Working Out On An Empty Stomach : सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी व्यायाम करणे हा आजकाल अनेक लोकांच्या रोजच्या रुटीनचा एक भाग बनला आहे. काही लोक याला फिटनेस रुटीनचा सोपा मार्ग मानतात, तर काही लोकांच्या मनात याबद्दल अनेक शंका असतात. शेवटी उपाशीपोटी वर्कआऊट केल्याने शरीरात नेमके काय बदल होतात आणि याचा प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळा काय परिणाम होतो? याविषयी तज्ज्ञांकडून समजून घेऊ…

काय सांगतात डॉक्टर?

श्री बालाजी ॲक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर (इंटर्नल मेडिसिन) डॉ. अरविंद अग्रवाल यांच्या मते, रिकाम्या पोटी वर्कआऊट करणे हे प्रत्येक व्यक्तीसाठीच गरजेचे किंवा फायदेशीर ठरेल, असे नाही.

कोणी करावा रिकाम्या पोटी व्यायाम?

जर तुम्हाला सकाळी हलका व्यायाम जसे की चालणे (Walking), योगासने किंवा कमी ते मध्यम तीव्रतेचा कार्डिओ (Cardio) करायचा असेल आणि तुम्हाला उपाशीपोटी सोईस्कर वाटत असेल, तर तुम्ही व्यायाम करू शकता. मात्र, वजन कमी करण्यासाठी किंवा ???चांगल्या रिझल्टसाठी (की- शरीरासंबंधित चांगला परिणाम साधण्यासाठी)??? स्वतःवर जबरदस्ती करीत भुकेले राहणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

जड किंवा हेवी व्यायाम करणाऱ्यांसाठी सल्ला

तज्ज्ञ सांगतात की, जे लोक हेवी वेट ट्रेनिंग, हाय-इंटेंसिटी वर्कआऊट (HIIT) किंवा जास्त वेळ व्यायाम करतात, त्यांनी आधी हलका आणि सहज पचणारा आहार घेणे गरजेचे आहे. त्यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते आणि अशक्तपणा किंवा चक्कर येण्यासारख्या समस्या टाळता येतात.

रिकाम्या पोटी व्यायाम करण्याचे फायदे

उपाशीपोटी व्यायाम केल्याने त्या ठरावीक वेळेत फॅट बर्न होण्याचे प्रमाण थोडे वाढू शकते; परंतु त्यामुळे दीर्घकाळात वजन वेगाने कमी होतेच, असा कोणताही ठोस पुरावा नाही. म्हणूनच वर्कआऊटची वेळ ही व्यक्तीची दिनचर्या, तिचे ध्येय आणि शरीराची क्षमता यानुसारच ठरवली पाहिजे.

कधी टाळावी ही चूक?

जर रिकाम्या पोटी व्यायाम करताना चक्कर येणे, अशक्तपणा, घबराट किंवा खूप जास्त थकवा जाणवत असेल, तर तातडीने व्यायाम थांबवावा. तसेच मधुमेह (डायबिटीस), कमी रक्दाब (लो ब्लडप्रेशर) किंवा इतर कोणत्याही आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी उपाशीपोटी वर्कआऊट सुरू करण्यापूर्वी नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.