कॉफी हे पेय चहाइतकंच आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. ‘a lot can happen over coffee’ असं म्हटलं जातं. वाईट मूडही फटक्यात ठीक करायचा असेल, झोप घालवायची असेल किंवा अगदी आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर प्रेमाची कबुली द्यायची असेल यात कॉफीला पर्याय नाही. कॉफीचा एक घोट कंटाळवाण्या मूडला लगेच तरतरी आणतो. अनेकांना माहितीही असेल की कॉफीची निर्मिती आणि निर्यात करणारा भारत हा आशिया खंडातला तिसरा मोठा देश आहे. जगभरात कॉफी हे पेय पिणारा वर्ग खूप मोठा आहे आणि जगाच्या पाठीवर प्रत्येक देशात कॉफी तयार करण्याची त्यांची अशी खास पद्धत आहे.

Maharashtrachi Hasyajatra fame prithvik pratap and prajakta mali video viral
Video: पृथ्वीक प्रतापने शेअर केला प्राजक्ता माळीबरोबर ऑस्ट्रेलियातून व्हिडीओ, नेटकरी म्हणाले, “मग कर्जतचं फार्म हाऊस…”
What Uddhav Thackeray Said?
“..तर मग आम्ही तुमच्याबरोबर येतो”, लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
what is mephedrone drug in marathi, md drug information in marathi, why intake of md drug a serious issue in marathi
विश्लेषण : कॉलेज युवकांना विळखा घालणारा घातक अमली पदार्थ… मेफेड्रोन (एमडी) सध्या चर्चेत का?
कुतूहल – कापसाच्या विविध जाती

या सगळ्यात civet cat coffee ही सर्वात महागडी कॉफी समजली जाते. ही कॉफी उदमांजरच्या (civet cat) विष्ठेतील कॉफीच्या बियांपासून तयार केली जाते. उदमांजर कॉफीची फळं खातात. फळांचा गर ती सहज पचवते पण बिया मात्र उदमांजरांना पचवता येत नाही. तिच्या विष्ठेमार्फत बिया बाहेर फेकल्या जातात. उदमांजर कॉफीची तिचं फळं खाते जी चांगली आणि पिकलेली असतात, अशीही धारणा आहे. या ११३ ग्राम कॉफीची किंमत अॅमेझॉनवर ५ हजार ९३१ रुपये इतकी आहे. यावरुनच तुम्हाला जगभरातील या कॉफीच्या किंमतीचा अंदाज बांधता येईल.

आणखी वाचा : VIDEO: ‘कॉफी पे चर्चा’… Coffee Day निमित्त जाणून घ्या खास गोष्टी

मांजरीच्या पोटात असलेल्या द्रव्यामुळे कॉफीच्या बियांची चव वाढवण्यास मदत होते. तिची विष्ठा गोळा केल्यानंतर त्यातून बिया वेगळ्या केल्या जातात आणि त्यानंतर त्यापासून कॉफी तयार केली जाते. ही विष्ठा शोधणंही वेळखाऊन आणि कठीण काम आहे त्यामुळे ही कॉफी तयार करण्याच्या प्रक्रियेत जी लोक गुंतले आहेत त्यांची मजुरीही अधिक आहे. या सगळ्या कारणामुळे civet cat coffee सगळ्यात महागडी कॉफी समजली जाते. इंडोनेशियामध्येही अशाच प्रकारे महागडी कॉफी तयार केली जाते तिला Kopi Luwak म्हणूनही ओळखलं जातं. विशेष म्हणजे ही कॉफी भारतामधील कर्नाटकमध्ये कूर्ग जिल्ह्यामध्ये तयार केली जाते.