Iron Deficiency Diet Tips: शरीरात रक्ताची कमतरता म्हणजेच अशक्तपणामुळे थकवा, चक्कर येणे, डोकेदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात. लोहाची (iron)ची कमतरता हे अशक्तपणाचे एक प्रमुख कारण आहे. अशावेळी डॉक्टर आवश्यकतेनुसार लोहयुक्त पदार्थांसह लोह पूरक आहार घेण्याचा सल्ला देतात. असं असलं तरी लोह पूरक आजार घेताना काही लोकांना बद्धकोष्ठता, ओटीपोटीत दुखणे, मळमळ किंवा पोटातील इतर समस्या येऊ शकतात. या समस्यांमुळे काही लोक डॉक्टरांचा सल्ल्याशिवायच औषध घेणे थांबवतात. अशा परिस्थितीत आहारात लोहयुक्त पदार्थांचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

फिजिशियन आणि एमडी डॉ. शालिनी सिंह साळुंके यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, लोहाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी राजगिरा, बाजरी, नाचणी, ज्वारी, क्विनोआ, काळे तीळ आणि शेवग्याची पाने यासारख्या लोहयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. याशिवाय अंडी आणि इतर पौष्टिक पदार्थही संतुलित आहाराचा एक भाग करू शकता. तर मग तज्ज्ञांकडूनच जाणून घेऊ की आयर्न संप्लिमेंट्स घेताना पोट अस्वस्थ का होते आणि त्याची कमतरता असल्यास आहारात कोणत्या धान्यांचा समावेश केला जाऊ शकतो.

आयर्न सप्लिमेंट्स पोट अस्वस्थ कसे करते?

आयर्न सप्लिमेंट्समुळे पोट बिघडण्याचे सर्वात मोठे कारण हे आहे की, लोहाचा काही भाग शरीरात शोषला जात नाही आणि आतड्यांमध्येच राहतो. हे पाचक प्रणालीला त्रास देऊ शकते, त्यामुळे काही लोकांमध्ये बद्धकोष्ठता, ओटीपोटीत दुखणे, मळमळ, गॅस किंवा अतिसार यासारख्या अस्वस्थता उद्भवू शकते.

लोहासाठी नाचणीची पोळी

नाचणी हे पोषक समृद्ध धान्य आहे, त्यामध्ये लोहासह कॅल्शियम, फायबर आणि इतर आवश्यक पोषक घटक असतात. हे धान्य चपाती, डोसा किंवा लाप्शीच्या स्वरूपात सेवन केले तर शरीराला भरपूर लोह मिळेल. नाचणीमधील लोह शरीरात हिमोग्लोबिन तयार करण्याच्या प्रक्रियेस हातभार लावते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन आणि जर्नल ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या मते, नाचणीमध्ये हाय फायबर आणि पॉलिफेनॉल्स असतात, जे नॉन-हेम लोहाचे शोषण कमी करू शकतात. अनेक संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, लिंबू किंवा आवळा असे व्हिटॅमिन सी नाचणीसोबत घेतल्याने त्याची शोषण क्षमता अनेक पटींनी वाढते.

बाजरीची भाकरी

भरड धान्य हे एक संपूर्ण धान्य आहे. ते लोह, फायबर, प्रोटीन आणि इतर अनेक पोषक द्रव्यांनी समृद्ध आहे. बाजरीची भाकरी, खिचडी, पोळा किंवा लाप्शी बनवू त्याचे सेवन केल्यास शरीराला फायदा होईल. बाजरीत असलेले लोह शरीरात हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करते आणि नियमित संतुलित आहाराचा भाग बनल्यास लोहाची गरज भागवते. द जर्नल ऑफ न्यूट्रिशन आणि ICRISATच्या संशोधनानुसार, कुपोषण आणि अशक्तपणाचा सामना करण्यासाठी बायो-फोर्टिफाइड भरड धान्ये हा एक उत्तम पर्याय मानला जातो. क्लिनिकल चाचण्यांमध्ये असेही दिसून आले आहे की, भरड धान्य नियमित खाल्ल्याने मुले आणि महिलांमध्ये फेरीटिन म्हणजेच लोहाच्या साठ्याची पातळी सुधारते.

ज्वारी मिसळून पोळी

ज्वारी एक ग्लुटेन मुक्त संपूर्ण धान्य आहे. यामध्ये लोह, फायबर, प्रोटीन आणि इतर अनेक पोषक घटक असतात. हे पोळी, भाकरी किंवा थालीपीठ किंवा इतर पदार्थांमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. ज्वारीमध्ये असलेले लोह लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी शरीराची लोहाची गरज पूर्ण करते. आयसीएमआर-एनआयएनच्या इंडियन फूड कंपोझिशन टेबल्सनुसार, ज्वारी हे ग्लुटेनमुक्त धान्य आहे. जर्नलमध्ये प्रकाशित केलेला अभ्यास फूड केमिस्ट्री दर्शवितो की, ज्वारीमध्ये टॅनिन आणि फायटेट्स असतात. त्यामुळे नॉन हेम लोहाच्या शोषणावर परिणाम होतो. ज्वारी आणि यीस्ट एकत्रित वापरल्याने त्याचे अँटी-न्यूट्रिएंट कमी होते आणि लोहाचे शोषण सुधारते.

गव्हाच्या पीठात राजगिरा

राजगीरा हे लोहासह अनेक पोषक तत्वांनी भरपूर आहे. यात प्रोटीन, फायबर आणि खनिजे देखील असतात. राजगिरातील लोह शरीरात हिमोग्लोबिन वाढविण्यास हातभार लावते आणि संतुलित आहाराद्वारे दैनंदिन लोहाची आवश्यकता पूर्ण करण्यास मदत करते. इंटरनॅशन जर्नल ऑफ फूड सायन्सेस अँड न्यूट्रिशनच्या मते, राजगीराकेवळ लोहच नव्हे तर लायसिन आणि कॅल्शियम नावाच्या अमीनो अॅसिडमध्येदेखील आहे. संशोधनानुसार, त्यात अशलेल्या लोहाची जैवउपलब्धता इतर धान्यांपेक्षा चांगली आहे. ते हिमोग्लोबिनची पातळी सुरळीत राखण्यास उपयुक्त आहे.

ओट्स

ओट्समध्ये लोहासह फायबर, प्रोटीन, मॅग्नेशियम आणि इतर अनेक पोषक घटक असतात. ओट्सपासून मिळणारे लोह हे वनस्पतींपासून मिळणारे नॉन हेम लोह आहे. ब्रिटीश जर्नल ऑफ न्यूट्रिशन आणि यूएसडीएच्या आकडेवारीनुसार, ओट्समध्ये लोहासह विद्रव्य फायबर असते. ओट्समध्ये असलेले फायटिक अॅसिड नॉन हेम लोहाचे शोषण प्रतिबंधित करते. म्हणून संशोधकांनी ओट्स रात्रभर किंवा संत्री, किवी, स्ट्रॉबेरी सारख्या व्हिटॅमिन सी समृद्ध फळांसह खाण्याचा सल्ला दिला आहे. व्हिटॅमिन सी समृद्ध असलेल्या पदार्थांसह त्याचे सेवन केल्याने शरीरात त्याचे शोषण सुधारते.