High-Protein Diet for Weight Loss : लठ्ठपणा लोकांसाठी मोठी समस्या आहे. वजन कमी करण्यासाठी लोक आरामदायक जीवनशैली सोडून कंबर कसायला लागतात. वाढत्या वजनावर नियंत्रण आणण्यासाठी दोन महत्वाचे टूल्स आहेत. ज्यापैकी एक आहे डाएट आणि दुसरं आहे वर्कआऊट. या दोन्ही गोष्टी योग्य वेळेत केल्यावर वजन कमी होण्यास मदत होते. लठ्ठपणा कमी करायचा असेल तर दररोज ४० मिनिटांपर्यंत वर्कआऊट केलं पाहिजे. तसंच डाएटमध्ये प्रोटिनचा समावेशही केला पाहिजे. प्रोटिन डाएटचा सेवन केल्यावर सहजपणे वजन कमी करु शकता. तुमच्या प्रोटीन डाएटमध्ये चिकन आणि मटणाचाच समावेश असणे आवश्यक नाही. तुमच्या डाएटमध्ये डाळीचाही समावेश करु शकता. डाळ खाल्ल्यानेही भरपूर प्रोटीन्स मिळतात.

एम्सचे माजी कंसल्टेंट आणि साओल हार्ट सेंटर के फाउंडर आणि डायरेक्टर डॉ. बिमल झांजेर यांनी दिलेल्या माहितीनुसार, डाळीमध्ये चिकन, मटण आणि मासे यांच्यापेक्षा अधिक प्रोटीन असतं,.सोयबीनपासून सर्व डाळींमध्ये १७ टक्क्यांपासून २८ टक्क्यांपर्यंत प्रोटीन असतं. मटणात १८ ग्रॅम प्रोटीन असतं. तर चिकनमध्ये ३० ग्रॅम प्रोटीन असतं. तसंच माशांमध्ये १७-२३ ग्रॅमपर्यंत प्रोटीन असतं. नॉनव्हेज फूडमध्ये असणाऱ्या प्रोटीनमुळं वजन वाढू शकतं. प्रोटीन डाएटमध्ये डाळ हे शाकाहारी फूड असून ज्याचं सेवन केल्यामुळं वजन कमी होण्यास मदत होते. जाणून घेऊयात डाळींच्या सेवनामुळं वजन कमी करण्यास कशाप्रकारे मदत होते.

indian model of secularism
संविधानभान : धर्मनिरपेक्षता : समज व गैरसमज
Declaration of self-reliance and policy of import dependence
घोषणा आत्मनिर्भतेच्या आणि धोरण आयातनिर्भरतेचे
Bitcoin Halving
बिटकॉइन हॉल्व्हिंग म्हणजे काय आणि क्रिप्टोसाठी त्याचा अर्थ काय?
What is tax harvesting and what to be careful about
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग काय असतं? ते करताना काय काळजी घ्यावी?

प्रोटीन डाएट वजन कमी करण्यास कशाप्रकारे मदत करतं?

तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असल्यास, डाएटमध्ये प्रोटीनयुक्त डाळींचा समावेश करा. वजन कमी करण्यासाठी तुम्ही प्रति किलोग्रॅममध्ये १.६ आणि २.२ ग्रॅम प्रोटीनचं सेवन करु शकता. वजन कमी करण्यासाठी हेवी वर्कआऊट करत असाल, तर प्रति किलोग्रॅम २.२-३.३ ग्रॅम प्रोटीनचं सेवन करा. प्रोटीन डाएट वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. डाळ प्रोटीनचं जबरदस्त स्त्रोत आहे. डाळ खाल्ल्याने मेटाबॉलिज्म बूस्ट केलं जातं. याचं सेवन केल्यावर तुम्हाला खूप भूख लागणार नाही. जर तुम्ही नियमितपणे प्रोटीन डाएटचं सेवन करत असाल, तर तुमची भूख ६० टक्क्यांपर्यंत नियंत्रणात राहू शकते. वजन कमी करण्यासाठी प्रोटीन डाएट खूप फायदेशीर ठरु शकतं.

नक्की वाचा – …म्हणून परवेज मुशर्रफ यांचं निधन झालं, Amyloidosis आजाराबद्दल माहितीय का? जाणून घ्या सविस्तर

प्रोटीन डाएटमध्ये या फूड्सचा समावेश करा

१) जर तुम्हाला वाढत्या वजनाला प्रभावीपणे कंट्रोल करायचं असेल, तर डाएटमध्ये किनुआचं सेवन करा. किनुआच्या डाळीत प्रोटीनसोबतच फायबरचाही समावेश असतो. ज्यामुळे तुमची पचनक्रीया व्यवस्थित होते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
२) वजन कमी करण्यासाठी अंडा, पनीर आणि दुधाचा तुमच्या डाएटमध्ये समावेश करा. या सर्व फूडमध्ये खूप प्रोटीन असतं आणि वजन झटपट कमी करु शकता.
३) वजन कमी करण्यासाठी डाळीचं सेवन फायदेशीर ठरू शकतं. सर्व डाळी, सोयाबीन, राजमा, छोले, चणे या सर्वांमध्ये फॅट खूप कमी असतं आणि प्रोटीन जास्त असतं. या डाळी खाल्ल्याने वजन कमी होतं.