तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ज्या गोष्टी खाता, त्यावर तुमचा मूड आणि दिवभरातील एनर्जी टिकून असते. सकाळचा नाश्ता तुम्हाला दिवसाची सुरुवात करण्यासाठी चांगली एनर्जी देतो. पण ही एनर्जी दुपारनंतर टिकून राहण्यासाठी दुपारचे जेवणही तितकेच पौष्टिक असावे लागते. यात अनेकजण पोट भरावे म्हणून दुपारी भात खातात. अनेकांना भाताशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटतं नाही. पण दुपारच्या जेवणात भात खाल्ला रे खाल्ला, की खूप झोप आणि सुस्ती येते? पण असे का होते माहित आहे का? नाही ना. चला तर मग जाणून घेऊ भात खाल्ल्यावर झोप का येते….
दुपारी जेवणात भात खाल्ल्याने झोपे येते ही सामान्य बाब आहे. ज्यावर आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी यांचे मत आहे की, भारतात दुपारच्या जेवणात भात खाणं ही प्रथा झाली आहे. पण दुपारी भात खाणं बंद केलं तरी तुम्हाला येणारी सुस्ती कमी होईल असं नाही. कारण दुपारच्या जेवणाच्या वेळेस शरीराची मानसिक उर्जा पातळी आधीच कमी होत असते म्हणून प्रथिनयुक्त अन्न खाणं गरजेचे असते. यामुळे मेंदूला डोपामाइन आणि एपिनेफ्रिनसारख्या अधिक सक्रिय रसायनांचे संश्लेषण करता येते. ज्यामुळे शरीराचा आवश्यक ऊर्जा मिळत राहते आणि कार्यक्षमता वाढते.
डाळ- भाता खाल्ल्याने झोप का लागते?
भात (पांढरे तांदूळ) हा मेलाटोनिक आणि सेरोटोनिकसारखे केमिकल शरीरात सोडतो, ज्यामुळे शांत झोप आणि सुस्ती येते.
भात खाल्ल्यानंतर त्यातील कार्बोदकांचे रुपांतर ग्लुकोजमध्ये होते. ग्लुकोजचं पचन होण्यासाठी इन्शुलिनची गरज असते, इन्शुलिन वाढलं की मेंदूतील ट्रिप्टोफेनचं रुपांतर फॅटी अॅसिडमध्ये होण्यास उत्तेजन मिळते. या प्रक्रियेमुळे मेलाटोनिन आणि सेरोटोनिन वाढते. याचमुळे भात झाल्यानंतर झोप येते.
भातऐवजी ‘खा’ हे पदार्थ
१) जर दुपारी तुम्ही भाताशिवाय जेवू शकत नसाल तर पांढरा भात खाण्याऐवजी ब्राऊन राइस खा. ब्राऊन राईसमध्ये कार्बोदक आणि स्टार्चच प्रमाण कमी असते. तसेच पांढऱ्या भाताऐवजी ब्राउन राइस खाल्ल्याने शरीरात ग्लुकोजचं प्रमाण वाढत नाही. तसेच तो पचायलाही हलका असतो.
२) भाताऐवजी तुम्ही तांदाळापासून बनवलेली इडली, खिचडी, डोसा, खीर खाऊ शकता. या पदार्थांमध्ये तांदळावर वेगळी प्रक्रिया होते ज्यमुळे त्याचे गुणधर्म बदलतात. आणि झोप येत नाही,
३) भात खाल्ल्यानंतर थोड्या वेळाने बडिशेप खावी, बडिशेपमुळे अन्न चांगले पचते आणि मूड फ्रेश होतो. तसेच बडिशेप चावल्याने तोंडाची हालचाली होते ज्यामुळे झोप येत नाही.
४) याशिवाय तु्म्ही ज्वारी, बाजरी किंवा तांदळाची भाकरी वेगवेगळ्या भाज्यांसह खाऊ शकता, किंवा भातप्रमाणे दिसणारी बार्ली देखील तुम्ही खाऊ शकता.