वाढत्या वयानुसार मेंदूचे कार्य टिकवून ठेवणे हे एक मोठं आव्हान मानलं जातं. मात्र इंडिय इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या एका ताज्या संशोधनाने या दिशेने नवी आशा निर्माण केली आहे. IIScच्या शास्त्राज्ञांनुसार, नियमित ध्यानधारणेमुळे केवळ मेंदूच्या गामा लहरीच मजबूत होत नाहीत, तर वृद्धत्वाच्या प्रक्रियेमुळे होणारे मज्जासंस्थेवरील पपरिणाम कमी होण्यासही मदत होते. सेंटर फॉर न्यूरोसायन्सने केलेल्या या अभ्यासात ध्यानाची अवस्था मेंदूची लवचिकता आणि संज्ञानात्मक आरोग्य दीर्घकाळ कसे टिकवून ठेवू शकते. हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ध्यान केवळ मानसिक शांतीच देत नाही, तर ते मेंदूच्या कार्यावरही खोलवर परिणाम करते.
ध्यानाचा मेंदूच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो
शास्त्राज्ञांच्या मते, जेव्हा न्यूरॉन्स (मेंदूच्या पेशी) एकाच वेळी सक्रिय होतात, तेव्हा त्या वेगवेगळ्या वारंवारतेच्या मेंदू लहरी निर्माण करतात. पूर्वीच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ध्यान करणाऱ्यांमध्ये थीटा आणि अल्फा सारख्या मंद मेंदू लहरी अधिक तीव्र असतात. अलीकडच्याच संशोधनात असेही दिसून आले आहे की, दीर्घकाळ ध्यान करणाऱ्यांमध्ये गामा लहरी अधिक तीव्र असतात. तसंच ही गामा क्रिया ब्रॉडबँड आहे म्हणजेच ती एका निश्चित लयीत नसून वारंवारतेच्या विस्तृत श्रेणीमध्ये पसरलेली असते.
संशओधनात असेही दिसून आले की, काळ्या-पांढऱ्या पट्ट्यांच्या नमुन्यांसारख्या विशिष्ट दृश्य उत्तेजनांमुळे मेंदूच्या व्हिज्युअल कॉर्टेक्समध्ये नॅरोबँड गामा लहरी निर्माण होऊ शकतात. तसंच वाढत्या वयानुसार आणि अल्झायमरसारख्या मज्जासंस्थेच्या आजारांमुळे या गामा लहरी कमकुवत होतात. हे समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी ध्यान करणाऱ्या आणि ध्यान न करणाऱ्या व्यक्तींची तुलना केली.
संशोधन काय म्हणते?
सेंटर फॉर न्यूरोसायन्स मधील संशोधकांनी इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफी या तंत्राचा वापर केला. ते शस्त्रक्रियेशिवाय मेंदूच्या कार्याची नोंद करते. सहभागींना ध्यानापूर्वी, ध्यानादरम्यान आणि ध्यानानंतर व्हिज्युअल ग्रॅटिंग्ज दाखवण्यात आले. या अभ्यासात ३० अनुभवी ध्यानकर्ते, ज्यांनी सरासरी १० हजार तासांपेक्षा जास्त ध्यान केले होते आणि त्याच वयोगटातील आणि लिंगाचे ३० ध्यान न कऱणारे सहभागी होते.
निकालांवरून असे दिसून आले की, ध्यान करणाऱ्यांमध्ये उद्दीपनामुळे निर्माण होणाऱ्या गामा लहरी अधिक तीव्र होत्या. इतकेच नाही, तर त्यांच्या मेंदूच्या फ्रंटल, टेम्पोरल आणि पॅरिएटल भागांमध्ये अधिक ब्रॉडबँड गामा क्रियाशीलता होती. या दोन प्रकारच्या गामा क्रियाशीलतेमध्ये परस्परसंबंध नव्हता.
यावरून असे दिसते की, ध्यान मेंदूतील वेगवेगळ्या चेतासंस्थेच्या यंत्रणांना बळकट करते. संशोधनानुसार, दीर्घकाळ ध्यान केल्याने केवळ मेंदूची क्षमताच वाढत नाही, तर वृद्धत्वामुळे होणारी मेंदूची घटही कमी होते. नियमित ध्यान न्यूरोडीजनरेटिव्ह आजार टाळण्यासही मदत करू शकते. शास्त्रज्ञ आता यावर संशोधन करत आहेत की, ध्यानातून निर्माण होणाऱ्या या गामा लहरी अल्झायमर आणि स्मृतिभ्रंशाची सुरूवातीची लक्षणे पूर्णपणे नाहीशी करू शकतात की केवळ टाळू शकतात.
तज्ज्ञांचे मत
बिकानेर इथल्या श्री कृष्णा न्यूरोस्पाइन हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले वरिष्ठ न्यूरोसर्जन डॉ. अरूण तुंगारिया यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, ध्यानाचा मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो. दररोज ध्यान केल्याने आपल्या मेंदूतील प्रीफ्रंटल कॉर्टेक्सची क्रियाशीलता वाढते, त्यामुळे आपली निर्णयक्षमता सुधारते. दररोज ध्यान केल्याने आत्म-नियंत्रणास मदत होते. दररोज ध्यान केल्याने तुम्हाला समस्यांवर उपाय शोधता येतात आणि गोष्टींवर लक्ष केंद्रित करता येते. ध्यान केल्याने मेंदूतील अमिग्डालाची क्रियाशीलता कमी होते, त्याला मेंदूचे भीती केंद्र म्हटले जाते. भीती केंद्राची क्रियाशीलता कमी झाल्यामुळे आपला ताण आणि चिंता कमी होते. ध्यानामुळे शिकण्याची शक्ती सुधारते. दररोज ध्यान केल्याने ह्रदयाचे ठोके आणि रक्ताभिसरण सामान्य राहते.
