Yoga Asanas for Weight Loss:  आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी २१ जून रोजी साजरा (International Yoga Day 2022) केला जातो. या दिवशी जगभरात योगाशी संबंधित अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. देश-विदेशातील लोकही या दिवशी योगा करतात. योग हा भारताने संपूर्ण जगाला दिलेला अमूल्य वारसा आहे. निरोगी शरीरासाठी योगा खूप महत्वाचा आहे. योगाच्या माध्यमातून तुमच्या शरीरात अनेक चांगले बदल दिसून येतात. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यासाठी योगासने खूप चांगली मानली जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजच्या काळात वजन वाढणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी लोक अनेक पद्धतींचा अवलंब करतात, पण तरीही कोणताही परिणाम होत नाही. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला अशाच काही योगासनांबद्दल सांगणार आहोत, जे रोज केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करायचे असेल तर योगासनेसोबतच सकस आहार घेणे आवश्यक आहे.

(हे ही वाचा: Father’s Day 2022: या ‘फादर्स डे’ निमित्त वडलांना द्या खास शुभेच्छा!)

चतुरंग दंडासन (Chaturanga Dandasana/ Plank Pose)

चतुरंग दंडासन हे पोट मजबूत करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. हे जितके सोपे वाटते तितकेच त्याचे फायदेही आहेत. जेव्हा तुम्ही या आसनात असता तेव्हाच तुम्हाला तुमच्या पोटाच्या स्नायूंमध्ये त्याची तीव्रता जाणवू लागते.

(हे ही वाचा: Diabetes : मेथी दाणे साखर नियंत्रित ठेवण्यासाठी करतात मदत, जाणून घ्या फायदे)

विरभद्रासन (Virabhadrasana/ Warrior Pose)

तुम्हाला तुमच्या मांड्या आणि खांदे टोन करायचे असतील तर ही आसने तुम्हाला मदत करू शकतात. विरभद्रासन केल्यावर काही मिनिटांनंतर तुम्हाला टाइट क्वाड मिळेल. या योगासन आसनामुळे तुमचे मागचे टोक, पाय आणि हात टोनिंगसह तुमचे संतुलन सुधारते. हे तुमचे पोट टोन करण्यास देखील मदत करते.

(हे ही वाचा: भारतातील पहिली खासगी ट्रेन उद्या पोहोचणार शिर्डीला, जाणून घ्या काय आहे तिची खासियत)

त्रिकोनासन (Trikonasana/Triangle pose)

त्रिकोनासन पचन सुधारण्यास तसेच ओटीपोटात आणि कंबरेवर साठलेली चरबी कमी करण्यास मदत करते. हे संपूर्ण शरीरात रक्त प्रवाह वाढवते आणि सुधारते. हे आसन केल्याने कमरेच्या आजूबाजूच्या भागातून चरबी निघून जाते. हे आसन संतुलन आणि एकाग्रता देखील सुधारते.

(हे ही वाचा: Diabetes: बडीशेप मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहे वरदान! ‘अशा’ प्रकारे करा वापर)

अधो मुख स्वानसन ( Adho Mukha Svanasana/ Downward Dog pose)

हे आसन केल्याने पोटाच्या खालच्या स्नायूंना बळकटी मिळते आणि हे आसन मणक्यालाही आधार देते. या आसनामुळे स्नायू मजबूत होण्यास मदत होते. असे केल्याने एकाग्रता आणि रक्ताभिसरण योग्य होते.

(हे ही वाचा: वजन कमी करण्यापासून ते मधुमेह नियंत्रणापर्यंत, जाणून घ्या ‘या’ फुलाच्या बियांचे आश्चर्यकारक फायदे)

सर्वांगासन (Sarvangasana/ Shoulder Stand Pose)

सर्वांगासन केल्याने पचन सुधारते तसेच शरीराला शक्ती मिळते, तसेच हे आसन मेटाबॉलिज्म वाढविण्यास तसेच थायरॉईड पातळी संतुलित करण्यासाठी ओळखले जाते. हे आसन पोटाचे स्नायू आणि पाय मजबूत करते आणि श्वसन प्रणाली सुधारते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International yoga day 2022 want to lose weight these 5 asanas will help ttg
First published on: 19-06-2022 at 09:50 IST