे सशस्त्र सेनेतील व्यक्ती आणि त्यामधील सेवानिवृत्त सैनिक यांच्या आवश्यकता लक्षात घेऊन तयार केले गेले आहे. ‘ऑनर फर्स्ट’ च्या खातेधारकांच्या सहयोगासाठी सेवानिवृत्त सैनिकांची एक समर्पित टीम आहे. ‘ऑनर फर्स्ट’ साठी तयार केलेल्या सामंजस्य करारावर भारतीय नौदलाचे कोमोडोर- वेतन आणि भत्ताचे कोमोडोर नीरज मल्होत्रा आणि IDFC FIRST बँकचे वरिष्ठ अधिकारी यांनी नवी दिल्ली येथील नौदल मुख्यालयामध्ये सह्या केल्या.

कशी आहे ही योजना?

‘ऑनर फर्स्ट’ डिफेन्स अकाऊंटच्या अंतर्गत विशेषाधिकार आणि सुविधांचा समावेश केला आहे. जसे की, ५ टक्के व्याज मिळणारे झिरो बॅलन्स वेतन खाते आणि आणखी चांगला युजर इंटरफेस व अनुभव देणारे नेट बँकिंग आणि ॲप.’ऑनर फर्स्ट’ खातेधारकांना विनामूल्य आणि वर्धित असा ४६ लाख रुपयांचे व्यक्तिगत दुर्घटना विमा कव्हर मिळतो, ज्यामध्ये ऑन-ड्यूटी आणि ऑफ-ड्यूटी या दोन्हीप्रकारच्या घटना/दुर्घटनांचा समावेश आहे. यामध्ये फक्त आकस्मित किंवा दुर्घटनेमुळे होणाऱ्या मृत्यूचा समावेश नसून, संपूर्ण किंवा आंशिक कायमस्वरूपी विकलांगता यांचाही समावेश आहे. या वैयक्तिक दुर्घटना विमा कव्हरमध्ये मुलांसाठी ४ लाखांचा शैक्षणिक अनुदान निधी आणि  लग्नाच्या कव्हरसाठी २ दोन लाखांचा निधीदेखील समाविष्ट आहे.

Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
ED
‘व्हीआयपीएस’ कंपनीची २४ कोटींची मालमत्ता जप्त; पुण्यात ‘ईडी’ची कारवाई; संचालक दुबईत पसार
Kinetic Green introduces E Luna an electric scooter for gig workers
गिग’ कामगारांसाठी आता ई-लुना, कायनेटिक ग्रीन कंपनीचे पाऊल; १३० दुचाकींचे वितरण
Kia adds two new automatic variants
बाकी कंपन्यांचे धाबे दणाणले, Kia ने सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारचे आणले २ नवे व्हेरिएंट, किंमत…

याशिवाय, या स्तरावरील इतर सर्वश्रेष्ठ सुविधांमध्ये कोणतेही वार्षिक शुल्क नसलेल्या टॉप-ऑफ-द-लाइन व्हिसा सिग्नेचर डेबिट कार्डचा समावेश आहे, १ कोटी रुपयांचे विनामूल्य हवाई अपघात विमा संरक्षण आणि डोमेस्टिक विमानतळावर तीन महिन्यांमध्ये दोनदा कॉम्प्लिमेंटरी एयरपोर्ट लाउंज वापरण्याची सुविधासुद्धा मिळेल. ‘ऑनर फर्स्ट’ डिफेन्स अकाऊंट कार्ड हरवल्यास, हरवलेल्या कार्डचे विनामूल्य दायित्व आणि दरोडा, चोरी यांसाठी फसवणूकीसाठीचे ६ लाखांचे व खरेदीच्या तारखेपासून ९० दिवसांमध्ये झालेल्या नुकसानासाठी १ लखचे संरक्षण पुरवते.

‘ऑनर फर्स्ट’ चे खातेधारक व्हेरिएबल एपीआर आणि १०X रिवॉर्ड पॉइंट्स सोबट ‘फ्री फॉर लाइफ क्रेडिट कार्ड’ साठी पात्र असतील, १.५% फॉरेक्स मार्कअप, डोमेस्टिक किंवा अंतरराष्ट्रीय विमानतळांवर निवडक स्पा आणि लाउंजचा कॉम्प्लिमेंटरी ॲक्सेस, प्रवासाचा विमा यांसोबतच आणखी इतर बरेच लाभ मिळतात. या विशेषाधिकारांमध्ये रुपये २०,००० वरील खर्चासाठी १०X रिवॉर्ड पॉइंट्स चा समावेश आहे, सर्व ऑनलाइन खर्चावर ६X रिवॉर्ड, खरेदी करणे आणि रोकड काढण्यासाठी आयुष्यभर कॉम्प्लिमेंटरी आणि व्याजमुक्त क्रेडिट कार्डचादेखील समावेश आहे.