आंतरराष्ट्रीय पुरुष दिन दरवर्षी १९ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. मात्र, ज्या उत्साहाने आणि पाठिंब्याने महिला दिन साजरा केला जातो, तसा उत्साह आणि क्रेझ पुरुष दिनाबाबत मात्र दिसत नाही. हा दिवस प्रामुख्याने पुरुषांना भेदभाव, शोषण, अत्याचार, हिंसा आणि असमानता यापासून वाचवण्यासाठी आणि त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी साजरा केला जातो. तसेच १९ नोव्हेंबर रोजी ८० देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो आणि त्याला युनेस्कोचाही पाठिंबा आहे. प्रत्येक वर्षी या दिनानिमित्त एक खास थीमही ठेवली जाते.

पुरुष दिनाची सुरुवात अशी झाली

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन हा १९ नोव्हेंबर रोजी साजरा होणारा वार्षिक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे. याची सुरुवात ७ फेब्रुवारी १९९२ रोजी थॉमस ऑस्टर यांनी केली होती. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या प्रकल्पाची कल्पना एक वर्षापूर्वी ८ फेब्रुवारी १९९१ रोजी करण्यात आली होती. यानंतर १९९९ मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आला.

Raj Thackeray, mahayuti support
राज ठाकरे यांच्या भूमिकेत कायमच सातत्याचा अभाव
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
mpsc Mantra  Current Affairs Question Analysis
mpsc मंत्र : चालू घडामोडी प्रश्न विश्लेषण
loksatta editorial Shinde group bjp dispute over thane lok sabha seat
अग्रलेख: त्रिकोणाच्या त्रांगड्याची त्रेधा!

भारतात पहिल्यांदा २००७ मध्ये जागतिक पुरुष दिन साजरा करण्यात आला. भारतात ८ मार्च १९२३ पासून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. त्यानंततर भविष्यात कधी पुरुष दिनाची आवश्यकता भासेल असे कोणाला वाटलेही नसेल. परंतू, तो दिवस उजाडला. लैंगिक समानतेला चालना देण्यासाठी हा दिवसही साजरा होऊ लागला.

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन २०२१ ची थीम

दरवर्षी विविध थीमवर आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. यावेळची थीम आहे – आंतरराष्ट्रीय पुरुष दिन 2021 ची थीम ‘पुरुष आणि महिलांमधील चांगले संबंध’ आहे. ती म्हणजे ‘स्त्री-पुरुषांमधील उत्तम संबंध’ प्रस्थापित करणे.

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचं महत्व

पुरुषांच्या आरोग्याप्रति, लिंग संबंधाविषयी जागरुकता, लैंगिक समानतेचा विकास करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. एका प्रमुख वेबसाईटने माहिती दिल्याप्रमाणे, जगात महिलांपेक्षा ३ पट जास्त पुरुष आत्महत्या करतात. ३ पैकी एक पुरुष घरगुती हिंसाचाराचा बळी आहे. पुरुष स्त्रियांपेक्षा ४ ते ५ वर्षे आधी मरतात. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता दुप्पट असते. पुरुष दिन हा पुरुषांच्या ओळखीच्या सकारात्मक पैलूंवर काम करतो. त्यामुळे या सर्व गोष्टींबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा केला जातो. कुटुंब, समाज, समुदाय, समाज व्यवस्था या सर्वामध्ये पुरुषांच्या योगदानाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आजच्या दिवशी प्रयत्न केला जातो.