Fertility Foods: मूल होण्यासाठी आई आणि वडील दोघेही निरोगी असणे महत्वाचे आहे. आजकाल उशीरा विवाह आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे अनेक वेळा जोडप्यांना कुटुंब नियोजनात अडचणींचा सामना करावा लागतो. जर तुम्हाला आई किंवा वडील बनायचे असेल तर तुमची प्रजनन क्षमता देखील चांगली असली पाहिजे. त्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही सुपरफूड्सचा समावेश केला पाहिजे. सुपरफूड्स मध्ये अँटिऑक्सिडंट्स, फॅटी ऍसिडस् आणि फायबर असतात. हे पदार्थ गंभीर आजारांच्या धोक्यापासूनही बचाव करतात, जर तुम्हाला तुमची प्रजनन क्षमता चांगली ठेवायची असेल तर हे पदार्थ रोज खाणे सुरू करा आणि तुमच्या दैनंदिन आयुष्यात या सुपरफूडचा नक्की समावेश करा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि तुमचे अनेक आजारांपासून सरंक्षण करतात. त्यात फॉलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन सी दोन्ही भरपूर प्रमाणात असतात. हिरव्या पालेभाज्या हे ओव्हुलेशनमध्ये मदत करतात. तसंच गर्भधारणेदरम्यान, ते गर्भपाताचा धोका आणि गुणसूत्रांशी संबंधित कोणत्याही समस्या कमी करतात. पालक, मेथी, ब्रोकोली या भाज्यांचा आहारात समावेश करू शकता.

( हे ही वाचा: गरोदरपणाची लक्षणे दिसूनही रिपोर्ट निगेटिव्ह येत आहेत? मग जाणून घ्या यामागची मुख्य कारणे)

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियांमध्ये झिंकची मात्रा मुबलक प्रमाणात असते. हे स्त्री आणि महिला दोघांच्या प्रजनन क्षमतेसाठी चांगले मानले जाते.भोपळ्याच्या बियांमध्ये असलेली झिंकची मात्रा पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन आणि वीर्य पातळी वाढवतात. तसंच पुनरुत्पादक अवयवांमध्ये रक्त प्रवाह देखील वाढवतात. झिंकची मात्र आपली प्रजनन प्रणाली देखील मजबूत करते.

केळी

व्हिटॅमिन बी ६ केळीमध्ये आढळते. केळ्यांमध्ये बसलेले व्हिटॅमिन बी फर्टिलाइजेशन प्रक्रियेत महत्वाचे ठरते. केळ्यांमध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी देखील भरपूर असते. केळी जर तुम्ही दररोज खाल तर तुमचा एग आणि शुक्राणूंची गुणवत्ता सुधारेल.

( हे ही वाचा: Male Fertility: पुरुषांची प्रजनन क्षमता वेगाने वाढवतात हे सहा प्रकारचे हेल्दी फूड; मिळतात आश्चर्यकारक फायदे)

सुका मेवा

प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे ड्रायफ्रूट्स आणि नट्समध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. अक्रोडमध्ये सेलेनियम असते, जे गुणसूत्रांचे नुकसान कमी करते. तसंच त्यात अँटी-ऑक्सिडेंट देखील असतात जे एग उत्पादनास प्रोत्साहन देतात. जर तुम्ही फॅमिली प्लॅनिंग करत असाल तर रोज ड्रायफ्रुट्स आणि नट्स खायला सुरुवात करा. याने बराच फायदा मिळेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Include these superfoods in your diet for male and female fertility gps
First published on: 09-08-2022 at 14:30 IST