Stomach Health Tips: लोक अनेकदा तक्रार करतात की, जेवल्यानंतर लगेच त्यांचे पोट फुगते आणि सतत ढेकर येऊ लागतात. ही एक पचन समस्या सामान्य नाही. ही साधी लक्षणं हळूहळू संपूर्ण शरीरासाठी घातक ठरू शकतात. लोक अनेकदा गॅस व पोट फुगण्याकडे दुर्लक्ष करतात आणि बाजारात मिळणाऱ्या पावडर किंवा औषधांवर अवलंबून असतात. परंतु या समस्या पोट, यकृत व हार्मोन्सवर परिणाम करतात. आता प्रश्न असा आहे की, खाल्ल्यानंतर पोट फुगणे का होते? आयुर्वेदात पोट फुगणे कोणत्या समस्यांशी संबंधित आहे? याबद्दल अधिक जाणून घेऊया.

पोटफुगीची समस्या कोणत्या समस्यांशी संबंधित आहे?

आयुर्वेदात, पोट फुगण्यासारख्या समस्यांना वात दोषाशी जोडले आहे. जेव्हा शरीरात वात दोष वाढतो तेव्हा पचनसंस्था किंवा अग्नी मंदावतो. त्याबाबत उपचार न केल्यास पोटाशी संबंधित अधिक समस्या उदभवतात.

खाल्ल्यानंतर पोट फुगण्याची अनेक कारणे आहेत, ज्यात मसालेदार किंवा तळलेले पदार्थ खाणे, चुकीच्या अन्न संयोजनांचे सेवन करणे, जसे की दही किंवा रायता कढीपत्त्यासोबत खाणे किंवा चहा, कॉफी यांसारख्या गरम पेयांबरोबर गार पेय किंवा गार पदार्थ खाणे. त्यामुळे हवा पोटात जाऊ शकते आणि पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. या सर्व चुका पोटाच्या समस्यांची मूळ कारणे आहेत.

पोटफुगीपासून आराम मिळवण्यासाठी नक्की ट्राय करा घरगुती उपाय

ओवा आणि काळे मीठ

सुरुवातीला घरगुती उपचार आणि आयुर्वेदिक उपाय या समस्येपासून लक्षणीय आराम देऊ शकतात. ओवा व काळे मीठ रोस्ट करा आणि त्यांची पावडर बनवा. जेवणानंतर ही पावडर खाल्ल्याने गॅस आणि पोटफुगीसारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.

आल्याचे पाणी

आल्याचे पाणी पचनशक्ती सुधारण्यासही मदत करते. ताजे आले पाण्यात उकळून दिवसातून दोनदा प्या. त्यामुळे पोटाचे आजार कमी होण्यास मदत होते.

बडीशेप आणि खडीसाखर

बडीशेप आणि साखरेचे मिश्रण जेवणानंतर घेणे चांगले. तुम्ही ते बाजारातून खरेदी करू शकता किंवा घरी बनवू शकता. घरी बडीशेप व साखरेचे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या आणि जेवणानंतर घ्या. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, तर तुम्ही हे मिश्रण दुधाबरोबर घेऊ शकता.

मनुका

मनुके पोटासाठीदेखील फायदेशीर ठरू शकतात. तुम्ही त्यात काळे मीठ भरून, सकाळी रिकाम्या पोटी सेवन करू शकता. हा उपाय पोट स्वच्छ करण्यासही मदत करेल.