scorecardresearch

Premium

Dating Tips : आम्ही लग्नाळू! वयाच्या चाळिशीतही सिंगल आहात? ‘या’ डेटिंग टिप्सच्या मदतीने शोधा खरे प्रेम

जर तुम्ही किंवा तुमच्या मित्र-मैत्रीण वयाच्या चाळिशीतही सिंगल असेल आणि आता खरे प्रेम शोधत असेल, तर तुम्ही काही डेटिंग टिप्सच्या मदतीने खूप चांगला जोडीदार शोधू शकता. आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.

if you are still single in age of 40 try these dating tips to find out true love
Dating Tips : आम्ही लग्नाळू! वयाच्या चाळिशीतही सिंगल आहात? 'या' डेटिंग टिप्सच्या मदतीने शोधा खरे प्रेम (Photo : Pexels)

Dating Tips : दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक लोक स्वत:कडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे उशिरा लग्न करणे किंवा वयाच्या चाळिशीपर्यंत सिंगल राहण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या मित्र-मैत्रीण वयाच्या चाळिशीतही सिंगल असेल आणि आता खरे प्रेम शोधत असेल, तर तुम्ही काही डेटिंग टिप्सच्या मदतीने खूप चांगला जोडीदार शोधू शकता. आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.

  • वयाच्या चाळिशीत जर तुम्ही सिंगल आहात आणि अजूनही तुम्हाला खरे प्रेम मिळाले नसेल, तर अनेकदा टेन्शन येते. तुमच्यापेक्षा वयाने लहान असलेले लोक लग्न करून त्यांच्या आयुष्यात छान सेटल झालेले दिसतात. अशा वेळी खचून जाऊ नका. स्वत:वर विश्वास ठेवा. कारण- तुमचा आत्मविश्वास तुम्हाला पुढे जाण्यास प्रोत्साहन देतो.

हेही वाचा : Jugaad Tricks : बॅगवरील काळे डाग झटक्यात होतील गायब, फक्त हे सोपे घरगुती उपाय करा

amruta khanvilkar himanushu malhotra
“आता आमच्यात प्रेम…” अमृता खानविलकरचे पती हिमांशूबरोबरच्या नात्याबद्दल थेट वक्तव्य, म्हणाली “ते रिलेशन…”
sai tamhankar
“…मग घर कसं होईल?” कुटुंबियांबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर सई ताम्हणकरच्या उत्तराने वेधलं लक्ष
daughter in law and mother in law bond
मुलींनो, सासूबरोबर पटत नाही; मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
usha nadkarni sushant singh rajput
“कितीही पैसे दाबून…”, सुशांतच्या आत्महत्येवर उषा नाडकर्णींची भावूक प्रतिक्रिया, म्हणाल्या “देव योग्य वेळी…”
  • प्रेमाला वयाचे बंधन नसते. जर तुम्ही चाळिशीत खरे प्रेम शोधत असाल, तर तुम्ही ऑनलाइन डेटिंग करू शकता. ऑनलाईन डेटिंगमध्ये अनेकदा लोकांना खरे प्रेम आणि खरा जोडीदार मिळतो. हा एक उत्तम पर्याय आहे; फक्त ऑनलाइन डेटिंग करताना फसवणुकीपासून स्वत:ला वाचवण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.
  • तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, सिनेस्टार किंवा सेलिब्रिटी खूप उशिरा लग्न करतात. विशेष म्हणजे ते चाळिशीतही तंदुरुस्त आणि फिट दिसतात. जर तुम्ही स्वत:च्या फिटनेसकडे लक्ष दिले, तर तुम्हाला वय हा फक्त आकडा वाटेल आणि तुम्ही चाळिशीतही आणखी तरुण दिसू शकता.

हेही वाचा : Weight Loss : वजन कमी करण्यासाठी कार्डिओसह स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि आहार का गरजेचा आहे? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात

  • जर तुम्ही सामाजिक कार्यक्रमात सहभाग घेतला, तर येथे तुम्हाला नवनवीन लोक भेटतील. नवीन लोकांबरोबर मैत्रीसुद्धा होऊ शकते आणि अशा कार्यक्रमात तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे चांगला जोडीदारही भेटण्याचीही शक्यता असते.
  • जर तुमचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व चांगले असेल, तर कोणीही वयाला खूप महत्त्व देत नाही. प्रामाणिकपणा आणि समजूतदारपणामुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीचे मन जिंकू शकता.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: If you are still single in age of 40 try these dating tips to find out true love ndj

First published on: 22-09-2023 at 15:20 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×