Milk And Honey Benefits :दूध आणि मध यांचे एकत्र सेवनाला कित्येक वर्षांपासून अमृतासमान मानले जाते. दोन्ही पदार्थ पोषक तत्वांनी समृद्ध आहेत, पण त्यांचे एकत्र सेवन केल्याने फायदे कित्येक पटीने वाढतात. हे मिश्रण पचन सुधारण्यापासून शांत झोपेस देखील मदत करते. हाडे मजबूत करण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्या देखील मदत करते. त्याबरोबर त्वचेसह शरीरासाठी देखील लाभदायी ठरते. हिवाळ्यात हा उपाय आणखी फायदेशीर ठरतो.
दुध आणि मध दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत पण एकत्र सेवान केल्यास कित्येक समस्यांवर रामबाण उपाय ठरते. दूधात मध मिसळून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, हाडे मजूबत होतात, रोगप्रतिकारशक्ती वाढते, झोपेची गुणवत्ता सुधारते आणि त्वचेवर उजळपणा दिसून येतो.
पचनक्रिया आणि आतड्यांचे आरोग्य (Digestive Health and Gut Care)
याबाबत तज्ज्ञ डॉ. रवि आर्या यांनी न्युज १८ला माहिती देताना सांगितले की, दुधात मध मिसळून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. हे बद्धकोष्ठता किंवा २-३ दिवस पोट साफ न होण्याच्या समस्यपासून सुटका देते. त्याचबरोबर हाडांचे आखडणे कमी करते. तसेच आतड्याचे आरोग्य सुधारते. हे मिश्रण पोटाला शांत करते आणि चांगले बॅक्टेरियांच्या वाढीस चालना देतात अन् पचनक्रिया सुरळीत राखण्यात मदत करते.
हाडांचे आरोग्य आणि हृदय (Bone Health and Heart)
दुध आणि मध दोन्ही शरीरात असे हार्मोन्स सोडण्यास चालना देतात की शरीराला आराम मिळेल आणि विश्रांती घेण्यास मदत होईल. दुध आणि मधाचे एकत्र सेवन केल्याने हाड मजबूत होण्यास मदत होते कारण दुधात कॅल्शिअम असते आणि मध पोषकतत्वांचे शोषण सुधारण्यास मदत करते. हे मिश्रण हृदयासाठी फायदेशीर मानले जाते आणि एक संतुलित, हेल्दी आहाराचा भाग ठरतो.
शांत आणि गाढ झोप (Quality Sleep and Brain Health)
दूधात मध मिसळून प्यायल्यास झोपेच्या गुणवत्तेवर सकारात्मक परिणाम होतो. ते शरीर आणि मेंदूला शांत करते ज्यामुळे रात्रीच चांगली झोप लागते. दुधातील ट्रिफ्टोफॅन नावाचे अॅमिनो अॅसिड असते जे मेंदूमध्ये सेरोटोनिन आणि मेलाटोनिनच्या उत्पादनास चालना देते. हे दोन्ही हार्मोन शांत आणि गाढ झोप घेण्यासाठी मदत करते.
रोगप्रतिकारशक्ती (Immunity Boost)
दुधात मध मिसळून प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती चांगली सुधारते कारण हे मिश्रण रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या गुणांनी समृद्ध असते. दूध आणि मध दोन्हीमध्ये जिवाणुरोधी आणि अँटीऑक्सिटेंडयुक्त गुण समाविष्ट असतात जे शरीराला संसर्गाशी लढण्यासाठी मदत करतात आणि आजारी पडण्याची शक्यता कमी करतात.
त्वचेचा उजळपणा (Skin Health and Glow)
दुधात मध मिसूळन प्यायल्याने त्वचा उजळ होण्यात मदत मिळते. त्यात असलेले अँटीऑक्सिडेंट गुण त्वचेला फ्रि रेडिकल्सपासून वाचवतात, चमक वाढतात आणि त्वचा मॉइश्चराईज करतात. हे मिश्रण त्वचेशी संबधीत समस्या जसे की पुरळ, डाग कमी करण्यासाठी मदत करतात.
तात्काळ ऊर्जा (Energy Boost)
दुधात मध मिसळून प्यायल्याने उर्जा वाढते. दुधात असलेले प्रोटिन आणि मधामध्ये असलेले नैसर्गिक शर्करा एकत्र येताच तात्काळ आणि दिर्घकाळ टिकाणारी उर्जा देतात. त्यामुळे थकावा दूर होतो आणि शरीर दिवसभर सक्रिय राहते.
