श्रावण महिनाच्या प्रत्येक सोमवारी तसेच शनिवारी अनेकजण उपवास करत असतात. या श्रावण महिन्यात असे म्हटले जाते की उपवासाच्या दिवसात भगवान शंकर आपल्या भक्तावर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. त्यामुळे अनेक लोकं  श्रावणी सोमवारचा व शनिवारचा उपवास करत असतात. दरम्यान उपवासाच्या दिवसात आपली प्रतिकारशक्ति आणि पचनशक्ती देखील कमी होत असते. याकरिता तुम्ही पचण्यास सोपे असलेले पदार्थ तुमच्या आहारात समावेश करणे महत्त्वाचे आहे. बरेचजण प्रत्येक सोमवारी निर्जल उपवास करतात तसेच काही न खाता फक्त पूर्ण दिवस पाणी पिऊन देखील उपवास करत असतात. याच पार्श्वभूमीवर सर्टिफाईड क्लिनिकल डाएटिशन, लेक्चरर, डायबेटीस एड्युकेटर, मीट टेक्नॉलॉजिस्ट आणि NUTRच्या संस्थापक लक्षिता जैन यांनी उपवास करताना आहारात फलाहारचा समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. जेणेकरून, तुमच्या शरीराला पोषक तत्त्वांसह ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊयात उपवसाच्या दिवसात कोणते पदार्थ खाणं योग्य आहे?

श्रावण आहार:- या पदार्थांचा करा समावेश

श्रावणात उपवास करताना नेमकी काय खावे? याचा प्रश्न पडतो. तेव्हा तुम्ही ताक, दही, राजगिरा, आरारूट, फॉक्सनट, शिंगाडे, खजूर, अरबी (colocasia), नारळ आणि शेंगदाणे या पदार्थांचा आहारात समावेश करून यांचे सेवन करू शकतात.

f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
How To Make Amchur At Home kairichi Amboshi Pickle recipe
आजीच्या पद्धतीनं घरच्या घरी “आंबोशी” या पद्धतीने बनवा; वर्षभर टिकणारी चटकदार रेसिपी एकदा पाहाच
Surya Grahan 2024
गुढीपाडवा, चैत्र नवरात्रीआधी ‘या’ राशी होणार श्रीमंत? वर्षाच्या पहिल्या सूर्यग्रहणात सोन्यासारखं चमकू शकतं भाग्य

हायड्रेशन

श्रावणाच्या उपवासादरम्यान तुमचे शरीर हायड्रेट राहावे. यासाठी तुम्ही दिवसभरात तीन ते चार लिटर पाणी प्या. तसेच उपवासादरम्यान भरपूर पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असलेले लिंबूपाणी, नारळपाणी यांचा देखील आहारात समावेश करा. उपवासाच्या दरम्यान तुमच शरीर हायड्रेड राहावे याकरिता तुम्ही दूध आणि त्याच्याशी संबंधित असलेले पदार्थ उदा. दही, ताक, चीज, पनीर, होममेड बटर, आणि तूप याव्यतिरिक्त तुम्ही राजगिरा, साबुदाणे यांची गोड खीर बनवून खाऊ शकतात.

फळे

श्रावणात उपवासाच्या दिवसात तुम्ही फळांचा अधिक प्रमाणात समावेश करावा. यात द्राक्ष, लिची, संत्रे, किंवा कोणतेही हंगामी फळे अशा फळांच्या सेवनाने तुमच्या शरीरात पाण्याचे प्रमाण नियंत्रित राहते. तुम्ही जर सफरचंद, केळी, नासपती, मनुके, किवी, डाळिंब, अननस अशा फळांचे उपवसदरम्यान सेवन केले तर तुम्हाला अधिक प्रमाणात फायबर मिळते.

फळभाज्या

श्रावण महिन्यात तुम्ही रताळे, दुधी भोपळा, बटाटा, सुरण अशा भाज्यांचा आहारात समावेश करावा. या सर्व भाज्या सात्विक आहे. याने तुमच्या शरीरातील ऊर्जा निर्माण करून तुमचे शरीर निरोगी राहील.

सैंधव मीठ

तुम्ही जेवण शिजवताना नेहमीच्या मीठा ऐवजी सैंधव मिठाचा वापर करावा. तसेच एका ग्लासात पाणी घेऊन त्यात सैंधव मीठ आणि त्यात लिंबाचा रस टाकून छान मिक्स करून दिवसातून तुम्ही हे दोनदा प्यायलयाने तुमच्या शरीरातील ऊर्जा कायम राहते.

तृणधान्य आणि पीठ

उपवसाच्या दिवसात तुम्ही राजगिरा, शिंगाडे, अरारूट,साबुदाणे यांचे पीठ बाजारात तसेच किराणा दुकानात सहज मिळतात, किंवा तुम्ही घरी देखील बनवू शकतात. दरम्यान या पीठांचा तुम्ही पुरी, भाकरी, थालीपीठ बनवून छान बटाट्याची कडी बनवून खाऊ शकता.

सुका मेवा (ड्रायफ्रूट)

ड्राय फ्रूट्स हे एक उत्तम पोषक अन्न आहे. ज्याच्या सेवनाने तुमचे पोट भरलेले राहील. तुमच्या आहारात काजू, बदाम, मनुका, अक्रोड यांचा समावेश करा. हे ड्राय फ्रूट अधिक पौष्टिक असतात आणि हे ड्राय फ्रूट शरीरात ऊर्जा राखून ठेवतात.