नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास करणे हे मन आणि शरीराच्या शुद्धीकरणासाठी चांगले मानले जाते. पण दातांच्या आरोग्यासाठी ते चांगले नाही.कारण तुम्ही जे काही खातात त्याचा थेट संबंध तोंड आणि दातांच्या आरोग्याशी येतो. नवरात्रीमध्ये, बहुतेक भक्त एकतर काहीही खात नाहीत किंवा उपवास करताना फक्त फळांचा आहार घेतात. तसेच फलाहारमध्ये फळे आणि फळांचा ज्यूस याचे जास्त सेवन केले जाते. बहुतेक लोकं फळांचा आहार घेतात. जास्त प्रमाणात फळं खाल्ल्याने त्याचा तोंडाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. बराच वेळ उपवास केल्याने तोंड आणि दातांमध्ये समस्या निर्माण होतात. तर यावेळी दंत शल्यचिकित्सक डॉ. नितिका मोदी यांनी उपवासाच्या दिवसांमध्ये तोंडाच्या आरोग्याची अत्यंत काळजी घेतली पाहिजे, असे संगितले. त्याचबरोबर त्यांनी संगितले की उपवासाच्या दिवसांमध्ये लोकं जास्त फळे आणि गोड पदार्थांचे सेवन करू लागतात. फळांबरोबरच रस, सरबत, खीर, हे पदार्थ लोकांना उपवास करताना आवडतात.

अशा स्थितीत दात किडणे म्हणजेच दातांमध्ये किड लागणे सुरू होते. जेव्हा साखर आणि स्टार्च प्लेकच्या संपर्कात येतात, तेव्हा एसिड तयार होते. हे दातांवर पसरून त्यातील हार्ड इनमोल तोडायला सुरुवात करतात, म्हणून उपवासानंतर तोंडाच्या आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. डॉ नितिका यांनी यासाठी काही खाद्यपदार्थ आणि पेये सुचवलेले आहेत. काय आहेत ते जाणून घेऊयात.

फायबर समृद्ध पदार्थ

उपवास केल्यानंतर अशी फळे खावीत, ज्यात जास्त फायबर असते. हे दात आणि हिरड्या स्वच्छ करते. या फळांमध्ये लाळ तयार करण्याची क्षमता असते. लाळेमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फेट असते, जे दातांना झालेल्या नुकसानामुळे निर्माण होणारी पोकळी भरून काढते. जीवाणूंमुळे नष्ट झालेले दातांचे तामचीनी ते भरते. यासह, फळांमध्ये व्हिटॅमिन सी देखील असते, जे दातांच्या आरोग्यासाठी चांगले असते.

ताक

ताकापासून सुद्धा तुमच्या तोंडात लाळ तयार होते. त्यात पुरेशा प्रमाणात कॅल्शियम असते ज्यामुळे तुमचे दात मजबूत होतात. ताकात पुदीना मिसळून त्याचे सेवन केल्याने तोंड स्वच्छ राहते.

नारळ पाणी

उपवासानंतर नारळाचे पाणी प्या. कारण नारळ पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नारळाच्या पाण्यात बॅक्टेरियाविरोधी आणि बुरशीविरोधी गुणधर्म असतात. हे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता होऊ देत नाही. तसेच रोग प्रतिकारशक्ती वाढवते.

बदाम

उपवासानंतर बदाम, अक्रोड आणि पिस्ता खावा. हे सर्व पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. त्यांचे सेवन केल्याने तुमच्या तोंडाचे आरोग्य लवकर सुधारेल.