Tamanna Bhatia 2 Burgers Weight Gain Statment :दाक्षिणात्य आणि बॉलीवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया आपल्या फिटनेससाठी ओळखली जाते. नुकतेच फराह खानच्या युट्यूब व्लॉगमध्ये गप्पा मारताना तमन्नाने सांगितले की,”महिलांना शरीरामध्ये कालांतराने बदल होणे अत्यंत सामान्य गोष्ट आहे. शुटिंग दरम्यान, तिच्या शरीरात कित्येकदा बदल दिसून येतो. लोकांना हे लक्षात घेतले पाहिजे की महिलांचे शरीर सातत्याने बदलते.
गफूरच्या शुटींगदरम्यान माझ्या शरीरात झाला खूप बदल -तमन्ना (My body changed a lot during the shooting of Ghafoor – Tamannaah
तमन्नाच्या सांगितले की, खरं तर, मला आठवतं, जेव्हा मी ‘गफूर’चं चित्रीकरण केलं, त्यानंतरही माझ्या शरीरात बदल झाला आणि तो अजूनही होत आहे. मी दोन बर्गर खाल्ले तरी त्यात बदल होतो. अभिनेत्रीने शोमध्ये बीटरूट पेस्टो पॉकेट्स बनवत असताना हे वक्तव्य केले. तिने सांगितले की आर्यन खान दिग्दर्शित The Ba**ds of Bollywood मधील “Ghafoor” गाण्याच्या शूटदरम्यान तिने हाच पदार्थ खाल्ला होता. ती म्हणाली, “मला असे काहीतरी बनवायचे होते जे लोकांना आवडेल.”
तमन्नाच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर वजन आणि डाएटसंबधीत चर्चा सुरु झाली आहे.” खरंच फक्त २ बर्गर खाल्ले तर शरीरात लगेच बदल होतो का? महिलांचे वजन वारंवार कमी -जास्त का होते आणि यामागे हार्मोनल कारण आहे का? याबाबत तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घेऊ या.
महिलांचे वजन वारंवार का कमी होते?(Why do women lose weight frequently?)
द इंडियन एक्स्प्रेसला याबाबत माहिती देताना सल्लागार आहारतज्ञ, प्रमाणित फिटनेस तज्ञ आणि पोषणतज्ञ गरिमा गोयल यांनी सांगितले की,”महिलांच्या शरीरामध्ये वजन, आकार आणि शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कित्येक कारणांमुळे होऊ शकते. याामध्ये हार्मोनल बदल होऊ शकतात, मासिक पाळीचे चक्र, तणाव, झोप पूर्ण न होणे, जास्त मीठाचे सेवन किंवा पचन संबधित बदलांचा समावेश होतो.
तज्ज्ञांच्या मते, कधी कधी बर्गर किंवा एखादा आवडीचा पदार्थ शरीरात सूज, पोटदुखी किंवा जडपणा जाणवतो, पण याचा अर्थ असा नाही की, शरीरामधील फॅट वाढले आहे.
तज्ज्ञांच्या मतानुसार, कार्बोहायड्रेट शरीरामध्ये ग्लायकोजनच्या स्वरुपात साचतात आणि ग्लायकोजनबरोबर पाणी देखील साचते. याच कारणामुळे काही खास पदार्थ खाल्यानंतर जेव्हा तुम्ही वजनकाट्यावर वजन तपासता तेव्हा वजनात थोडी वाढ दिसू शकते किंवा व्यक्तीला शरीरातील जडपणा जाणवतो.
तज्ज्ञांच्या मते महिलांमध्ये अॅस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन सारखे हार्मोन्सच्या पातळीत होणारे बदल भूक, शरीरातील पाण्याच्या पातळीचे संतुलन आणि शरीराची रचनेवर परिणाम करते. त्यामुळे कित्येक महिला कोणतेही फॅट वाढले नाही तरी त्यांचे वजन एक किंवा दोन किलोने वाढू किंवा किमी होऊ शकते. कार्बोहायड्रेट देखील वाढू शकते.
महिलांचे शरीर कायम जसेच्या तसे किंवा एकसमान दिसण्याची गरज नाही.(The body doesn’t always have to look the same)
भाटिया यांच्या वक्तव्यातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे “शरीर कायमस्वरूपी स्थिर राहते ही कल्पना सोडून देण्याची गरज आहे.”
गरिमा गोयल यांच्या मते, वाढते वय, हार्मोनल बदल, जीवनशैली, तणाव आणि आयुष्यातील विविध टप्यांमुळे शरीराचे वजन आणि आकार बदलणे अत्यंत सामान्य गोष्ट आहे. अशा स्थितीमध्ये शरीर रोज किंवा प्रत्येक वर्षी एकसारखे दिसले पाहिजे अशी आशा करणे व्यवाहारिक नाहीच पण आरोग्याच्या दृष्टीने योग्य देखील नाही. तज्ज्ञांच्या मते जर तुमच्या जीवनशैलीत संतलून असेल आणि तुम्ही सातत्याने आरोग्यदायी सवयींचे पालन करत असाल तर कधी कधी बर्गर केव्हा आवडीचे पदार्थ खाऊ शकता. याचा वजन कमी होणे किंवा वजन कमी करण्याच्या प्रवासात कोणतीही अडचण येत नाही.
“तमन्ना भाटिया यांच्या वक्तव्यावरून तज्ज्ञ आणखी एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित करतात, मानवी शरीर म्हणजे यंत्र(मशीन) नाही जे प्रत्येक जेवणानंतर जसे आहे तसेच राहील. शरीरात सातत्याने बदलणे एक गतीशील प्रणाली आहे ज्यावर जैविक आणि हार्मोनल घटकांचा परिणाम होतो.”
