नवरात्री हा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. लवकरच गरब्याचा आवाज आपल्या कानांमध्ये घुमू लागेल. नवरात्रीच्या दिवसांमध्ये गरबा खेळणाऱ्यांची संख्या जितकी मोठी आहे तितकीच उपवास करणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. या काळात लोक कडक उपवास करतात. मात्र, उपवास करत असताना आपल्याला लांबचा प्रवास करावा लागला तर? अशा प्रवासात उपवास करणाऱ्यांची खूपच पंचाईत होते. मात्र आता काळजी करण्याची गरज नाही. कारण आयआरसीटीसीने (IRCTC) रेल्वे प्रवाशांना नवरात्रीची खास भेट दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय रेल्वेने नवरात्र स्पेशल मेन्यूला मंजुरी दिली आहे. यानुसार रेल्वेमध्ये उपवास करणाऱ्या प्रवाशांना फलाहाराबरोबरच उपवासात खाण्याचे पदार्थ दिले जाणार आहेत. भारतीय रेल्वेच्या प्रमुख गाड्यांच्या पॅन्ट्रीमध्ये फलाहाराची व्यवस्था केली जात आहे. एवढेच नाही तर याची शुद्धता राखण्यासाठी नवरात्रीच्या काळात पॅन्ट्रीमध्ये मांसाहारी पदार्थ तयार केले जाणार नाहीत. आयआरसीटीसीने ‘सप्तक्रांती’ आणि ‘वैशाली सुपरफास्ट’ सारख्या प्रमुख गाड्यांच्या पॅन्ट्रीकार ऑपरेटरच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

यंदा २६ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. या उत्सवात अनेक घरांमध्ये घटस्थापना तसेच कुलदेवतेची पूजा केली जाते. यादरम्यान शहरात राहणारे लोक आपल्या घरी जातात. अशा परिस्थितीत उपवास करणाऱ्या लोकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आयआरसीटीसीने ‘सप्तक्रांती’ आणि ‘वैशाली सुपरफास्ट’ सारख्या प्रमुख गाड्यांच्या पॅन्ट्रीकार ऑपरेटरच्या ‘नवरात्र स्पेशल मेन्यू’च्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

काहीच न बोलता टिकटॉकर Khaby Lame एका पोस्टमागे कमावतो ‘इतके’ रुपये; विराट कोहलीची कमाईही थक्क करणारी

सप्तक्रांती एक्स्प्रेसचे पॅंट्री कार व्यवस्थापक असगर अली सांगतात की, नवरात्रीत तयार होणारे अन्न शुद्ध आणि सात्विक असेल. उपवास करणाऱ्यांना चार प्रकारच्या थाळी दिल्या जातील. २६ सप्टेंबरपासून ही सेवा दिली जाणार आहे.

कशी मागवता येणार थाळी?

आयआरसीटीसीची ही सुविधा ४०० स्थानकांवर उपलब्ध असेल. ही प्लेट ऑर्डर करण्यासाठी प्रवाशाला १३२३ या क्रमांकावर कॉल करून बुकिंग करावे लागेल. मग काही वेळाने, एक स्वच्छ उपवास थाळी तुमच्या सीटवर पोहोचेल. गेल्या वर्षीही अशी व्यवस्था करण्यात आली होती.

राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर कॅडबरीसह तब्बल ६०० कंपन्यांची चिंता वाढली; नेमकं कारण काय?

या थाळीमध्ये कोणकोणते पदार्थ असणार?

  • फळ, भोपळ्याचे पकोडे, दही : ९९ रुपये
  • २ पराठे, बटाट्याची भाजी, साबुदाण्याची खीर : ९९ रुपये
  • ४ पराठे, ३ भाज्या, साबुदाण्याची खिचडी : १९९ रुपये
  • पनीर पराठा, व्रत मसाला, शिंगाडा आणि आलू पराठा : २५० रुपये

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irctc gift to passengers on the occasion of navratri special thali for fasting will also be available in the train see what foods will be available pvp
First published on: 20-09-2022 at 09:53 IST