कोणत्या Chill Scene चा महत्त्वाचा भाग म्हणजे बिअर ! जगभरात सर्वाधिक विक्री होणाऱ्या पेयांपैकी एक अशी बिअर पार्टीची शान मानली जाते. आठवडाभर ऑफिस मध्ये राबल्यावर एखाद्या वीकेंडला मित्रांसोबत बियर पिऊन अनेक जण तणावातून मुक्त होत असल्याचं सांगतात. यामुळेच या बिअरच्या सेलिब्रेशनसाठी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बिअर डे साजरा केला जातो. यंदा ५ ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा होणार आहे. २००७ साली पहिल्यांदा हा दिवस सेलिब्रेट केला गेला.या निमित्ताने जुन्या मित्रांना भेटता यावे तसेच बिअर निर्मात्या कंपनी, कर्मचारी, बारटेंडर आणि इतर बिअर तंत्रज्ञांच्या कामाचे कौतुक करावे हा या दिवसामागील उद्देश होता. या दिवसाच्या निमित्ताने या जगप्रसिद्ध बिअर विषयी काही न ऐकलेल्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

Heineken Beer Sneakers: शूज मध्ये बिअर, ‘हे’ नवे डिझाईन पाहिले का?

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
IAS officer awanish sharan share mpsc examination preparation tip
“इतकंही कठीण नाही” UPSC क्रॅक करण्यासाठी नक्की किती वेळ अभ्यास करावा? खुद्द प्रसिद्ध IAS नं दिल्या टिप्स
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

बिअर ची निर्मिती करण्यामागे वैज्ञानिक अभ्यास असतो. इतकेच नव्हे तर या अभ्यासासाठी विशेष शैक्षणिक शाखा सुद्धा आहे ज्यास Zythology या नावाने ओळखले जाते. या अभ्यासक्रमात बिअर मधील महत्त्वाचे घटक, मद्यनिर्मिती प्रक्रियेवर त्यांच्यावरील परिणाम, बिअरचे विविध प्रकार व एकूणच बिअरचा इतिहास या मुद्द्यांचा समावेश असतो. या अभ्यासक्रमातून समोर आलेल्या माहितीनुसार बिअर विषयी खास गोष्टी खालीलप्रमाणे:

  • आपण अनेकदा Chilled Beer बिअर बद्दल ऐकले असेल पण जगभरातील तज्ज्ञांच्या माहितीनुसार, थंड बिअर जिभेवरील संवेदना जागी करते आणि आपल्याला चव कळते पण अति थंड बिअर मुळे जीभ सुन्न होऊ शकते परिणामी आपल्याला कोणतीच चव जाणवणार नाही.
  • बिअर ही नेहमी गडद रंगाच्या बॉटल मध्ये सर्व्ह केली जाते. बिअर मध्ये असणारे घटक जर का सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आले तर त्यात सल्फरस नावाचा वायू तयार होतो. त्यामुळे शक्यतो गडद हिरव्या किंवा ब्राऊन रंगाच्या बॉटल मध्ये बिअर विकली जाते.
  • बिअर निर्मिती क्षेत्रात सुरुवातीला महिलांचे वर्चस्व होते. बिअर च्या Brewers मध्ये महिलांनी बिअरची सर्वप्रथम निर्मिती केली होती. मात्र या Brewers चे मालकी हक्क पुरुषांचे असल्याने शक्यतो सौंदर्याच्या निकषावरच काम दिले जात होते.
  • बिअरची सर्वप्रथम निर्मिती ४००० वर्षांपूर्वी सुमेरियन लोकांकडून झाली होती. सुरुवातीला स्ट्रॉचा वापर करून बिअर प्यायली जायची. यातही उच्चवर्णीय व सधन व्यक्तींकडून सोन्या चांदीचे स्ट्रॉ वापरले जात.
  • बिअर मधील कॅनाबॅसीच्या वर्गातील हॉप्स हे घटक बिअरला कटुत्व देतात याचा प्रभाव गांजा प्रमाणे होउ शकतात.

दरम्यान, अनेक सर्वेक्षणातून असे समोर आले आहे की बिअरचे योग्य प्रमाणात आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र ही सवय व्यसनात बदलू देऊ नये किंवा अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

(टीप- सदर लेख हा माहितीपर आहे, यातून मद्यपानास प्रोत्साहन देणे हा उद्देश नाही)