Beetroot Benefits: बीट हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. थंडीच्या दिवसांमध्ये तर अनेक जण आवर्जून बीटाच्या रसाचे सेवन करतात. बीटमध्ये लोह, फोलेट, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला आतून मजबूत करतात. त्याशिवाय बीट अशक्तपणा दूर करण्यास, पचन सुधारण्यास आणि वजन नियंत्रित करण्यासदेखील मदत करते. म्हणूनच अनेक आरोग्य तज्ज्ञ तुमच्या आहारात बीटाचा समावेश करण्याची शिफारस करतात. परंतु, बरेच लोक बीटाचा रस पिणे अधिक फायदेशीर आहे की ते कच्चे खाणे याबद्दल गोंधळलेले असतात. चला तर आज बीटाचे सेवन करण्याची योग्य पद्धत कोणती ते आपण जाणून घेऊ
जर तुम्हाला बीटामधून पूर्ण पोषण मिळवायचे असेल, तर त्यांना सॅलड म्हणून कच्चे खाणे हा एक चांगला पर्याय मानला जातो. कच्चे बीट खाल्ल्याने त्यातील आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे टिकून राहतात. तुम्ही त्यात लिंबू आणि थोडेसे खडे मीठदेखील घालू शकता, ज्यामुळे चवीबरोबर पचनदेखील सुधारेल. जर तुम्हाला कच्चे बीट पचवण्यास त्रास होत असेल, तर तुम्ही ते हलकेसे उकळू शकता. परंतु, जर बीट जास्त उकळले गेले, तर त्याचे पौष्टिक मूल्य कमी होऊ शकते.
बीटाचा रस योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने सेवन केल्यासदेखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सकाळी रिकाम्या पोटी बीटाचा रस पिणे सर्वांत प्रभावी आहे. अतिरिक्त फायद्यांसाठी तुम्ही बीटामध्ये गाजर, आवळा व आल्याचा एक लहान तुकडादेखील टाकू शकता. हे शरीराला विषमुक्त करण्यास मदत करते आणि रक्त वाढवते. परंतु, हे लक्षात ठेवा की, विशिष्ट प्रमाणात बीटाचे सेवन केल्याने हिमोग्लोबिन लगेच वाढत नाही. त्याचा परिणाम एखाद्या व्यक्तीचा आहार हा त्याची लोहाची पातळी आणि शारीरिक स्थिती यांवर अवलंबून असतो; परंतु त्याच्या नियमित सेवनाने त्याचे फायदे हळूहळू दिसून येतात.
बीट कोणी खावे?
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी बीट हा एक चांगला पर्याय असू शकतो. त्यातील फायबर पोट बराच काळ भरलेले ठेवते, ज्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा कमी होते. त्याव्यतिरिक्त वजन कमी करण्यासाठी बीट सकाळी रस स्वरूपात आणि दुपारी सॅलड म्हणून घेऊ शकता. बीट थंड मानले जाते म्हणून ते उन्हाळ्यात शरीराला थंड करते. रात्री जास्त बीट खाल्ल्याने अनेकदा गॅस किंवा पोट फुगल्यासारखे वाटू शकते. म्हणून रात्रीचे सेवन मर्यादित करा. आठवड्यातून तीन ते चार वेळा योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी बीट खाल्ल्याने शरीराला ऊर्जा व शक्ती मिळते.
