श्रावण महिन्यात उपवास सोडण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा समावेश!

श्रावणात संध्याकाळी जेव्हा उपवास सोडला जातो. तेव्हा काहींना पोटदुखी, गॅस, बद्धकोष्ठता, अपचन, निद्रानाश, सुस्ती आणि थकवा अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्या टाळण्यासाठी संध्याकाळी उपवास सोडताना या पदार्थांचा आहारात समावेश करा.

श्रावणात उपवास सोडण्यासाठी झटपट आणि इंस्टेंट एनर्जी असणारा लिंबू पाण्याचे सेवन करा. ( photo:Pixeles)

श्रावण महिना म्हटलं की समोर येते निर्मळ वातावरण, पवित्र महिना आणि शिवभक्तांचा उत्साह असलेला हा श्रावण महिन्याला हिंदू धर्मात खूप महत्व आहे. तसेच महादेवाला प्रिय असलेल्या या महिन्यात भक्तांचा विशेष उत्साह दिसून येतो. बरेच लोक या महिन्यात दर सोमवारी (श्रावणी सोमवार) आणि शनिवारी (श्रावणी शनिवार) उपवास ठेवतात. तर काहीजण संपूर्ण महिना उपवास ठेवतात. दिवसभर उपवास केल्यावर संध्याकाळी उपवास सोडतांना काही जणांना पोटदुखी, गॅस, बद्धकोष्ठता, अपचन, निद्रानाश, सुस्ती आणि थकवा अशा अनेक समस्यांना जाणवतात. या समस्या टाळण्यासाठी संध्याकाळी उपवास सोडतांना कोणत्या गोष्टी आहारात घेतल्या पाहिजे त्या जाणून घेऊयात.

लिंबूपाण्याचे सेवन करा

दिवसभर उपवास केल्यानंतर, जेव्हा तुम्ही संध्याकाळी उपवास सोडता, तेव्हा जेवणाआधी लिंबूपाणी घ्या. यामुळे पोटात तयार होणाऱ्या अ‍ॅसिडपासून सुटका होईल. तुम्ही संत्र्याचा रस किंवा संत्र्याच सेवन देखील करू शकता. कारण त्यात असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी तुम्हाला डिहायड्रेशन आणि अशक्तपणापासून दूर ठेवेल.

खजूर

श्रावणात संपूर्ण दिवसाच्या उपवासानंतर अनेकांना थकवा, अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे तुम्ही उपवास सोडण्याआधी खजुराच सेवन केल्यास शरीरात ऊर्जा जाणवेल. तसेच अशक्तपणा आणि पोटाच्या समस्यादेखील दूर होतील. खजूरामध्ये भरपूर फायबर असते, जे योग्य पचन राखण्यासदेखील मदत करतात.

केळ

उपवास सोडण्या आधी केळ्याचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले असते. यात असलेल्या फ्लेव्होनॉईड्स, अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्समुळे झटपट ऊर्जा मिळते आणिअशक्तपणा जाणवत नाही.

खीर

उपवास सोडताना खीरचे सेवन केल्याने भूक शांत होण्यास मदत होते. त्यात असलेली प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स तुम्हाला झटपट ऊर्जा देते. जे तुम्हाला दिवसभर उपवास केल्याने शरीरातील अशक्तपणापासून संरक्षण करण्यास मदत करेते. खीर बनवताना कमी साखर वापरणे चांगले. साखरेऐवजी गुळाचा देखील वापरू शकता.

हलक्या भाज्यांचे करा सेवन

उपवास पूर्ण केल्यानंतर संध्याकाळी तुमच्या आहारात भोपळा आणि टॉमॅटोसारख्या हलक्या भाज्यांचा समावेश करून उपवास सोडू शकता. यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल.

मल्टीग्रेन पीठ

श्रावणात उपवास सोडताना संध्याकाळी काहींना शिंगाड्याचे पीठ आणि कुट्टूचे पीठ यांच्या पासून तयार केलेल्या पुरी, भाकरी असे पदार्थ खायला आवडतात. तुम्ही जर या दिवसात खास करून उपवास सोडताना इतर कोणत्याही प्रकारचे पीठ न वापरता शिंगाडे आणि कुट्टूचे पीठ समान प्रमाणात वापरावे. यामुळे पोटात जडपणा, गॅस आणि अपचन यासारख्या समस्याही टाळल्या जातील आणि पोटभर जेव्याचा आनंददेखील मिळेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Include these foods to break the fast in the month of shravan scsm

ताज्या बातम्या