Independence Day 2021 Sale | Garmin आणि Amazfit स्मार्टवॉचवर मिळणार मोठी सवलत

लोकप्रिय स्मार्टवॉच कंपनी Garmin आणि Amazfit आज स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांच्या काही लोकप्रिय स्मार्टवॉचवर मोठी सवलत देत आहेत.

Independence Day 2021 sale Bumper discounts on Garmin and Amazfit smartwatches gst 97
Garmin आणि Amazfit च्या लोकप्रिय स्मार्टवॉचवर मोठी सवलत (Photo : Amazfit & Garmin.Com)

दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी आपल्या स्वातंत्र्यदिनी नागरिकांना विविध वस्तू, उपकरणांवर भरघोस सूट मिळत असते. अर्थात यंदाही ही सूट मिळणार आहेच. त्यातही तुम्हाला गेल्या अनेक दिवसांपासून नवीन स्मार्टवॉच खरेदी करायचं असेल तर मग आज तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. आज अनेक स्मार्टवॉचवर भरपूर सूट दिली जात आहे. लोकप्रिय स्मार्टवॉच कंपनी Garmin आणि Amazfit आज स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांच्या काही लोकप्रिय स्मार्टवॉचवर मोठी सवलत देत आहेत. आज आम्ही तुम्हाला गार्मिन आणि अमेझफिटच्या स्मार्टवॉचवर उपलब्ध असलेल्या सवलतींबद्दल सांगणार आहोत.

Amazonवर खरेदी करता येणार Amazfit स्मार्टवॉच, देणार इतकी सूट

तुम्हाला आज अमेझफिट स्मार्टवॉच अमेझॉनवर खरेदी करता येते. ही सवलत १५ ऑगस्टपासून दिली जात आहे. अमेझफिट आपल्या अमेझफिट जीटीएस २ मिनी, अमेझफिट बीआयपी यु, अमेझफिट बीआयपी यु प्रो (Amazfit GTS 2 mini, Amazfit BIP U, Amazfit BIP U Pro) यांसारख्या बजेट स्मार्टवॉचवर सवलत देणार आहे. अमेझफिट जीटीएस २ मिनीची खरी किंमत ६,९९९ रुपये इतकी आहे. या सेलमध्ये ही स्मार्टवॉच ६,४९९ रुपयांना विकली जात आहेत. तर अमेझफिट बीआयपी यु स्मार्टवॉच भारतात ४,९९९ रुपयांना लाँच करण्यात आली होती. परंतु, सेलमध्ये ग्राहकांना ४,६९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे.

Garmin स्मार्टवॉचवर ३० ऑगस्टपर्यंत सवलत

गार्मिन आपल्या स्मार्टवॉचवर ३० ऑगस्टपर्यंत सवलत देणार आहे. नागरिकांना येत्या ३० ऑगस्टपर्यंत हा लाभ घेता येईल. दरम्यान, गार्मिन स्मार्टवॉच अधिकृत साइटवरून खरेदी केली जाऊ शकतात. गार्मिन विवोस्मार्ट ४ ची रिटेल किंमत १३,४९० रुपये आहे. मात्र, हे उत्पादन या सेलदरम्यान १०,८९० रुपयांना विकले जात आहे. हे स्मार्टवॉच ब्लॅक/ स्लेट/ रोझगोल्डमध्ये बेरी बँडसह/ ग्रे/ रोजगोल्ड एस/ एम/ ब्लॅक, स्लेट एल या रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.

गार्मिन वेनू स्क्यूची किंमत २०,९९० रुपये इतकी आहे. पण सेलदरम्यान ही स्मार्टवॉच १७,९९० रुपयांना विकली जात आहे. गार्मिन वेनू स्क्यू म्युझिक स्मार्टवॉचची रिटेल किंमत २५,९९० रुपये आहे. तर या सेलमध्ये ती १२,९९० रुपयांना उपलब्ध करण्यात आली आहेत. या सेलमध्ये गार्मिन लिली २२,९९० रुपयांना विकली जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Independence day 2021 sale bumper discounts on garmin and amazfit smartwatches gst

Next Story
पुरुषांमध्येही वाढतेय स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण!