India vs Pakistan Prediction Today: भारताचा जय होणार की पराजय? पाहा आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रात काय म्हटलंय?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातला क्रिकेट सामना हा एका युद्धासारखा असल्याचं म्हटलं जातं. टीम इंडियाने पाकड्यांना क्रिकेटच्या मैदानावर लोळवायलाच हवं किंवा भारत हरला तर काय? असा विचार ज्यांच्या मनात आहे अशा क्रिकेटप्रेमींसाठी आचार्य चाणक्य यांचा एक विचार समर्पक ठरतोय. पाहा जय आणि पराजयबाबत आचार्य चाणाक्य यांचं नीतिशास्त्र काय म्हणतं?

ind-vs-pak-match-who-will-win-chanakya-niti

भारत आणि पाकिस्तान यांच्यातला क्रिकेट सामना हा एका युद्धासारखा असल्याचं म्हटलं जातं. दोन्ही देशातील लोक त्यांच्या टीमच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली की डोक्यावर बसवतात आणि खराब कामगिरी दिसली की त्यांच्या घरासमोरच जाऊन प्रदर्शन करण्याला सुद्धा मागे पुढे विचार करत नाहीत. पण खेळाचा मूळ उद्देश हाएकमेकांप्रती खिलाडू वृत्ती विकसित करणे हा आहे, खिलाडू वृत्ती लक्षात घेऊन एकमेकांशी युद्ध करणे हा नव्हे. खरं म्हणजे खेळामध्ये जो चांगला खेळेल तोच जिंकेल. आजच्या भारत पाक सामन्यात भारत जिंकेल की पाक? याचा विचार प्रत्येक जण करताना दिसून येतोय. टीम इंडियाने पाकड्यांना क्रिकेटच्या मैदानावर लोळवायलाच हवं किंवा भारत हरला तर काय? असा विचार ज्यांच्या मनात आहे अशा क्रिकेटप्रेमींसाठी आचार्य चाणक्य यांचा एक विचार समर्पक ठरतोय. पहा जय आणि पराजयबाबत आचार्य चाणाक्य यांचं नीतिशास्त्र काय म्हणतं?

आचार्य चाणक्य जे त्यांच्या नीतिसाठी प्रसिद्ध आहेत, त्यांनी सांगितलेली नीति ही आजच्या काळात सुद्धा मनुष्याला उपयोगाची ठरतेय. आचार्य चाणक्य, एक महान अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि हूशारीने त्यांनी आपल्या धोरणांच्या बळावर नंद घराण्याचा नाश केला होता आणि एका सर्वसाधारण मुलगा चंद्रगुप्त मौर्यला मगधचा सम्राट बनवलं. आचार्य चाणक्य यांना समाजातील जवळजवळ सर्वच विषयांची सखोल समज होती. म्हणूनच आचार्य चाणक्यांची धोरणं आजच्या काळातही अतिशय समर्पक ठरतात.

जरी आचार्य चाणक्यांची धोरणं ऐकायला अवघड वाटत असली तरी त्यांचे पालन करणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात कधीही पराभवाला सामोरे जावे लागत नाही. चाणक्यजींनी आपल्या नीतिशास्त्रात एक गोष्ट सांगितली आहे, जी माणसाच्या पराभवाचे कारण बनू शकते. चाणक्य जी म्हणाले, ‘तुमचा पराभव तेव्हा होत नाही जेव्हा तुम्ही हारता…पराभव तेव्हा होतो जेव्हा तुम्ही पुन्हा उमेदीने उठण्यासाठी नकार देता…’

या विधानामध्ये आचार्य चाणक्य यांनी पराभवाचा खरा अर्थ सांगितला आहे. वास्तविक जीवनात एखाद्या व्यक्तीला कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. पण कधीकधी असं घडतं की काही लोक कठीण समस्या पाहूनच हार मानतात. अशा लोकांबद्दल चाणक्य सांगतात की, जो माणूस हार मानतो तो आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाही. प्रत्येक परिस्थितीतून बाहेर पडण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे.

‘मनाचा पराभव म्हणजे पराभव आणि मनाचा विजय म्हणजे विजय’ अशी एक म्हण आहे. चाणक्य जी देखील या विधानाशी पूर्णपणे संबंधित होते. आचार्य चाणक्य मानतात, की प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक विचार ठेवावा आणि सर्व संकटांना खंबीरपणे सामोरे जावे. कारण सतत प्रयत्न करून आणि न थांबता प्रयत्न सुरूच ठेवल्याने माणूस शेवटी आपलं ध्येय गाठतो.

अनेकदा लोकांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळणं शक्य नसतं. मात्र, या गोष्टींनी नाउमेद न होता पुन्हा पुन्हा प्रयत्न करत रहावेत आणि पडल्यानंतरही उठण्याचा प्रयत्न करत राहावे. तसंच तुमचे मनोबल कधीही ढासळू देऊ नका.

थोडक्यात आजच्या भारत पाक महामुकाबल्यात भारताचा जय होईल की पराजय ? हे येणारी वेळ सांगेलच….पण पराभव तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत आपल्या टीम इंडियाचे खेळाडू आणि सोबतच नागरिक मनाने हार मानत नाहीत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ind vs pak prediction chanakya niti suitable for ind vs pak match win or lost can be reason of lost match defeat know what acharya says prp

ताज्या बातम्या