scorecardresearch

Kitchen Jugaad: फ्रिजमध्ये दहा मिनिटे चष्मा ठेवून पहा, परिणाम पाहून विश्वास बसणार नाही!

Viral video: फ्रिजमध्ये चष्मा ठेवल्याने काय होते? व्हिडीओ एकदा पाहाच…

Kitchen Jugaad
किचन जुगाडचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (फोटो: युट्युब/@Avika Rawat Foods वरून साभार)

Kitchen Jugaad Video: स्वयंपाकघरात फ्रिज हा अत्यंत महत्वाचा आहे. आपण त्यात अनेक गोष्टी साठवून ठेवत असतो. कारण रोजचा स्वयंपाक करताना आपल्याला काहीना काही फ्रिजमध्ये साठवून ठेवावे लागते. आपण कच्चे पदार्थ, विविध मसाले असे एकना अनेक प्रकार फ्रिजमध्ये ठेवतो. पदार्थ ताजे, टवटवीत आणि खराब होऊ नये म्हणून सहजरित्या आपण फ्रिजचा वापर करतो. पण तुम्हाला माहित आहे का, फ्रिजमध्ये चष्मा ठेवल्याने काय होते? याचा परिणाम पाहून तुम्हीही विचारात पडाल. याचाच एका गृहिणीने जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, आता सोशल मिडीयावर एका गृहिणीने किचन जुगाडाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा फ्रिज आणि चष्म्याचा जुगाड आहे. डोळ्यांची विशेष काळजी घेण्यासाठी लोक शक्य ते सर्व प्रयत्न करतात. त्याचबरोबर डोळ्यांच्या संरक्षणासाठी चष्म्याचा वापरही सर्रास केला जातो. मात्र, चष्म्याचे ग्लासेस साफ करणेही खूप अवघड असते. अशावेळी अनेक प्रयत्न करूनही जर चष्मा सहज साफ होत नसेल तर काही सोप्या गोष्टींच्या मदतीने तुम्ही चुटकीसरशी चष्मा स्वच्छ करू शकता, असे गृहिणीने या व्हिडीओमध्ये सांगितले आहे. आता नेमकं काय आणि कसं करायचा, त्याचा परिणाम काय ते पाहुयात.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
Anil Parab Supreme Court Rahul Narwekar
“सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान
Marathi Woman Trupti Devrukhkar Shared video
धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त

चष्म्याच्या काचा वारंवार घाण होतात. वारंवार हाताच्या बोटांचा स्पर्श झाल्यामुळे किंवा धूळ बसल्यामुळे अस्वच्छ होणाऱ्या काचा साफ करण्यासाठी गृहिणीने घरगुती जुगाड दाखविला आहे. या उपायांनी काचा साफ केल्या, तर काही मिनिटांतच त्या चकचकीत होतात.

(हे ही वाचा : Kitchen Jugaad: ‘हे’ ५ पदार्थ मिक्सरमध्ये चुकूनही वाटू नका; भांड्यातील पाती बिघडून खडखडा वाजू लागतील )

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, गृहिणीने सांगितल्यानुसार, तुम्हाला घरातील तुमचे सर्व चष्मे फ्रिजच्या फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत आणि चष्मे फ्रिजरमध्ये ठेवल्यानंतर फ्रिजचा दरवाजा बंद करायचा आहे. फ्रिजचा दरवाजा कमीत कमी दहा मिनिटे बंद करायचं आहे आणि १० मिनिटे झाल्यानंतर हे ठेवलेले सर्व चष्मे तुम्हाला फ्रिजमधून बाहेर काढायचे आहे. बाहेर काढल्यानंतर हे सर्व चष्मे कापडाने स्वच्छ पुसून घ्या. कारण या चष्मावर वाफ जमा झालेली असेल. पुसल्यानंतर तुमचे चष्मे अगदी स्वच्छ झाल्याचं दिसतील. चष्माच्या काचेवरील डाग काही क्षणात गायब होतील, असे या व्हिडीओमध्ये गृहिणीने दाखवले आहे.

पाहा व्हिडीओ

Avika Rawat Foods या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-09-2023 at 12:07 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×