प्रदूषनामुळे होणार्‍या शारीरिक समस्येपासून बचाव करण्यासाठी ‘या’ खास पदार्थांचा आहारात करा समावेश

अनेकदा बदलत्या वातावरण आणि ऋतुनुसार आजारांना सामोरे जावे लागते, त्यांनी रोज आपल्या आहारात संत्र्याचा समावेश करावा.

lifestyle
प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी गुळ हे उपयुक्त आहे.(photo: freepik)


वाढत्या प्रदूषणामुळे लोकांना अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे, कोरोनाचा कहर आजही थांबायचं नाव घेत नाहीय. जरी कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये घट झाली आहे, परंतु दररोज हजारो लोक अजूनही या संसर्गामुळे संक्रमित होत आहेत. प्रदूषित हवेमुळे लोकांच्या फुफ्फुसांवर आधीच वाईट परिणाम होत आहे आणि दुसरीकडे कोरोना विषाणू फुफ्फुसांवर हल्ला करून त्यांना हानी पोहोचवत आहे. हे दोन्ही फुफ्फुसांना धोक्याचे कारण बनत आहेत. परंतु प्रदूषणामुळे फुफ्फुसांची समस्या असलेल्या लोकांमध्ये कोरोना व्हायरस होण्याचा धोका अधिक आहे. अशा स्थितीत तुमचे फुफ्फुसे मजबूत होण्यासाठी आणि प्रदूषण टाळण्यासाठी तुमच्या आहारात काही गोष्टींचा नक्कीच समावेश करा. त्या गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.

संत्री खाल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते आणि रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. त्यात असे अँटिऑक्सिडेंट घटक असतात, जे शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त आहेत. ज्यांना अनेकदा बदलत्या वातावरण आणि ऋतुनुसार आजारांना सामोरे जावे लागते, त्यांनी रोज आपल्या आहारात संत्र्याचा समावेश करावा.

हिरव्या भाज्यांपासून पोषक तत्व मिळते

दररोज हिरव्या भाज्यांचे सेवन केल्याने जीवनसत्त्वे आणि प्रथिने सारखी अनेक पोषक तत्वे मिळतात. शरीराची प्रतिकारशक्ती बळकट करण्याबरोबरच प्रदूषणापासून संरक्षण करण्यासही मदत होते.

आहारात आल्याचे समावेश असावा

आले अनेक औषधी गुणांनी समृद्ध आहे. आल्याच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यासह, हे प्रदूषणापासून संरक्षण करण्यास देखील मदत करते. अद्रक एका डीकोक्शन किंवा चहामध्ये प्यायल्याने कफची समस्याही दूर होते.

गुळ निरोगी बनवते

तुम्ही नियमित गुळाचे सेवन केल्याने तुमच्या शरीराचे तापमान सामान्य राहते. त्यातून पुरेसे लोह मिळत असल्याने रक्तात ऑक्सिजन व्यवस्थित तयार होतो. प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी हे उपयुक्त आहे. अनेकांना हिवाळ्याच्या दिवसात फुफ्फुसांमध्ये कफ जमा होतो. हा कफ दूर करण्यासाठी गुळ हे उत्तम औषध आहे. ते चहामध्ये घालून पिणे अधिक फायदेशीर आहे.

आवळा व्हिटॅमिन सी समृद्ध आहे

आवळा व्हिटॅमिन सी चा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे शरीरातील मुक्त रॅडिकल्स स्वच्छ करण्यात मदत करतात. व्हिटॅमिन सी तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करते. त्याच वेळी, प्रदूषणाच्या धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे. जर तुम्ही त्याचे नियमित सेवन केले तर अनेक आजार टाळता येतील.

काळी मिरी कफ बरे करण्यास मदत करते

काळी मिरीमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. ते एका डिकोक्शनमध्ये किंवा चहामध्ये टाकून प्यायल्याने फुफ्फुसांमध्ये जमा झालेला कफ बाहेर काढून टाकण्यास मदत होते. काळी मिरीचा प्रभाव गरम असतो त्यामुळे त्याचे सेवन तुम्ही योग्य प्रमाणात केल्याने सर्दी आणि खोकल्यामध्ये आराम मिळतो. जर तुम्ही रोज काळी मिरी पावडर आणि मध वापरत करत असाल तर ते प्रदूषण टाळण्यास देखील मदत करेल.

(टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Include these special foods in your diet to prevent physical problems caused by pollution scsm

ताज्या बातम्या