मधुमेह ज्याला इंग्रजीत डायबेटीस, असे म्हणतात. मधुमेहाचे नाव काढताच भल्याभल्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. भारतातील लाखो लोकांना मधुमेहाने ग्रासले आहे. त्यातील कित्येक लोकांना त्यांच्या मधुमेहाच्या स्थितीबाबत माहिती नसते. सामान्यत: आपल्याला मधुमेहाची प्राथमिक लक्षण माहीत असली तरी या आजाराची काही लक्षणे कदाचित फार कमी लोकांना माहीत असावी. मधुमेह हा चयापचय बिघडलेला आजार आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने इतर अनेक घटकांवर परिणाम होतो, ज्यामुळे शरीराचे विविध प्रकारे नुकसान होते. हा एक असा आजार आहे, जो एकदा बळावला की, आयुष्यभर टिकतो. तथापि, मधुमेह नियंत्रित केला जाऊ शकतो आणि त्याचे धोके टाळता येतात. वारंवार तहान लागणे हे मधुमेहाचे एक सामान्य लक्षण आहे. इतरही अनेक लक्षणे आहेत. चला तर मधुमेहाची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय पाहूया.

मधुमेहाची लक्षणे:

  • लवकर न बरे होणाऱ्या जखमा आणि फोड
  • पायांमध्ये मुंग्या येणे
  • पायांमध्ये वेदना आणि सूज
  • त्वचेच्या समस्या
  • दृष्टी कमी होणे
  • पचनाच्या समस्या –
  • वारंवार तहान लागणे
  • वारंवार छातीत दुखणे
  • चिडचिड वाटणे

मधुमेहाची लक्षणे

तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा त्यांना वारंवार आणि तीव्र स्वरूपाची तहान लागते. अशा व्यक्तीला सतत डिहायड्रेटेड वाटते. हे रक्तातील उच्च पातळीची साखर असल्याच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक आहे. जर तुम्हाला स्वत:मध्ये ही लक्षणे दिसली, तर तुम्ही शक्य तितक्या लवकर मधुमेहाची चाचणी करून घ्यावी .

मधुमेह प्रतिबंध:

दररोज व्यायाम करा. व्यायामामुळे शरीरात रक्ताभिसरण आणि रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे मधुमेह नियंत्रित होण्यास मदत होते. त्याव्यतिरिक्त दररोज किमान ३० ते ४० मिनिटे व्यायाम करा. त्यामुळे इतर अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.

संतुलित आहार राखणेदेखील खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. तुमच्या दैनंदिन आहारात हिरव्या भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्ये समाविष्ट करा. या पदार्थांचे सेवन केल्याने मधुमेहाची लक्षणे दूर होण्यास मदत होऊ शकते.

दररोज सात ते आठ तासांची झोप घेणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. झोपेदरम्यान आपले शरीर विषाक्त घटक बाहेर काढते. रात्री उशिरापर्यंत जागे राहणे आणि सकाळी उशिरापर्यंत झोपणे यांमुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो .

तुमच्या आहारात बदाम, लसूण, कांदा, अंकुरलेल्या डाळी, अंकुरलेले हरभरा, सत्तू व बाजरी इत्यादींचा समावेश करा आणि बटाटे, तांदूळ व बटर अतिशय कमी प्रमाणात वापरा.

मधुमेहींनी टरबूज टाळावे. टरबूजाचा ग्लायसेमिक इंडेक्स ७२ असतो, जो मधुमेहींसाठी खूप जास्त असतो.