मसाले हे पाकककलेची सुरुवात आहे. जर आपण भारतीय मसाल्याचा वापर करायला शिकलो तर बटाटय़ासारख्या भाजीचे आपण एक चवदार पदार्थात रूपांतर करू शकतो. कोणत्याही पाककौशल्यासाठी गरम मसाला, बाकी मसाले, व हिरवे मसाले यांचा वापर व महत्त्व वेगळे असते.

बाजारातील अनेक महाग पाककृती मसाल्यासाठी बाजारात जावे लागते. त्या मसाल्याची लिस्ट, साधारण मसाले दोन प्रकारे वापरले जातात. एक तर पावडर करून किंवा दुसरे म्हणजे वाटून.

सुगंधित गरम मसाला

मात्रा : ४५० ग्रॅम.

साहित्य : १७५ ग्रॅम छोटी वेलची, १२५ ग्रॅम जिरे, १२५ ग्रॅम शहाजिरे, ३० तुकडे दालचिनी, २० ग्रॅम लवंग, २ जायफळ.

कृती : सर्व सामग्री खलबत्त्यात कुटून पावडर तयार करा. व साफ डब्यात भरून ठेवा. हा मसाला हलक्याफुलक्या व्यंजनासाठी उपयुक्त आहे.

चाट मसाला

मात्रा : ४५० ग्रॅम.

साहित्य : ६५ ग्रॅम जीे, ६५ ग्रॅम काळी मिरी, ६० ग्रॅम काळे मीठ. ३० ग्रॅम सुका पुदीना, ५ ग्रॅम ओवा, ५ ग्रॅम हिंग, ४ ग्रॅम सुंठ, २० ग्रॅम तिखट.

कृती :  आमचुर, सुंठ पावडर मीठ व तीखट सोडून बाकी सामग्री खलबत्त्यात कुटून घ्या. व गाळून बाकी सामग्री मिसळा. साफ कोरडय़ा डब्यात भरून घ्या.

तीळ खोबऱ्याची चटणी

साहित्य : १ वाटी खोबरे, २ चमचे जिरे, पाव वाटी डाळ, पाव वाटी तीळ, आवडीनुसार तिखट, पाव वाटी कढिलिंब, २ टे. स्पून तेल, मीठ.

कृती : प्रथम खोबऱ्याचे तुकडे, तीळ, जिरे, कढिलिंब हे सर्व भाजून घ्यावे. किंचित तेल घालून नंतर त्यात लाल तिखट घालावे. या मिश्रणात मीठ घालून मिक्सरमधून जाडसर चटणी वाटून घ्यावी.

गरम मसाला

साहित्य : २०० ग्रॅम जिरे, ६० ग्रॅम धने, ४५ ग्रॅम सुंठ, २० तुकडे दालचिनी, २० ग्रॅम लवंग, २० ग्रॅम जावित्री, १५ ग्रॅम तेजपान, २ जायफळ.

कृती : सर्व सामग्री खलबत्त्यात कुटून बारीक पावडर तयार करा. नंतर साफ कोरडय़ा हवाबंद डब्यात भरून ठेवा. हा मसाला मटण बनविण्यासाठी उत्तम आहे.

ब्रेड कटलेट

साहित्य :  १० स्लाइस ब्रॅड, ४ हिरव्या मिरच्या, १/२ कप कोथिंबीर, १ तुकडा आले, मीठ चवीनुसार, १०० ग्रॅम चीज, तळण्या तेल.

कृती : हिरवी मिरची व आले बारीक वाटून घ्या. कोथिंबीर बारीक चिरा. १ चिज किसणीने किसून घ्या. ब्रेडचे स्लाईस पाण्यात बुडवून लगेच काढून घ्या. हाताने दाबून त्यांचे पाणी काढून त्यांना हाताने कुस्करा. त्याच्यात हिरव्या मिर्ची, कोथिंब्ीार, आले, मीठ, मिसळून एकत्र करा. आता थोडेसे मिश्रण हातावर घ्या. त्याच्या मधोमध चीज ठेवून परत बंद करा. चपटे लहान लहान कटलेट तयार करा. एका कढईत तेल गरम करून कटलेट तळून घ्या. गरम- गरम कटलेट टमाटर सॉस व हिरव्या चटणीबरोबर वाढा.
response.lokprabha@expressindia.com