International Yoga Day : शरीर आणि मन दोहोंचे स्वास्थ्य राखण्यासाठी योगा निश्चितच उत्तम व्यायामप्रकार आहे. उत्तम योगसिद्धी प्राप्त करायची असेल तर, सातत्य, सामर्थ्य आणि संयम असणे आवश्यक असते. सुरूवातीच्या काळात योगा शिकताना घाई किंवा काही अन्य कारणांमुळे मोठ्या चुका होण्याची शक्यता असते. या चुकांचे परिणाम गंभीर सुद्धा असू शकतात. आजच्या जागतिक योग दिनानिमित्त जाणून घेऊया योग अभ्यास करताना कोणत्या गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे.

दुसऱ्याशी तुलना करणे – योगा वर्गांमध्ये नवखे असणारे लोक बहुतेकदा इतरांशी तुलना करण्याच्या नादात स्वत:ला इजा करून घेताना दिसतात. दुसऱ्या व्यक्तीपाशी असणारी शरीराची लवचिकता किंवा त्या स्थितीत पोहचण्याचा मोह अनेकांना होतो. मात्र, प्रत्येकाच्या शरीराची ठेवण आणि आकार वेगळा असतो ही मुख्य गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. त्याशिवाय एखादी व्यक्ती किती काळापासून योगाचा सराव करत आहे, ही बाबही लक्षात घेतली पाहिजे. मात्र, योगा शिकतानाच्या सुरूवातीच्या काळात इतरांशी बरोबरी करण्याची चूक तुम्हाला चांगलीच भोवू शकते.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…
Eating Chavalichi Bhaji Can Cure Thyroid
चवळीच्या भाजीने थायरॉईड बरा होतो का? वजन कमी करताना चवळी किती फायद्याची, तज्ज्ञांची स्पष्ट माहिती, वाचा

नक्की वाचा >> समजून घ्या : २१ जून रोजीच का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय योग दिन?

वयोमानानुसार शारीरिक स्थितीत होणारा बदल ध्यानात न घेणे- बदलत्या वयानुसार आपल्या शारीरिक स्थितीदेखील बदलते याचे भान अनेकांना राहत नाही. लहानपणी आपण करत असलेली एखादी गोष्ट मोठेपणीही आपल्याला जमेल असा अनेकांचा भ्रम असतो. ही गोष्ट योगा करताना फार महागात पडू शकते. वाढत्या वयामुळे शरीराची लवचिकता आणि हालचालींवर येणाऱ्या मर्यादेचा विचार केला पाहिजे. त्यामुळे गतकाळातील शरीराची ताकद आणि लवचिकतेशी तुलना करून योगासन करणे टाळा.

नक्की वाचा >> Yoga Day 2021: जगभरातील लोकांना मिळणार mYoga App ची शक्ती – मोदी

अपुरी माहिती आणि अतिरेक- एखादा क्रीडाप्रकार किंवा व्यायाम नियमितपणे करत असल्याने योगासन सहज जमेल असा गैरसमज तुमचा घात करू शकतो. वरकरणी सोपे दिसणारे आसन प्रत्यक्षात मात्र स्नायुंवर अधिक जोर पाडणारे असू शकते. त्यामुळे प्रत्येक आसन हे योग्य माहिती घेऊन करणे गरजेचे असते. योगा वर्गांमध्ये अनेकजण नवीन उत्साहाच्या भरात शरीरावर क्षमतेपेक्षा अधिक ताण देतात आणि मग त्यांना दुखापतीचा सामना करावा लागतो. त्यामुळे योगा वर्गांमध्ये स्वत:ची शारीरिक क्षमता जाणणे आणि प्रशिक्षकाच्या सूचना ऐकणे केव्हाही उत्तम.

नक्की पाहा >> Yoga Day 2021: योग अभ्यासाला सुरुवात कशी आणि कुठून करायची या गोंधळात असाल तर हे Videos पाहाच

सातत्याचा अभाव- योगसाधनेच्या सुरूवातीच्या काही सत्रांनंतर शरीर आणि मनाला मिळणारा निवांतपणा यामुळे अनेकजण भारावले जातात. नवीन काही तरी गवसल्याच्या उत्साहात पुढील काही दिवस नियमितपणे योग सत्रांना हजेरीही लावली जाते. मात्र, सुरूवातीचा उत्साह ओसरल्यानंतर किंवा कामाच्या धावपळीत हळुहळू योग वर्गांना नियमितपणे जाणे बंद होते. अनेक दिवस योगापासून दूर राहिल्यानंतर पुन्हा योगासाधनेला सुरूवात कराल तेव्हा कदाचित पूर्वी जमणाऱ्या अनेक गोष्टी करणे तुम्हाला शक्य होणार नाही. याचे एकमेव कारण म्हणजे सातत्याचा अभाव. त्यामुळे सुरूवातीच्या दिवसांत आठवड्यातून किमान तिनदा तरी योगाप्रकार नियमितपणे करणे चांगले.

नक्की वाचा >> Yoga Day 2021: जीमला जाण्याचा कंटाळा येतो? मग घरीच रोज ही तीन योगासनं करा आणि तंदरुस्त राहा

एखादी गोष्ट न जमल्यामुळे निराश होऊन प्रयत्न सोडणे- सुरूवातीच्या काळात अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर एखादे आसन न जमल्यामुळे खूपजण निराश होताना दिसतात. एखादे आसन का जमत नाही किंवा ओणवे उभे राहिल्यानंतर पायाच्या बोटांना स्पर्श का करता येत नाही या प्रश्नांमुळेच लोक हताश होतात. निराश झालेले हे लोक मग, योगासन ही गोष्ट आपल्यासाठी नाहीच, असा ग्रह करून प्रयत्न करण्याचे थांबवतात. योगसाधनेपूर्वीची शारीरिक आणि मानसिक स्थिती आणि योगसाधनेनंतर शरीरात आलेली लवचिकता, सुधारलेली श्वसनक्रिया, योगाभ्यास केल्यानंतर तणावापासून मिळणारी मुक्ती, निवांतपणा या सकारात्मक गोष्टींचा त्यांना विसर पडतो.