Matcha Tea: हल्ली माचा पिण्याचा ट्रेंड सोशल मीडिया, कॅफे आणि फिटनेस-लाइफस्टाईलमुळे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. विशेषतः तरुणांमध्ये पारंपरिक चहा किंवा कॉफीऐवजी माचा लॅटे, आइस्ड माचा आणि विविध फ्लेवर्समधील माचा पेये लोकप्रिय होत आहेत. माचाचा आकर्षक हिरवा रंग, वेगळी चव आणि त्यातील अँटिऑक्सिडंट्समुळेते आरोग्यदायी पेय (‘हेल्दी ड्रिंक’) म्हणूनही चर्चेत आले आहे. माचामध्ये कॅफीन आणि एल-थिनाईन (L-theanine) असल्यामुळे काही लोक तो सकाळी किंवा कामाच्या वेळी फोकस आणि जागरूकतेसाठी घेतात. मात्र, सोशल मीडियावर माचाचे अनेक आरोग्यासंबंधीचे दावे केले जात आहेत.

माचा पिण्याचे जबरदस्त फायदे

माचा ही हिरव्या चहाच्या पानांची बारीक पावडर असल्यामुळे त्यामध्ये चहाच्या पानांतील अनेक नैसर्गिक घटक थेट मिळतात. त्यामुळे माचा हे केवळ ट्रेंडिंग पेय नसून, योग्य प्रमाणात घेतल्यास ते आहारात काही पोषक घटकांचा समावेश करणारे पेय ठरू शकते.

अँटिऑक्सिडंट्सचा स्रोत: माचामध्ये कॅटेचिन्स, विशेषतः EGCG, आढळतात. हे अँटिऑक्सिडंट्स शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून पेशींचे संरक्षण करण्यास मदत करतात.

एकाग्रता वाढवण्यास मदत: माचामध्ये कॅफीनसोबत एल-थिनाईन असते. या संयोजनामुळे जागरूकता आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत होऊ शकते.

ऊर्जा मिळण्यास मदत: माचातील कॅफीनमुळे थकवा आणि झोप येण्याची भावना काही काळ कमी होऊ शकते. त्यामुळे अनेक जण सकाळी किंवा कामाच्या वेळी माचा घेतात.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर : हिरव्या चहातील कॅटेचिन्सचा नियमित सेवनाशी हृदय व रक्तवाहिन्यांच्या आरोग्याशी संबंधित काही फायदेशीर परिणामांचा अभ्यास झाला आहे.

चयापचयाला आधार: हिरव्या चहातील घटकांचा ऊर्जावापर आणि चरबीच्या चयापचयावर परिणाम होऊ शकतो. मात्र, केवळ माचा प्यायल्याने वजन झपाट्याने कमी होते, असा दावा योग्य नाही.

तोंडाच्या आरोग्यासाठी संभाव्य फायदा : हिरव्या चहातील काही घटक तोंडातील विशिष्ट जीवाणूंच्या वाढीवर परिणाम करू शकतात.

त्वचेसाठी अँटिऑक्सिडंट समर्थन: अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचेवरील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसचा परिणाम कमी करण्यास मदत होऊ शकते.

मनःस्थिती आणि मानसिक सतर्कतेसाठी मदत: एल-थिनिन आणि कॅफीनच्या संयोजनामुळे काही लोकांना मन:शांतीची अनुभूती मिळू शकते.