Foods For Platelets: रक्तातील प्लेटलेट्सच्या कमतरतेला थ्रोम्बोसाइटोपेनिया असेही म्हणतात. या समस्येमुळे शरीर खूप अशक्त होऊन अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. शरीरात प्लेटलेट्सच्या कमतरतेमुळे थकवा येणे, किरकोळ जखमांवर जास्त रक्तस्त्राव, हिरड्यांमधून रक्त येणे अशी लक्षणे दिसतात. प्लेटलेट्सच्या कमतरतेमुळे काही रुग्णांचा मृत्यूही होतो. त्यामुळे ही समस्या क्षुल्लक मानण्याची चूक करू नका. जर तुम्हालाही प्लेट्सलेटच्या कमतरतेमुळे अशा समस्यांना सामोरे जावे लागत असेल. तर ‘या’ गोष्टींचा आहारात विशेषत: समावेश करा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीटरूट

बीटरूटमध्ये भरपूर लोह, अँटिऑक्सिडेंट आणि हेमोस्टॅटिक गुणधर्म असतात. त्यामुळे प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने वाढू लागते. यासोबतच रोगप्रतिकारशक्तीही वाढते. बीटरूट ज्यूस, सूप, सॅलड अशा कोणत्याही प्रकारे खाणे फायदेशीर आहे.

( हे ही वाचा: Fruits To Eat During Cancer: कॅन्सरच्या रुग्णांनी आहारात ‘या’ फळांचा समावेश जरूर करावा)

खजूर

रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यासाठी खजूर देखील खूप उपयुक्त आहेत. त्यात लोहाशिवाय इतरही अनेक आवश्यक पोषक घटक असतात. त्यामुळे प्लेटलेट्स कमी झाल्यास सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाणे सुरू करा.

अक्खे दाणे

अशी अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे संपूर्ण धान्यांमध्ये असतात, जसे की ज्वारी, मका, गहू इत्यादी. जे रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वेगाने वाढवण्याचे काम करतात. त्यामुळे यांचा आहारात समावेश नक्की करावा.

( हे ही वाचा: Diabetes: तुम्हालाही मधुमेह झाला आहे का? तर ही दिनचर्या पाळा, कोणतीही अडचण येणार नाही)

डाळिंब

डाळिंबामध्ये अँटिऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे घटक असतात. त्यामुळे प्लेटलेट्सच्या कमतरतेने त्रस्त असलेल्या रुग्णांनी विशेषतः डाळिंबाचा आहारात समावेश करावा. डाळिंबाचा रस पिणे देखील फायदेशीर आहे.

पपई

जेव्हा प्लेटलेट्स कमी होतात तेव्हा सर्वात आधी पपई खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण या फळाचा परिणाम फार लवकर दिसून येतो. तसे, पपईचे सेवन करण्याव्यतिरिक्त जर तुम्ही त्याच्या पानांचा रस प्यायला तर फायदा होईल. पपईच्या पानांपासून काढलेला रस देखील डेंग्यूच्या रुग्णांना पिण्याची शिफारस केली जाते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Include these things in your diet to increase the number of platelets in the blood gps
First published on: 05-08-2022 at 15:23 IST