Independence Day 2026 Wishes in Marathi: १५ ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमान आणि आनंदाचा दिवस. याच दिवशी भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस देशभरात मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा केला जातो. यंदा म्हणजेच १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये आणि विविध संस्थांमध्ये तिरंगा फडकवून स्वातंत्र्यसैनिकांना आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना अभिवादन केले जाते. या दिवशी सोशल मीडियावरही देशभक्तीपर पोस्ट, फोटो, व्हिडीओ आणि शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळतो.
आपल्या प्रियजनांना, मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाइकांना स्वातंत्र्यदिनाच्या खास शुभेच्छा देण्यासाठी तुम्हीही सुंदर देशभक्तीपर संदेश शेअर करू शकता. आज आम्ही तुम्हाला स्वातंत्र्यदिनाच्या अशाच काही खास मराठी शुभेच्छा, चारोळ्या आणि संदेश सांगणार आहोत, जे तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता. तसेच WhatsApp Status, Facebook किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करून देशप्रेम व्यक्त करू शकता.
स्वातंत्र्य दिनानिमित्त मित्रपरिवाराला पाठवा देशभक्तीभर शुभेच्छा!
देशाचा मान, देशाचा अभिमान,
तीन रंगांत सजलेला तिरंगा, हीच भारताची शान!
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
जय हिंद!

मातीच्या कणाकणात आहे देशप्रेमाची शान,
तिरंग्याच्या रंगात आहे भारताची आन-बान!
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सलाम आहे त्या वीरांना,
ज्यांच्यामुळे आज हा स्वातंत्र्यदिन पाहिला;
ती आई आहे भाग्यशाली,
जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला!
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तिरंगा फक्त ध्वज नाही,
तो आपल्या स्वाभिमानाची ओळख आहे.
भारत फक्त देश नाही,
तो आपल्या प्रत्येकाच्या हृदयातला अभिमान आहे.
जय हिंद! स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!

विविधतेतील एकता हीच देशाची शान आहे
म्हणूनच माझी भारतभूमी महान आहे
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जय हिंद!

तिरंगा फडकतोय अभिमानाने,
भारत सजतोय स्वाभिमानाने;
देशासाठी जगण्याचा घेऊया संकल्प,
हीच शूर वीरांना खरी आदरांजली!
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वातंत्र्यवीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निःस्वार्थ त्यागानेच भारत झाला महान!
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सीमेवर जवान लढतो म्हणून आपण सुरक्षित आहोत,
त्यांच्या त्यागामुळे आज आपण स्वातंत्र्याच्या सावलीत आहोत.
देशाच्या प्रत्येक वीराला मनापासून सलाम!
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!
ना जात महत्त्वाची, ना धर्म महत्त्वाचा,
भारत माझा देश हीच ओळख प्रत्येकाची!
एकतेचा धागा कायम जपूया,
स्वातंत्र्याचा उत्सव मनापासून साजरा करूया
जय हिंद!
रंग वेगळे, रूप वेगळे, भाषा-वेश जरी अनेक,
भारतभूमीचे सुपुत्र आम्ही, मनाने सारे एक!
८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
अशा प्रकारे तुम्हीही १५ ऑगस्टच्या निमित्ताने आपल्या प्रियजनांना देशप्रेमाने भरलेल्या सुंदर शुभेच्छा, संदेश आणि चारोळ्या पाठवू शकता. WhatsApp, Facebook किंवा सोशल मीडियावर हे संदेश शेअर करून स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आणि देशभक्तीची भावना आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत व्यक्त करा. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
