World Brain Tumour Day 2026: डोकेदुखी ही सामान्य गोष्ट आहे पण ताण-तणाव, झोप पूर्ण न होणे किंवा तासन्तास मोबाईल-लॅपटॉप(स्किन) पाहण्यामुळे डोकेदुखी होऊ शकते. पण जर डोकेदुखी वारंवार होत असते आणि पूर्वीपेक्षा तीव्रता वाढत असेल किंवा त्याशिवाय इतर काही वेगळे लक्षण दिसत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण अशी डोकेदुखी ब्रेन ट्युमरचे पहिले लक्षण असू शकते. दरवर्षी ८ जून रोजी जागतिक ब्रेन ट्युमर दिवस साजरा केला जातो ज्याचा हेतू लोकांना गंभीर आजारांबाबत जागरुक करणे हा असतो. ब्रेन ट्युमरचे लक्षण, कारण आणि उपाय काय आहेत याबाबत जाणून घ्या.
ब्रेन ट्युमरची कारणे (Cause Of Brain Tumour)
एनडीटिव्हीला माहिती देताना, मॅक्स हेल्थ केअर, न्यूरोसर्जरी विभाग, डॉ. सचिन बिंदल यांनी स्पष्ट केले की,ब्रेन ट्युमर तेव्हा होतो जेव्हा मेंदूच्या काही पेशी असामान्यरितीने वाढू लागतात. हा ट्युमर कॅन्सरचा किंवा सामन्य असू शकतो. पण दोन्ही परिस्थितीमध्ये मेंदूचे सामान्य कार्यावर परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, वेळीच याचे निदान झाल्यास उपचाराचे योग्य परिणाम मिळण्याची शक्यता वाढते.
आंतरराष्ट्रीय कर्करोग नोंदणी संघटना (IARC)ने दरवर्षी भारतात ब्रेन ट्युमरचे २८,००० पेक्षा जास्त प्रकरणांवर अहवाल तयार केला आहे. दरवर्षी २४०००पेक्षा जास्त लोक ब्रेन ट्युमरमुळे जीव गमावतात.
ऑक्सफर्ड अकॅडमिक न्यूरो-ऑन्कोलॉजीमध्ये छापून आलेल्या एका लेखानुसार, अमेरिकेत २०२५मध्ये मेंदू (Brain) और केंद्रीय मज्जासंस्था (CNS) ट्युमरच्या १.०७ लाख नवीन प्रकरणे समोर आल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
ब्रेन ट्युमरचे सुरुवातीचे लक्षण काय आहे? (Symptoms of Brain Tumour)
ब्रेन ट्युमरचे सुरुवातीचे लक्षण प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळे असू शकतात. वारंवार डोकेदुखी याचे सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक मानले जाते.
ब्रेन ट्युमरचे सुरुवातीचे लक्षणे खालीलप्रमाणे –
- सतत आणि वारंवार होणारी तीव्र डोकेदुखी
- सकाळच्या वेळात जास्त डोकेदुखी होणे
- अचानक झटकेSeizures) येणे
- अंधुक दिसणे किंवा दुहेरी दृष्टी(एक वस्तू दोन दिसणे)
- ऐकण्याची क्षमतेच बदल होणे
- संतूलन साधण्यात अडचण किंवा चक्कर येणे
- वांरवार मळमळणे किंवा उल्टी होणे
- शरीराचा एखादा अवयव अशक्त किंवा सुन्न होणे
- हात-पायांच्या हालचालींवर नियत्रण कमी होणे
- बोलताना अडचण येणे किंवा शब्द विसरणे
- स्मृतीभ्रंश होणे
- लक्ष केंद्रित करण्यात अडचण
- विचार, आकलन आणि क्षमतांमध्ये बदल
- वर्तन किंवा व्यक्तिमत्त्वात अचानक बदल
- मनोवस्थेत चढउतार किंवा वाढलेली चिडचिड
- अत्यंत थकल्यासारखे वाटणे
कशी केली जाते तपासणी? (Tests For Brain Tumour)
जर डॉक्टरांना मेंदूच्या ट्यूमरचा संशय आला, तर एमआरआय (MRI) आणि सीटी स्कॅन (CT scan) यांसारख्या चाचण्या वापरल्या जातात. या चाचण्यांमुळे मेंदूच्या आतील भागाची स्पष्ट प्रतिमा मिळते. कधीकधी, ट्यूमरचे स्वरूप निश्चित करण्यासाठी बायोप्सी (biopsy) देखील केली जाते.
उपाय काय? (Cure For Brain Tumour)
उपचार हा ट्यूमरच्या प्रकार, आकार आणि स्थानावर अवलंबून असतो. शस्त्रक्रिया(Surgery), रेडिओथेरपी (Radipotherapy) आणि केमोथेरपी (Chemotherapy) हे सर्वात सामान्य उपचार पर्याय आहेत. याव्यतिरिक्त, टार्गेटेड थेरपी (Targeted Therapy)आणि इम्युनोथेरपी (Immunotherapy) यांसारखी आधुनिक तंत्रे आता वापरली जात आहेत आणि काही रुग्णांसाठी फायदेशीर ठरत आहेत.
जागरूकता का महत्त्वाची आहे?
मेंदूच्या गाठी (ट्यूमर) तुलनेने दुर्मिळ असतात, परंतु त्यांची लक्षणे वेळेवर ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला सतत डोकेदुखी, वारंवार चक्कर येणे किंवा मज्जासंस्थेशी संबंधित समस्या जाणवत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेण्यास उशीर करू नका.
