scorecardresearch

Weight Gain Foods: वजन झपाट्याने वाढवण्यासाठी ‘या’ गोष्टींचा आहारात समावेश करा; महिन्याभरात फरक जाणवेल

जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर जाणून घ्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश केल्याने वजन झपाट्याने वाढवता येईल.

Weight Gain
हवामानामुळे वाढते पुरुषांचे वजन. ( फोटो: संग्रहित )

Weight Gain Foods: सध्याच्या धकाधकीच्या काळात खराब दिनचर्या, चुकीचा आहार आणि ताणतणाव यामुळे काही लोक लठ्ठपणाने त्रस्त असतात तर काही लोक सडपातळपणाचे. या दोन्ही समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लोक विविध प्रयत्न करतात. लठ्ठपणाचा त्रास असलेले लोक डायटिंग आणि वर्कआउटचा अवलंब करतात. त्याच वेळी, दुबळे लोक प्रोटीन शेकचे सेवन करतात. वजन न वाढणे हा देखील एक अनुवांशिक रोग आहे, जो पिढ्यानपिढ्या पसरतो. याशिवाय अन्नामध्ये आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे वजन वाढत नाही. तज्ज्ञांच्या मते, आहारात कमी कॅलरी समाविष्ट केल्यामुळे दुबळेपणाची समस्या उद्भवते. यासाठी आहारात जास्त कॅलरी असलेल्या गोष्टींचा समावेश करणे गरजेचं आहे. तुम्हालाही वजन झपाट्याने वाढवायचे असेल तर या गोष्टींचा आहारात नक्की समावेश करा. जाणून घेऊया.

घरी स्मूदी बनवा

घरी तयार केलेल्या स्मूदीच्या ग्लासमध्ये ५०० ते ६०० कॅलरीज असतात. त्यात आवश्यक पोषक घटक देखील असतात. याच्या सेवनाने वजन वाढण्यास भरपूर मदत होते. यासाठी केळी, सुकामेवा, बेरी, सफरचंद आणि एवोकॅडो आणि दूध मिसळून स्मूदी करा. याचे सेवन केल्याने शरीरात अतिरिक्त कॅलरीज वाढतात. यामुळे तुमचे वजन लवकर वाढू शकते. मात्र, एक महत्वाची गोष्ट म्हणजे, बाजारात मिळणारी स्मूदी अजिबात पिऊ नका.

( हे ही वाचा: औषधं घेताना चुकूनही करू नये ‘या’ गोष्टींचे सेवन; आरोग्यावर होईल वाईट परिणाम)

रोज भात खा

तांदळात कार्बोहायड्रेट्स मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे वजन वाढते. एक कप तांदळात २०० ते ३००कॅलरीज असतात. एक प्लेट भात एकदा खाल्ल्याने ३०० कॅलरीज तर मिळतातच, पण शरीराला भरपूर कार्बोहायड्रेट्सही मिळतात. तुम्ही भातासोबत बटर, चीज, अंडी इत्यादी गोष्टींचे सेवन देखील करू शकता.

मांस खा

मांस आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यात अनेक आवश्यक पोषक घटक असतात. १५० ग्रॅम मांसामध्ये ४०० कॅलरीज आढळतात. त्याचबरोबर चिकन आणि अंड्यांमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. यासाठी आहारात मांस आणि चिकनचा नक्की समावेश करा. याने वजन लवकर वाढते.

( हे ही वाचा: Diabetes Tips: ‘या’ वनस्पतीची पाने चघळल्याने साखरेची पातळी नियंत्रित राहते, जाणून घ्या ते कसे वापरावे)

बटाटा खा

बटाटे वर्षभर सहज मिळतात. बटाट्यामध्ये कार्ब्स आणि कॅलरीज मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे वजन वाढू शकते. याशिवाय बटाट्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याने वजन देखील वाढते.

सॅल्मन फिश खा

सॅल्मन फिशमध्ये ओमेगा फॅटी-३ अॅसिड मुबलक प्रमाणात आढळते. १७० ग्रॅम फॅटी ऍसिडमध्ये ३०० कॅलरीज असतात. सॅल्मन फिशच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते. यासाठी आहारात सीफूडचाही समावेश करा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-08-2022 at 15:16 IST
ताज्या बातम्या