scorecardresearch

यकृत निरोगी ठेवण्यासाठी आहारात ‘या’ ५ पदार्थांचा करा समावेश

तुमच्या आहाराचा तुमच्या यकृताच्या आरोग्यावर परिणाम होतो. यकृत निरोगी ठेवण्यासाठी आहारात काही खास पदार्थ सेवन करा, ज्यामुळे तुमचे यकृत फॅटी होण्यापासून वाचेल, तसेच ते निरोगी राहील.

यकृत हे शरीराचे पॉवर हाऊस आहे. (photo credit: jansatta/ freepik)

यकृत हे शरीराचे पॉवर हाऊस आहे जे आपल्या शरीरात विविध प्रकारे महत्त्वपूर्ण कार्ये करते. यकृत अन्नातील सर्व पोषक घटक जसे की जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स इत्यादी वेगळे करते आणि शरीराच्या गरजेनुसार वेगवेगळ्या अवयवांमध्ये पोहोचवते. रक्तातील विषारी घटक काढून टाकण्याचे कामही यकृताचे असते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, भारतातील लोकांची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी बिघडत चालल्या आहेत, तसेच यकृताच्या समस्यांमुळे होणारे आजार भारतात दहाव्या क्रमांकावर आले आहेत. शरीराच्या या महत्त्वाच्या भागाची काळजी घेण्यासाठी उत्तम आहार, चांगली झोप आणि व्यायाम करणे आवश्यक आहे.

तुमच्या आहाराचा तुमच्या यकृताच्या आरोग्यावर परिणाम होतो. यकृत निरोगी ठेवण्यासाठी आहारात काही खास पदार्थ सेवन करा, ज्यामुळे तुमचे यकृत फॅटी होण्यापासून वाचेल, तसेच ते निरोगी राहील. चला जाणून घेऊया काही हेल्दी फूड्स जे तुमचे यकृत निरोगी ठेवतात.

ग्रीन टीचे सेवन करा

यकृत निरोगी ठेवायचे असेल तर ग्रीन टीचा आहारात समावेश करा. ग्रीन टी यकृत निरोगी ठेवते, तसेच अनेक आजारांपासून दूर ठेवते. ग्रीन टी यकृतातील एन्झाइमची पातळी सुधारू शकते, ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करू शकते तसेच यकृतातील चरबी कमी करू शकते.

आहारात कोबीचे सेवन करा

कोबीचे सेवन यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कोबी यकृतातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि यकृत निरोगी ठेवते.

बेरीज खाणे

यकृत निरोगी ठेवण्यासाठी क्रॅनबेरी आणि ब्लुबेरी सारख्या बेरीचे सेवन करा. अँथोसायनिन समृद्ध बेरी यकृताला फॅटी आणि खराब होण्यापासून वाचवतात. बेरीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते, तसेच तुमचे आरोग्य चांगले राहते.

सोयाबिनच्या दुधापासून बनवलेले पदार्थांचे सेवन करणे

सोया पासून बनवलेले पदार्थांचे सेवन तुमच्या यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सोयापासून बनवलेले पनीर तसेच त्याच्या दुधापासून बनवलेले पदार्थांचे तुम्ही सेवन केल्याने यकृतातील चरबीचे प्रमाण कमी करण्यास मदत करू शकते. सोया आणि टोफू यकृत निरोगी ठेवण्यासाठी प्रभावी आहेत.

नियमित फळांचे सेवन करणे

यकृताच्या चांगल्या आरोग्यासाठी फळांचे सेवन देखील महत्त्वाचे आहे. लिंबूवर्गीय फळे जसे संत्री आणि द्राक्षे हे यकृत निरोगी ठेवण्यास मदत करतात. संत्र्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी यकृतामध्ये चरबी जमा होण्यापासून रोखण्यास मदत करते.

द्राक्षांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स यकृत निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतात. क्रॅनबेरी आणि ब्लूबेरीसारख्या काही इतर फळांमध्ये देखील अँटिऑक्सिडेंट असतात जे यकृत निरोगी ठेवण्यासाठी प्रभावी असतात.

(टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्यावा.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Include 5 foods in your diet to keep your liver healthy scsm

ताज्या बातम्या