विमा न उतरवलेल्या वाहनांची रस्त्यावरील संख्या कमी करण्यासाठी १ सप्टेंबर रोजी आणि त्यानंतर खरेदी केल्या जाणाऱ्या सर्व दुचाकी आणि चार चाकी वाहनांसाठी दीर्घकालीन विमा घेणे सर्वोच्च न्यायालयाने अनिवार्य केले आहे. या आदेशामुळे अनेक सर्वसाधारण विमा कंपन्यांनी केवळ थर्ड पार्टी कव्हर, दीर्घकालीन थर्ड पार्टी आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह एकत्रित कव्हर अशा स्वरूपांमध्ये दीर्घकालीन विमा पॉलिसी सुरू केल्या आहेत.

याचा तुमच्या कार विम्याच्या हप्त्यांवर कसा परिणाम होईल?

वाहन खरेदी करतानाच तीन/ पाच वर्षांचे विमा संरक्षण खरेदी करायचे असल्यामुळे, तुमचे हप्ते त्या प्रमाणात वाढतील आणि तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील. तथापि, संपूर्ण कालावधीसाठी हप्ते एकसारखे राहत नसल्याने दरवर्षी बदलू शकत असलेल्या हप्त्यांनुसार तुम्हाला नूतनीकरण करावे लागणार नाही. यामुळे वार्षिक नूतनीकरणाची कटकट तर दूर होईल पण तुम्हाला कार खरेदी करताना जास्त पैसे मोजावे लागतील कारण तृतीय पक्ष विम्याचे दरपत्रकही वाढले आहे. तेव्हा, जर तुम्ही १५०० सीसीहून जास्त क्षमतेची कार खरेदी करत असाल तर तुम्हाला साधारण १७ हजार जास्त मोजावे लागतील.
नो क्लेम बोनसवर तसा फारसा परिणाम होणार नाही कारण, नो क्लेम बोनस हा संरक्षणाच्या ऑन डॅमेज भागाला लागू होतो आणि थर्ड पार्टी घटकांना लागू होत नाही. जर तुम्ही दीर्घकालीन कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर घेत असाल तर, तुम्हाला किमान तीन वर्षांनंतरच नो क्लेम बोनसच्या सवलतीचा फायदा मिळेल. तथापि, सध्या कंपन्या जास्त बचत होण्यासाठी ऑन डॅमेजच्या दीर्घकालीन हप्त्यांवर सवलत देऊ करत आहेत.

काय लक्षात ठेवावे?

तुमची विमा पॉलिसी दीर्घकालीन असणार आहे, तेव्हा या अवधी दरम्यान तुम्हाला किंवा विमा कंपनीला थर्ड पार्टी संरक्षण रद्द करता येणार नाही. तेव्हा, तुम्हाला दरवर्षी विमाकार बदलण्याचे स्वातंत्र्य राहणार नाही. या नियमाला अपवाद दुहेरी विम्याचा आहे, ज्यामध्ये कार विकली जाईल किंवा दुसऱ्याच्या नावावर केली जाईल किंवा ती वापरात नसेल. तेव्हा, तुमचा विमाकार योग्य पद्धतीने निवडणे गरजेचे आहे. तुमच्या कार वितरकावर डोळे झाकून विश्वास ठेवण्याऐवजी, तुमच्यासाठी योग्य असलेला विमा ऑनलाईन शोधा.

फक्त थर्ड पार्टी विमा निवडण्याऐवजी कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर निवडा. कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरमध्ये, थर्ड पार्टीबरोबरच ऑन डॅमेज कव्हर तसेच इंजिन प्रोटेक्शन आणि शून्य घसारा यांसारख्या रायडर्सचा आणि अॅड-ऑन्सचा समावेश होतो. त्यामुळे तुमचे अतिरिक्त खर्च वाचतात. त्यामुळे, चोरी, दरोडा, अपघात, नैसर्गिक आपत्ती इत्यादींपासून तुमचे संरक्षण होते. नो क्लेम बोनस विचारात घेऊन एक वर्षाचे कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर घेणे तुमच्यासाठी योग्य आहे का नाही त्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. जेव्हा तुम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या पॉलिसींची तुलना करता तेव्हा, केवळ कव्हरेज आणि अॅड-ऑन्सवर जाऊ नका तर, इतर वापरकर्त्यांच्या समीक्षा आणि रेटिंगही पहा. याशिवाय, ऑटोमोटिव रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) द्वारा मान्यताप्राप्त कार खरेदी केल्यास तुम्हाला तुमच्या हप्त्यांमध्ये २.५ टक्के सूट मिळू शकते. याचा अर्थ जर तुमच्या नवीन कारमध्ये अंगभूत सुरक्षा वैशिष्ट्ये असतील तर, तुम्ही कमी किमतीत तुमच्या वाहनाचा विमा करू शकता.

आदिल शेट्टी

सीईओ, बँकबझार