Pregnancy Health: प्रत्येक गर्भवती महिलेची इच्छा असते की जन्माच्या वेळी तिचे बाळ निरोगी आणि हेल्दी असावं. गरोदरणात बाळ आणि त्याच्या आईच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. प्रत्येक गर्भवती महिलेने गरोदरपणात पौष्टिक आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे गर्भातील बाळाचा विकास योग्य प्रकारे होतो. गरोदरपणाच्या सर्व त्रैमासिकांमध्ये जड किंवा दुप्पट खाण्याची गरज नाही. परंतु आहारात पोषक तत्वांचा संतुलित प्रमाणात समावेश करणे आवश्यक आहे. या दिवसांमध्ये लोहयुक्त पदार्थ खाणे महत्त्वाचे आहे.अशा स्थितीत आयर्न, फॉलिक अ‍ॅसिड असलेल्या गोष्टींचे सेवन करावे. गर्भवती महिलेच्या आहारात आवश्यक खनिजे, जीवनसत्त्वे, प्रथिनांची कमतरता असेल तर आईसोबतच बाळही अशक्त होते. गर्भधारणेदरम्यान आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा, याविषयी जाणून घेऊया.

फळं आणि भाज्या
गरोदरपणात हिरव्या भाज्या खाल्यामुळे फायबर, आर्यन आणि अनेक प्रकारचे विटामिन असतात. पालक, लेटस, कोबी सारख्या भाज्या शरीरासाठी फायदेशीर असतात. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपल्या आरोग्याच्या स्थितीनुसार कच्च्या हिरव्या भाज्या खाणे गरजेचे आहे. या हिरव्या भाज्यांच्या मदतीने तुम्ही अनेक टेस्टी पदार्थ, सलाड बनवू शकता. गरोदर राहण्यासाठी मल्टीविटामिन पदार्थांचा विचार करा. फळे आणि भाज्या विविध प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिजे देतात. गर्भधारणेपूर्वी विशिष्ट पोषक तत्त्वे पुरेशा प्रमाणात मिळणे महत्वाचे आहे. अशावेळी फळे आणि भाज्या अतिशय फायदेशीर असतात.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?

डेअरी प्रोडक्ट्स

गरोदरपणात दुग्धजन्य पदार्थ खाणे खूप फायदेशीर आहे. दुध व दुग्धजन्य पदार्थ पौष्टिकतेने भरलेले असतात. आहारात दुध आणि तुप यांचा समावेश करावा. गर्भारपणात स्त्रीच्या शरीराला कॅल्शियम होणे महत्वाचे आहे. दुध व दुग्धजन्य पदार्थांमुळे बाळाच्या हाडांचा सर्वांगीण विकास होतो. गर्भवती स्त्रीने दररोज निदान एक कप दूध सकाळी व संध्याकाळी पिणे गरजेचे आहे. दुधासोबातच तुप, लोणी, पनीर व ताक अशा दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश असावा.

आणखी वाचा : Lemongrass: लेमनग्रास आरोग्यासाठी चांगले की वाईट? जाणून घ्या फायदे आणि नुकसान

ड्रायफ्रुट्स

ड्रायफ्रुट्स विविध प्रकारच्या न्यूट्रिएंट्सने युक्त असतात. काजू बादाम, किशमिश, पिस्ता, अक्रोड, ड्राय बेरीज यांसारख्या ड्रायफ्रुट्समध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर आणि अँटिऑक्सिडंटचा भांडार असतो. नियमितपणे  ड्रायफ्रूट खाल्ल्याने आपल्या न्यूट्रिशनची गरज भागते. शिवाय, शरीराला एनर्जी मिळते आणि इम्युनिटी पॉवरही वाढते. बदाम, काजू, पिस्ता किंवा अक्रोड गरोदरपणात खूप फायदेशीर असतात. कारण त्यात ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते. हे फॅटी अॅसिड बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी खूप चांगले काम करते. त्यामुळे गर्भावस्थेत डॉक्टर काजू खाण्याचा सल्ला देतात. किंवा काजूचे पदार्थ खाण्यासही सांगतात.

​हेल्दी प्रोटीन

गरोदरपणात प्रथिनांचे सेवन फार महत्वाचे आहे. चिकन व्यतिरिक्त तुम्हाला डाळी, पनीर, चीज, बीन्स आणि अंडी यांपासून प्रोटीन मिळू शकते. याशिवाय इतर अनेक प्रकारचे पोषक घटक जसे की अमिनो अॅसिड, लोह, पोटॅशियम आणि अनेक प्रकारचे अँटी-ऑक्सिडंट्स या मसूरमध्ये मुबलक प्रमाणात असतात. ही मसूर स्वस्त प्रोटीनसाठी सर्वोत्तम आणि आरोग्यदायी पर्याय आहे.