‘या’ शहरात १ लिटर पेट्रोल ८२.९६ रुपये आणि डिझेल ७७.१३ रुपये, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर ९५.४१ रुपये प्रति लीटर आहे.

lifestyle
दिल्लीत पेट्रोलचा दर ९५.४१ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर ८६.६७ रुपये प्रति लिटर आहे. (photo: file photo)

सरकारी तेल कंपन्यांनी (IOCL) पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. नवीन दरानुसार, आज देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर ९५.४१ रुपये प्रति लीटर आहे, तर डिझेल ८६.६७ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. दिल्लीशिवाय इतर कोणत्याही शहरात इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

काल दिल्लीच्या केजरीवाल सरकारने पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर दिल्लीत एक लिटर पेट्रोल आठ रुपयांनी स्वस्त झाले आहे. दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत १०३.९३ रुपयांवरून ९५.४१ रुपयांवर आली आहे.

दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये आणि डिझेल ८६.६७ रुपये प्रति लिटर आहे.

मुंबईत पेट्रोल १०९.९८ रुपये आणि डिझेल ९४.१४ रुपये प्रति लिटर आहे.

चेन्नईमध्ये पेट्रोल १०१.४० रुपये आणि डिझेल ९१.४३ रुपये प्रति लिटर आहे.

कोलकात्यात पेट्रोल १०४.६७ रुपये आणि डिझेल ८९.७९ रुपये प्रति लिटर आहे.

लखनौमध्ये पेट्रोल ९५.२८ रुपये आणि डिझेल ८६.८० रुपये प्रति लिटर आहे.

गांधीनगरमध्ये पेट्रोल ९५.३५ रुपये आणि डिझेल ८९.३३ रुपये प्रति लिटर आहे.

पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल ८२.९६ रुपये आणि डिझेल ७७.१३ रुपये प्रति लिटर आहे.

दररोज सकाळी ६ वाजता किंमत बदलते

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी सहा वाजता बदलतात. सकाळी ६ वाजल्यापासून नवे दर लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.

अशा प्रकारे तुम्ही आजच्या नवीनतम किंमती जाणून घेऊ शकता

तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक ९२२४९९२२४९ या क्रमांकावर आरएसपी आणि ९२२३११२२२२ या क्रमांकावर आरएसपी लिहून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: In this city a liter of petrol costs rs 82 96 and diesel rs 77 13 find out the rates in your city scsm

ताज्या बातम्या